चर्चा:प्रसूती

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इतरत्र सापडलेला मजकूर योग्य संपादन करुन या लेखात समाविष्ट करावा.

अभय नातू (चर्चा) ०६:३३, ४ ऑगस्ट २०१७ (IST)[reply]


प्रसूती
इतर नावे partus, parturition, birth

बाळाचा जन्म, ज्याला बाळंतपण आणि प्रसूती असे देखील म्हणतात, तो एक किंवा अनेक बाळांना स्त्रीच्या गर्भाशयातून बाहेर पडण्याद्वारे झालेला गर्भधारणेचा शेवट असतो.[१] 2015 मध्ये जगभरात सुमारे 135 दशलक्ष जन्म झाले होते.[२] सुमारे 15 दशलक्ष बालके, गर्भावस्थेच्या 37 आठवड्यांपूर्वी जन्मली,[३] तर 3 ते 12% बालके |42 आठवड्यांनी ]][[गर्भधारणेच्या मुदतीनंतर जन्मली.[४] जगाच्या विकसित भागात बर्‍याचशा प्रसूती रुग्णालयात होतात,[५][६]तर जगाच्या विकसनशील भागात पारंपारिक सुईणीच्या मदतीने अनेक जन्म घरी होतात.[७]

योनीतून प्रसूती हा बाळाच्या जन्माचा सर्वात सामान्य मार्ग आहे.[८] यामध्ये बाळंतपणाचे तीन टप्पे समाविष्ट आहेत: लहान करणे आणि गर्भाशयाचे मुख उघडणे, खाली सरकणे आणि बाळाचा जन्म आणि नाळ बाहेर ढकलणे.[९] पहिला टप्पा साधारणपणे बारा ते एकोणीस तास टिकतो, दुसरा टप्पा वीस मिनिटे ते दोन तास आणि तिसरा टप्पा पाच ते तीस मिनिटे टिकतो.[१०] पहिला टप्पा ओटीपोटात पेटके येणे किंवा पाठीतील वेदनेसह सुरू होतो जी सुमारे अर्धा मिनिट टिकते आणि दर दहा ते तीस मिनिटांनी घडते.[९] पेटक्यांसारख्या वेदना अजून जोरदार बनतात आणि काळ जाईल तसतशा एकत्र जवळ येतात.[१०] दुसर्‍या टप्प्यादरम्यान आकुंचनासह ढकलणे घडू शकते.[१०] तिसर्‍या टप्प्यात नाळ पकडीत घट्ट करण्यास उशीर करणे याची सर्वसाधारणपणे शिफारस केली आहे.[११] वेदनेसाठी अनेक पद्धती मदत करू शकतात जसे की विश्रांतीची तंत्रे, दु:खशमनकारक, आणि मणक्यातील बधिरतेची इंजेक्शन्स.[१०]

बरीचशी बाळे डोक्याकडून जन्माला येतात; परंतु सुमारे 4% बाळे प्रथम पायाकडून किंवा नितंबाकडून जन्मतात ज्यांना पायाळू म्हणतात.[१०][१२] बाळंतपणादरम्यान स्त्री सर्वसाधारणपणे तिच्या आवडीप्रमाणे खाऊ शकते आणि फिरू शकते, पहिल्या टप्प्यादरम्यान किंवा डोक्याकडून प्रसूतीच्या वेळी ढकलण्याची आणि एनिमाची शिफारस केली जात नाही.[१३] योनीच्या मुखापाशी छेद घेताना, ज्याला एपिसिऑटॉमी असे म्हणतात, हे सामान्य असते आणि ते सर्वसाधारणपणे गरजेचे नसते.[१०] 2012 मध्ये सुमारे 23 दशलक्ष प्रसूती या सिझेरियन सेक्शन म्हटल्या जाणार्‍या शल्यक्रिया कार्यपद्धतीद्वारे झाल्या.[१४] जुळे, बाळाला धोका असल्याची लक्षणे किंवा पायाळू स्थिती असल्यास सिझेरियन सेक्शनची शिफारस केली जाऊ शकते.[१०] प्रसूतीच्या या पद्धतीत बरे होण्यासाठी जास्त कालावधी लागू शकतो.[१०]

गर्भधारणा आणि बाळाच्या जन्मातील गुंतागुंत यामुळे दर वर्षी सुमारे 5,00,000 माता मृत्यू होतात, 7 दशलक्ष स्त्रियांना गंभीर दीर्घकालीन समस्या निर्माण होतात आणि 50 दशलक्ष स्त्रियांच्या आरोग्यावर प्रसूती झाल्यानंतर नकारात्मक परिणाम होतात.[१५] यातील बरेचसे विकसनशील जगात घडतात.[१५] विशिष्ट गुंतागुंतीमध्ये बाळंतपणात अडथळा, प्रसूतीपश्चात रक्तस्त्राव, पूर्व गर्भापस्मार, आणि प्रसूतीपश्चात जंतूसंसर्ग यांचा समावेश होतो.[१५] बाळातील गुंतागुंतीमध्ये जन्माच्या वेळी गुदमरणे याचा समावेश होतो.[१६]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Martin, Elizabeth. Concise Colour Medical Dictionary (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. p. 375. ISBN 9780199687992.
  2. ^ "The World Factbook". www.cia.gov. July 11, 2016. 30 July 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "Preterm birth Fact sheet N°363". WHO. November 2015. 30 July 2016 रोजी पाहिले.
  4. ^ Buck, Germaine M.; Platt, Robert W. (2011). Reproductive and perinatal epidemiology. Oxford: Oxford University Press. p. 163. ISBN 9780199857746.
  5. ^ Co-Operation, Organisation for Economic; Development (2009). Doing better for children. Paris: OECD. p. 105. ISBN 9789264059344.
  6. ^ Olsen, O; Clausen, JA (12 September 2012). "Planned hospital birth versus planned home birth". The Cochrane database of systematic reviews (9): CD000352. PMID 22972043.
  7. ^ Fossard, Esta de; Bailey, Michael (2016). Communication for Behavior Change: Volume lll: Using Entertainment–Education for Distance Education. SAGE Publications India. ISBN 9789351507581. 31 July 2016 रोजी पाहिले.
  8. ^ Memon, HU; Handa, VL (May 2013). "Vaginal childbirth and pelvic floor disorders". Women's health (London, England). 9 (3): 265–77, quiz 276-7. PMID 23638782.
  9. ^ a b "Birth". The Columbia Electronic Encyclopedia (6 ed.). Columbia University Press. 2016. 2016-07-30 from Encyclopedia.com रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  10. ^ a b c d e f g h "Pregnancy Labor and Birth". Women's Health. September 27, 2010. 31 July 2016 रोजी पाहिले.
  11. ^ McDonald, SJ; Middleton, P; Dowswell, T; Morris, PS (11 July 2013). "Effect of timing of umbilical cord clamping of term infants on maternal and neonatal outcomes". The Cochrane database of systematic reviews (7): CD004074. PMID 23843134.
  12. ^ Hofmeyr, GJ; Hannah, M; Lawrie, TA (21 July 2015). "Planned caesarean section for term breech delivery". The Cochrane database of systematic reviews (7): CD000166. PMID 26196961.
  13. ^ Childbirth: Labour, Delivery and Immediate Postpartum Care (इंग्रजी भाषेत). World Health Organization. 2015. p. Chapter D. ISBN 978-92-4-154935-6. 31 July 2016 रोजी पाहिले.
  14. ^ Molina, G; Weiser, TG; Lipsitz, SR; Esquivel, MM; Uribe-Leitz, T; Azad, T; Shah, N; Semrau, K; Berry, WR; Gawande, AA; Haynes, AB (1 December 2015). "Relationship Between Cesarean Delivery Rate and Maternal and Neonatal Mortality". JAMA. 314 (21): 2263–70. doi:10.1001/jama.2015.15553. PMID 26624825.
  15. ^ a b c Education material for teachers of midwifery : midwifery education modules (PDF) (2nd ed.). Geneva [Switzerland]: World Health Organisation. 2008. p. 3. ISBN 978-92-4-154666-9.
  16. ^ Martin, Richard J.; Fanaroff, Avroy A.; Walsh, Michele C. Fanaroff and Martin's Neonatal-Perinatal Medicine: Diseases of the Fetus and Infant (इंग्रजी भाषेत). Elsevier Health Sciences. p. 116. ISBN 9780323295376.