चर्चा:पतिव्रता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पतिव्रतामधली ति र्‍ह्स्व असते. ती दुरुस्त करता येणार नाही? ’मुक्त’ असा लिहिला तर बरा दिसेल. हलन्‍त अक्षरानंतर वाचणारा निमिषमात्र थांबतो. त्यामुळे अपेक्षित उच्चार होत नाही. मुक्‌-त हा उच्चार नको असेल तर मुक्त असे टंकायला पाहिजे. आणखी उदाहरणे: बालोद्‌यान हे बालोद्‌‌ नावाच्या यानाचे नाव वाटते.असेच विद्‌।या म्हणजे अहो विद्‌(विद्वान),तुम्ही या. अत्यंत नाइलाज असेल तरच हलन्‍त चिन्ह वापरावे. उदाहरणा्र्थ, उद्‌घाटन. उद्घाटन लिहिले तर ते उद्‌धाटनसारखे दिसते.द्वंद्व, विद्वांस, हे शब्द द्‍वंद्‌व, विद्‌वांस असे लिहिले ते त्यांचे योग्य वाचन होत नाही. छ, ट, ठ, ड, ढ, ळ, ङ, ह यांना जोडण्यासाठी एक खास य असतो, त्याला पाऊण य म्हणतात. तो मला विकीवर सापडला नाही. तो असला की ह्य(ह्‌+पाऊण य)प्रमाणेच छटठडढळची जोडाक्षरे पाय न मोडता लिहिता येतात.

जोडाक्षराची उभी जोडणी हे देवनागरीचे सौंदर्य आहे, ते बिघडवू नये. अपवाद: टंकाचे आकारमान लहान असेल तर,छन्न हा शब्द छत्र(छ्त्‍र)सारखा दिसू शकतो.तिथे वाटल्यास न ला आडवा न जोडावा. पण असे अपवाद थोडेच आहेत. J ०९:४९, २३ जानेवारी २०१० (UTC)