चर्चा:पेशवे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इतिहास संबधित सर्वच लेखातील साहित्य विभागांचे ललित आणि ललितेतर हे दोन भाग सुस्पष्टपणे वेगळे ठेवणे जरूरी आहे. इतर सदस्यांनी दिलेले संदर्भ हे ललित साहित्यातून येत नाहीत याची खात्री करणे सुलभ ठरावे म्हणून असे करणे जरूरी आहे.ललित साहित्यातील उल्लेखांचा संदर्भ म्हणून वापर करण्याचा मोठा घोटाळा असंख्य लोकांकडून होत असतो, ते टाळता येईल असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:२०, २७ सप्टेंबर २०१३ (IST)[reply]

प्रधानमंत्री[संपादन]

शिवाजीने या पदाचे सन १६७४ मध्ये पंतप्रधान असे नामकरण केले.हे व्यक्तिगत मत असावे. असल्यास तसा संदर्भ द्यावा.prime minister चे भाषांतर प्रधानमंत्री असेच होते मग पंतप्रधान म्हणण्याचा प्रघात ब्राहमणांनी पडला असावा.हिंदी भाषेत प्रधानमंत्री असाच शब्द वापरतात.साळवे रामप्रसाद ००:३४, २७ ऑक्टोबर २०१३ (IST)

पंतप्रधान म्हणण्याचा प्रघात ब्राहमणांनी पडला असावा.
१. कारण किंवा संदर्भ नसताना कृपया चर्चेत जात-पात आणणे टाळावे.
२. हिंदीमध्ये प्रधानमंत्री या समासातील प्रधान या शब्दाचा अर्थ मुख्य असा आहे. प्रधानमंत्री म्हणजे मंत्र्यांमधील म्होरक्या. मराठीतील पंतप्रधान शब्दात प्रधान हा शब्द मंत्री म्हणून वापरलेला आहे. दोन्हीचा अर्थ एकच (प्रधानांतील/मंत्र्यांतील मुख्य) असला तरी प्रधान या शब्दामुळे आपला गोंधळ होत आहे. इंग्लिशमधील prime ministerचा शब्दशः अर्थ देखील minister लोकांतील prime म्हणजे मंत्री/प्रधानांतील मुख्य हाच होतो. पेशवा हा शब्द मूळ फारसी असून त्याचा अर्थ अग्रणी किंवा नेता असा होतो.
अभय नातू (चर्चा) ०५:११, २७ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]
ता.क. हिंदीमध्ये वापरला म्हणून मराठीत तोच शब्द वापरला जावा हा आग्रह असण्याचे कारण दिसत नाही. मराठी भाषेतील अनेक सुंदर/चपखल शब्द हिंदी/इंग्लिशच्या माऱ्यात नष्ट होत असताना असलेले मराठी शब्द वापरणे हेच मराठी भाषेला हितकारक आहे.

पेशवे आणि पेशवाई सिनॉनीमस आहेत का ?[संपादन]

पेशवाई हे शीर्षक सध्या पेशवे कडे पुर्ननिर्देशीत होते. ज्ञानकोशीय लेख शीर्षकासाठी पेशवे आणि पेशवाई सिनॉनीमस (समानार्थी) आहेत का ? या बद्दल मी अल्पसा साशंक आहे पेशवे हे एक पद आहे आणि पेशवाई हा राजकीय दृष्ट्या उल्लेखनीय कालावधी आहे. हे दोन्ही लेख स्वतंत्र असावेत का ?

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:०४, १३ डिसेंबर २०१५ (IST)[reply]

पेशवा की पेशवे?[संपादन]

@: लेखाचे शीर्षक एकचवनी असावे. 'पेशवे' हा शब्द एकवचनी आहे का? 'पेशवा' हा शब्द एकवचनी वाटतो. 'पेशवे' हा अनेकवचनी व (पेशवा च्या तुलनेत) सन्मानसूचक भासतो. --संदेश हिवाळेचर्चा २२:३३, ३० डिसेंबर २०१९ (IST)[reply]