चर्चा:पुणे उपनगरी रेल्वे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@सुशान्त देवळेकर:


सदर पानावर दिसलेल्या त्रुटी  :(


१. दौंड रेल्वे स्थानकावरील फलकानुसार स्थानकाचे अधिकृत नाव मराठीमध्ये दौण्ड आणि हिंदीमध्ये दौंड असे आहे. येथे हिंदी नावाचा वापर केलेला दिसतो.


२. फक्त "पुणे-तळेगाव-लोणावळा" हाच उपनगरी मार्ग आहे. "पुणे-दौंड-बारामती" हा उपनगरी मार्ग नाही; तसा अधिकृत दर्जा अद्याप प्राप्त झालेला नाही.

अधिक स्पष्टीकरण: उपनगरी मार्गावर किमान तिकीट दर ५ रु. असतो...जो पुणे-लोणावळा मार्गावर आहे...परंतु पुणे-दौण्ड मार्गावर नाही.

उपनगरी मार्गावर परतीचे तिकीट मिळते..जे पुणे-लोणावळा मार्गावर उपलब्ध आहे...परंतु पुणे-दौण्ड मार्गावर नाही.


३.दौंड-बारामती मार्ग: या मार्गावर चार शटल गाड्या आणि पुणे-दौंड दरम्यान तीन डेमु गाड्या धावतात.... हे चुकीचे आहे.

पुणे - दौण्ड दरम्यान १४ साधारण प्रवासी (पॅसेंजर) गाड्या आणि १२ डेमू गाड्या धावतात...तर दौण्ड - बारामती दरम्यान ४ साधारण प्रवासी (पॅसेंजर) गाड्या आणि ४ डेमू गाड्या धावतात.


४. "मालाड गाव रेल्वे स्थानक"....हे नाव चुकीचे आहे. स्थानकाचे नाव "मालाड गाव" नसून "मळदगांव" असे आहे.


५. "घोरपडी पश्चिम रेल्वे स्थानक" हे या पानावर चुकीचे आहे. "घोरपडी पश्चिम रेल्वे स्थानक" हे पुणे - दौण्ड मार्गावर नसून ते पुणे - मिरज मार्गावर आहे.


६. पुणे - दौण्ड मार्गावर पुणे-हडपसरदरम्यान असलेल्या स्थानकाचे नाव "घोरपड़ी (ट्रांशिप) यार्ड" असे आहे. प्रत्यक्षात हे स्थानक म्हणजे एक तांत्रिक थांबा आहे...

अधिक स्पष्टीकरण: येथे तिकीट खिडकी नाही तसेच या स्थानकाचे तिकीट इतर कोणत्याही स्थानकावरुन उपलब्ध होत नाही.


७. शिरसई चुकीचे आहे. शिरसाई असे योग्य नाव आहे.

@अभय होतू:,
वर सुचवल्या प्रमाणे बदल केले आहेत. एकदा नजरेखालून घालावे.
१. @: - मार्गदर्शन करावे.
२. योग्य ते बदल करावे.
३. योग्य ते बदल करावे. बदलले
४. बदलले.
५. बदलले.
६. बदलले.
७. बदलले.
अभय नातू (चर्चा) ०७:०४, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply[reply]

"दौंड रेल्वे स्थानकावरील फलकानुसार स्थानकाचे अधिकृत नाव मराठीमध्ये दौण्ड आणि हिंदीमध्ये दौंड असे आहे.". हे चुकीचे वाटते. दौण्ड हे हिंदी आणि दौंड हे मराठी असले पाहिजे. बाकी सर्व सूचना योग्य आहेत. घोरपडी हे ट्रान्सशिप स्टेशन (१ फलाट असलेले Transh Yard) आहे, ही माहितीही योग्य आहे. .... ज


मलाही ही शंका आली होती. मी स्वत: दौण्ड स्थानकावरील अधिकाऱ्यांकडून याची खात्री केली आहे. मराठीमध्ये दौण्ड आणि हिंदीमध्ये दौंड असे आहे.

--अभय होतू (चर्चा) १३:११, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply[reply]