चर्चा:न्यू झीलंड
विषय जोडाAppearance
Latest comment: ६ महिन्यांपूर्वी by अभय नातू in topic न्यू झीलंड नाव
न्यू झीलंड नाव
[संपादन]न्यूझीलंड ह्या देशाचे नाव विकिपीडियावर न्यू झीलंड ऐवजी बदलून न्यूझीलंड असे करावे असे वाटते.. इंग्रजी भाषेमध्ये जरी New Zealand हे दोन वेग वेगळे शब्द असले तरीही, मराठी विश्वकोशात लिहिल्याप्रमाणे विकिपीडियावर सुद्धा ते बदलून न्यूझीलंड असे करावे (https://vishwakosh.marathi.gov.in/19908/).. ह्या बद्दल आपले काय मत आहे?
cc: संतोष गोरे, अभय नातू, @Usernamekiran, @Shantanuo, @Dharmadhyaksha
-- नितीन कुंजीर (चर्चा) ११:५५, ३ नोव्हेंबर २०२५ (IST)
- लेख नाव लिहिताना मी पहिले प्राधान्य मराठी भाषेतील प्रचलित नावास देतो, तर अभय नातू हे स्थानिक नावास पहिले प्राधान्य देतात. अनेक वेळा स्थानिक नाव वापरणे जास्त संयुक्त वाटते. सबब यावर माझे मत तटस्थ आहे.-संतोष गोरे ( ✉️ ) १७:०४, ३ नोव्हेंबर २०२५ (IST)
- विशेषनाम (व्यक्ती, स्थळ, ...) लिहिताना स्थानिक नावालाच प्राधान्य द्यावे हे माझे ठाम मत आहे. यात अपवाद असावेत परंतु त्यासाठी सबळ कारणे असावी, उदा. दक्षिण आफ्रिकेत प्रचलित कौसा भाषेतील काही ध्वनी देवनागरी लिपीमध्ये (आणि जगातील बव्हंश लिप्यांमध्ये) लिहिता येत नाहीत.
- स्थानिक उच्चार हे सत्याच्या अधिक जवळ असताता. प्रचलित उच्चार हे व्यक्तीसापेक्ष असतात आणि त्याला तार्किक कारणे सहसा नसतात. पूर्वी सुरू झालेल्या अतार्किक किंवा सबळ कारण नसलेल्या रुढी/उच्चार/शुद्धलेखन पुढे नेणे हे योग्य नाही.
- प्रचलित नावाला प्राधान्य दिल्याने बॉम्बे, पूना, थाना, डेल्ली, मॅड्रास, इ. लेखन आणि उच्चार कायम होतात (आणि त्यावरुन निष्कारण वादंग, अगदी मारामाऱ्या सुद्धा होतात.)
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) २१:४९, ३ नोव्हेंबर २०२५ (IST)