चर्चा:प्रांतीय भाषा विकासाकरीता केंद्र सरकारचे धोरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

उल्लेखनीयता[संपादन]

या लेखातील माहिती बरीचशी शासकीय प्रचारपत्रकासारखी वाटते. खेरीज या लेखात खालील त्रुटी दिसताहेत :

  • कोणते केंद्र सरकार, ते शीर्षकात स्पष्ट लिहिलेले नाही. मराठी विकिपीडियावर "केंद्र सरकार" म्हटल्यावर पॄथ्वीचे केंद्र सरकार असा अर्थ अभिप्रेत होईल (जे खरे तर अस्तित्वातच नाही); कारण मराठी विकिपीडिया जगभरातील मराठी भाषकांसाठी आहे (जे अनेक देशांचे नागरीक आहेत.).. कोणत्याही विशिष्ट देशापुरता सीमित नाही.
त्यामुळे मराठीच्या विकासात हिंदीला कधीच विरोध असणार नाही हे येथील राजकिय नेत्यांनी ध्यानात घ्यावे.
हे वाक्य विश्वकोशीय कसे होऊ शकते ? "येथील" म्हणजे मराठी विकिपीडीयावरील काय ?
  • एखाद्या देशाचे कुठल्यातरी मुद्द्याविषयीचे धोरण हा विकिपीडियावर लेख लिहिण्यासारखा कसा ठरू शकते, ते नीटसे स्पष्ट होत नाही. (मराठी विकिपीडियावर एखाद्या देशातील एखाद्या कायद्याबद्दल लेख लिहायला हरकत नसते. अधिक माहितीसाठी पाहा : विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे)

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०९:२९, २९ नोव्हेंबर २०११ (UTC)

प्रांतीय भाषा व केंद्र सरकारचे धोरण[संपादन]

घटनेतील सर्व २२ भारतीय भाषांचा सम्मान करण्याचे भारत सरकारचे धोरण आहे. त्यामुळे या महत्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष होउ नये. हा लेख सुधारला जाऊ शकतो. --Vijay Nagarkar १६:१८, २९ नोव्हेंबर २०११ (UTC)