चर्चा:नवरात्र/उत्सवातील साड्यांचे रंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नकल डकव[संपादन]

विशेष:Diff/1630109 मध्ये सदस्य:आर्या जोशी यांनी या संकेतस्थळ वरून प्रताधिकारित मजकुर नकल-डकव केली आहे. मजकुर काढण्यात आला आहे व लेखात आवश्यक बदल केले आहेत. सदस्याला याबाबत ताकीद दिली आहे. Gnome-edit-redo.svgअभय नातू, V.narsikar: आपल्या माहितीसाठी. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १४:२२, १५ ऑक्टोबर २०१८ (IST)

टायविन यांची गल्लत[संपादन]

Gnome-edit-redo.svgअभय नातू, V.narsikar, आर्या जोशी, सुबोध कुलकर्णी:

 • नकल-डकव/प्रताधिकार भंग या दोऩ्हीमधला फ़रक न समजणे - तथ्ये अनेकदा नकल-डकव किंवा प्रताधिकार भंग समजली‌ जातात. इथेही तसेच झालेले आहे.
 • विशिष्ट तारखेला विशिष्ट रंग ही बाब आपल्या भाषेत लिहून लिहून किती वेगळी लिहिली जाऊ शकते याला मर्यादा आहेत, त्यामुळे टायवीन यांनी केलेली वरील कृती अवास्तव आहे शिवाय त्यात टायविन आर्यावर रोष धरुन बसल्याचे दीर्घकाळ उघडच आहे, त्यामुळे टायवीन यांची वरील कारवाई उलटवण्यात यावी ही विनंती, शिवाय टायवीन यांनी प्रताधिकार भंग आणि तथ्यांची विकिवरील मांडणी ह्यावर स्वत:ची माहिती सुधारण्याची गरज आहे.
 • जर तारखा आणि रंग ह्या व्यतिरीक्त ह्या लेखात काहीही मजकूर नसल्यास, ह्या लेखाचे शारदीय नवरात्र मध्ये विलिनीकरण करण्यात यावे असे मी सुचवत आहे. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १४:५२, १५ ऑक्टोबर २०१८ (IST)

नवरात्र उत्सवातील साड्यांचे रंग हा लेखाबाबत,टायविन यांनी दर्शविलेले संकेतस्थळ, व टायविन यांनी उलटविलेला/झाकलेला मजकूर याबाबत तथ्ये खाली दिलेली आहेत.हे सर्व नाईलाजाने मांडावे लागत आहे हे प्रथमच स्पष्ट करतो.वस्तुस्थिती ही वस्तुस्थिती आहे. यात कोणा एकाची तरफदारी करण्याचा/बाजू घेण्याचा हेतू नाही हे स्पष्ट करीत आहे.यात अगदी नकल-डकव स्पष्ट दिसत आहे अगदी चिन्हांसह.त्यामुळे टायविन यांची कृती योग्य आहे असे माझे मत आहे. (यापुढे जाउन, तो झाकलेला मजकूर आपले शब्दात लिहून व यथोचित संदर्भ देऊन येथे पुन्हा टाकता येऊ शकतो असेही माझे मत आहे). हे नकल-डकव संबंधित सदस्याद्वारे अनवधानाने झाले असावे हेही होऊ शकते. या प्रकरणावर विनाकारण बोभाटा (विदर्भी शब्द-अर्थ:बोंब मारणे/गैरकृत्यास प्रसिद्धी देणे/चावडीवर/चव्हाट्यावर चर्चा करणे) झाला नसता तर योग्य झाले असते असे मला वाटते. यासमवेतच, संबंधित संकेतस्थळाचे पानावर खाली दिलेली टिपही वाचावी. सर्व संबंधितांना माहितीस्तव.

यासोबतच येथे झालेली चर्चा वाचावी.तेथे झालेल्या चर्चेनुसारच हा लेख बनविण्यात आला आहे.त्यामुळे पुन्हा या मजकूराचे विलयन आवश्यक वाटत नाही.

येथे या प्रकरणी झालेली चर्चा व तत्सम अनेक प्रकरणाबाबत अत्यंत खेदाने नमूद करावेसे वाटते कि, हे सर्व मराठी विकिपीडियाच्या प्रगतीसाठी मारक सिद्ध होत आहे, याची सर्व संबंधितांनी कृपया प्राथम्यक्रमाने नोंद घ्यावी व भविष्यात विनाकारण होत असलेली चर्चा टाळावी.


Gnome-edit-redo.svgअभय नातू, V.narsikar, आर्या जोशी, सुबोध कुलकर्णी: मी पुराव्याशिवाय काहीही बोलत नाही, शिवाय इतिहास सगळं स्पष्ट दाखवत असताना मी फक्त इतिहासच दाखवणार

 • टायविन बरोबर आता दादाही आगतिक होत असताना दिसत आहेत, बोभाटा आणि तत्सम शब्द माझ्यासाठी त्यांनी वापरले आहेत, त्यांच्या वयाकडे आणि कामाकडे पाहून मी दुर्लक्ष करीत आहे.
 • ह्या लेखाबद्दलचा महत्त्वाचा घटनाक्रम खालीलप्रमाणे आहे, आपण तो पहावा म्हणजे आपल्याला टायविन आणि इतर सदस्यांनी कश्याप्रकारे घोळ केला आहे हे लक्षात येईल,
  • या ठिकाणी शारदीय नवरात्र ह्या लेखाच्या इतिहासात आर्या जोशी यांनी विशेष:Diff/1502835 येथे नरसीकर यांच्या परममित्र आणि टायविन यांचे लाडके ज यांनीच हा मजकूर ह्या लेखात जोडल्याचे स्पष्ट दिसत आहे.
  • आता ज यांनी जोडलेल्या तारखा आणि रंगाच्या व्यतिरीक्त जो मजकूर आपल्याला या संकेतस्थळावर दिसत आहे तो विकीवरूनच त्या संकेतस्थळावर गेला आहे कारण, हा मजकूर थोडा थोडा करुन आर्या आणि इतर सदस्यांच्या सहभागातून शारदिय नवरात्र मध्ये तयार झालेला आहे हे आपल्याला दिसते.
  • आता तोच मजकूर ज्यामध्ये ज यांनी प्रताधिकार भंग केला तो मजकूर घेऊन आर्या यांनी हा लेख केलेला आहे, तेव्हा प्रताधिकार भंगासाठी जर कोणाला जबाबदार ठरवायचे असेल तर ते ज यांना ठरवावे आर्या यांना नाही.
  • आता मला नरसीकर दादांच्या बोभाटा आणि मी भांडणे उकरुन काढण्याच्या वाक्याकडे यायचे आहे, जर तुम्हांला घाण साफ करताना येणारा वास सहन होत नसेल तर ती साफ करणारा माणसाची चुक नसते, तो घाणीचा गुणधर्म असतो, जो आपल्या नंतर येणारे लोकांना सहन करावा लागू नये म्हणून घाण साफ करायची असते आणि ती करताना दुर्गंध सहन करावा लागतो. हा त्रास म्हणजे तो दुर्गंध आहे जो ज सारख्या लोकांमुळे आपल्याला आता सहन करावा लागतोय.
  • त्या मुळे ह्या लेखातल्या मजकूरात नकल-डकव करुन प्रताधिकार भंग आर्या यांनी केलेला नाही. सबब, टायविन यांनी आर्या यांना जबरदस्तीने दिलेली प्रताधिकार भंगाची धमकी ताबडतोब काढून घ्यावी. आणि आर्या यांचा मजकूर पुर्नस्थापित करावा.
  • शिवाय इतिहास तपासणे, आणि कारवाई करताना काळजी घेणे हे प्रचालकांकडून अपेक्षित असलेले गुण सपशेल पळून गेल्याचे नरसीकर आणि टायवीन या दोघांच्याही वरच्या वक्तव्यावरून दिसून येते. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १८:१६, १५ ऑक्टोबर २०१८ (IST)

संबंधित संकेतस्थळावरील मजकूर[संपादन]

नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार भारतीय ज्योतिष्यांनी प्रत्येक दिवसाचा रंग ठरवलेला आहे देवीला त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते. महाराष्ट्रातील अनेक शहरांतील स्त्रियाही अशाच प्रकारे नवरात्रातल्या दिवसांत त्या ठरावीक रंगाच्या साड्या नेसतात. गावांगावांतील बँका किंवा तत्सम स्त्रीबहुल कार्यालयांमध्ये नवरात्रात असे एकरंगी दृश्य असते. या प्रथेची सुरुवात २००४ सालापासून झाली, ती अशी:-

२००४ साली मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात देवीला नऊ दिवस नेसवल्या जाणाऱ्या साड्यांचे रंग 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झाले. मुंबईभरातल्या महिलांनी नऊ दिवस त्या त्या रंगांच्या साड्या नेसून त्याला प्रचंड प्रतिसाद दिला आणि त्यानंतर हे दरवर्षी घडत गेले. आता नवरात्रीत वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या 'आजच्या रंगाने' मुंबई रंगून जाऊ लागली.. लोकल ट्रेन्स, सरकारी बिन-सरकारी ऑफिसे, महिलामंडळे एवढेच काय पण हॉस्पिटल्सही या रंगांच्या साड्यांनी रंगून जातात. आता मुंबईच नाही तर, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव अशा अनेक गावांत नवरात्रीच्या नऊ दिवसांत रंगांची ही उधळण पहायला मिळते.

ही नवरात्रीच्या दिवसांच्या नऊ रंगांची कल्पना महाराष्ट्र टाइम्सने बहुसंख्य सामान्य आणि तमाम नोकरदार स्त्रीवर्गात जरी लोकप्रिय केली असली, तरी रंगांची मूळ कल्पना एकोणीसाव्या शतकात, अगदी पेशवाईच्या काळातही अस्तित्वात होती. (१८१८ सालचे पंचांग पहावे). उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी, चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल या रीतीने नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यातल्या दिवसाचे रंग ठरवले आहेत. बुधवारचा निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. आठवडा संपल्यानंतर नवरात्रातले शेवटचे दोन दिवस उरतात. त्यांच्यासाठी मोरपिशी हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवले आहेत.

आर्या जोशींची आवृत्ती[संपादन]

नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार भारतीय ज्योतिष्यांनी प्रत्येक दिवसाचा रंग ठरवलेला आहे देवीला त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते. महाराष्ट्रातील अनेक शहरांतील स्त्रियाही अशाच प्रकारे नवरात्रातल्या दिवसांत त्या ठरावीक रंगाच्या साड्या नेसतात. गावांगावांतील बँका किंवा तत्सम स्त्रीबहुल कार्यालयांमध्ये नवरात्रात असे एकरंगी दृश्य असते. या प्रथेची सुरुवात २००४ सालापासून झाली, ती अशी:-.

२००४ साली मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात देवीला नऊ दिवस नेसवल्या जाणाऱ्या साड्यांचे रंग 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झाले. मुंबईभरातल्या महिलांनी नऊ दिवस त्या त्या रंगांच्या साड्या नेसून त्याला प्रचंड प्रतिसाद दिला आणि त्यानंतर हे दरवर्षी घडत गेले. आता नवरात्रीत वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या ’आजच्या रंगाने’ मुंबई रंगून जाऊ लागली.. लोकल ट्रेन्स, सरकारी बिन-सरकारी ऑफिसे, महिलामंडळे एवढेच काय पण हॉस्पिटल्सही या रंगांच्या साड्यांनी रंगून जातात. आता मुंबईच नाही तर, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव अशा अनेक गावांत नवरात्रीच्या नऊ दिवसांत रंगांची ही उधळण पहायला मिळते.

ही नवरात्रीच्या दिवसांच्या नऊ रंगांची कल्पना महाराष्ट्र टाइम्सने बहुसंख्य सामान्य आणि तमाम नोकरदार स्त्रीवर्गात जरी लोकप्रिय केली असली, तरी रंगांची मूळ कल्पना एकोणीसाव्या शतकात, अगदी पेशवाईच्या काळातही अस्तित्वात होती. (१८१८ सालचे पंचांग पहावे). उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी, चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल या रीतीने नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यातल्या दिवसाचे रंग ठरवले आहेत. बुधवारचा निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. आठवडा संपल्यानंतर नवरात्रातले शेवटचे दोन दिवस उरतात. त्यांच्यासाठी मोरपिशी हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवले आहेत.[१]

--वि. नरसीकर , (चर्चा) १६:३७, १५ ऑक्टोबर २०१८ (IST)


Gnome-edit-redo.svgV.narsikar: Gnome-edit-redo.svgअभय नातू: Gnome-edit-redo.svgSureshkhole:

नमस्कार!सर्वप्रथम ज यांनी नवरात्र लेखात हा मजकूर घातला होता.तो मी जसाच्या तसा उचलून नव्या लेखात घातला आहे त्यामुळे हे झाले असावे. ज्याला स्वतःच्या भाषेत लिहीता येते चांगले ती संपादक व्यक्ती नकल डकव करण्याची इच्छा नसलेली असणार हे इथे सर्वांनाच माहिती आहे.असो. तेव्हा ज यांच्या नकल डकवचा इतिहास आधी पाहून घ्यावा.आणि मग माझी चूक असल्यास दाखवून द्यावे. चांगले काम करीत असणार्‍या आणि मर्मांवर बोट ठेवणार्‍या व्यक्ती लोकांना त्रासदायक होऊ शकतात याचा अनुभव मला इथेही घ्यावा लागतो आहे याचा विशादच वाटू लागला आहे. या लेखातील मजकूराबाबत तर मी नातू सर आणि नरसीकर सर यांना चर्चा पानावर संदेश पाठवले होतेच. सुरेश म्हणाले तसं टायवीन आता मला खणून खणून काढणारच कारण मी त्यांच्या विरोधी मत नोंदवले आहे. विकीवर महिला रेड लिंक मधे असण्याचे कारण अशी मंडळी असणे हे दुःखद आहे.अशाने माझ्यासारखी सक्रिय व्यक्तीही दहा वेळा विचार करेल. केलेल्या कामाचे कौतुक होण्यापेक्षा हे असलच अनुभवाला येणं किती विचित्र आहे.आर्या जोशी (चर्चा) १७:३७, १५ ऑक्टोबर २०१८ (IST)


७ सप्टेंबर २०१४[संपादन]

नवरात्रीतल्या नऊ रंगाांसंबंधीचा मजकूर सर्वप्रथम मी नवरात्र या लेखात ७ सप्टेंबर २०१४ रोजी टाकला, तो कुठूनही उचलेला नव्हता. आर्या जोशींनी तो ऐतिहासिक स्वरूपाचा मजकूर अनेकदा उडवला, आणि शेवटी नवीन लेख लिहून त्यात टाकला. त्यांनी आणि मी कुठलाही प्रतिकारभंग केलेला नाही. वर उल्लेख केलेल्या संकेतस्थळानेच विकिपीडियावरचा मजकूर आपल्या लेखात टाकला आहे. विकीपीडियावरचा मजकूर अन्यत्र प्रसिद्ध होणे हा प्रताधिकारभंग नसून तो आपला सन्मान आहे. ...ज


माफिनामा[संपादन]

Gnome-edit-redo.svgअभय नातू, , आर्या जोशी, Sureshkhole:

वरील सर्व लोकांचे विवेचन लक्षात घेता,त्यांच्या भावना लक्षात घेता व झालेला प्रकार व वर नमूद केलेल्या गोष्टी बघता, मी या प्रकरणाच्या दीर्घ खोदकामात कमी पडलो.मी ते केले नाही. वास्तविकतः, सुरेश यांनी लक्षात आणून दिले असतांना ते नीट बघावयास हवे होते.कारण काहीही असो, ही सर्वस्वी माझी चुकी आहे हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो.मी या प्रकरणाची सखोल तपासणी करावयास हवी होती, परंतू काही व्यस्ततेमुळे मी ती टाळली. प्रथमदर्शनी जे दिसले त्यावरून मी हे मत मांडले. मी तसे करावयास नको होते.चूक झाल्यास माफी मागण्यात काहीही गैर नाही.

तसेच, प्रचालकांच्या एका अलिखित नियमाप्रमाणे, यात थोडा कालापव्यय झाला असता तर सर्व गोष्टींचा विस्तृत खुलासा झाला असता व हा प्रसंग उद्भवला नसता.त्या नियमाला मी अनवधानाने पाळले नाही.असो.

या प्रसंगी, आर्या जोशी यांना त्यांची काहीही चूक नसतांना विनाकारण मनस्ताप झाला. त्या चांगले करावयास गेल्या व विनाकारण त्यांचे नाव यात गोवल्या गेले. सर्व संबंधित सदस्यांना जो मनस्ताप झाला त्याची मी पूर्ण अथवा आंशिक भरपाईही करू शकत नाही.याचा मला खेद आहे.मला आर्याबद्दलचा असलेला आदर कायम आहे नव्हे तो वाढला आहे.

यासमवेतच, 'ज' याचेही मनःपूर्वक आभार मानतो, ज्यांचे खुलाश्याने प्रकरणाची तड लागली.पण, मला या प्रकरणी अपराधीपणाची भावना निर्माण झाली आहे.

दुसरे असे कि, आजवरच्या माझे कामात असे घडले नाही.किंबहुना मी तितके कामच केले नाही.या प्रकरणी, सदस्यांच्या भावना तरीही दुखावलेल्याच रहात असतील तर, त्यांनी मागणी केल्यास, मी प्रचालकपदाचा राजिनामा देण्यास कधीही तयार आहे.

मला येथे काहीही मागणी करण्याचा अजिबात अधिकार नसतांनासुद्धा, माझी येथे एकच मागणी आहे कि,या कारणास पुढे करून कोणीही विकिवरील संपादने कृपया थांबवू नयेत.धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) १९:४९, १५ ऑक्टोबर २०१८ (IST)


Gnome-edit-redo.svgअभय नातू, V.narsikar, Sureshkhole: नमस्कार! नरसीकर सर आपण माफी मागणे हा आपला मोठेपणा आहे.आपण मला या व्यासपीठावर शिकवले आहे.त्यामुळे आपण खेद मानू नका.मला याचे नक्की वाईट वाटले आहे की प्रामाणिक प्रयत्नांना साथ देण्याऐवजी स्वतःला विरोध करणार्‍यांना त्रास देणे हे घडते आहे. सुरेश मला नेहमी सहाय्य करतात कारण आम्ही प्रशिक्षण वर्गापासून एकत्र काम करतो आहोत आणि हे व्यासपीठ अधिक समृद्ध होणे आणि आमचीही गुणवत्ता वाढणे दोन्ही व्हावे. राजकारण सर्वच ठिकाणी खेळले जाते पण जगाला ज्ञान शिकवणार्‍या व्यात्रपीठावर एकमुखाने काम करणार्‍या संपादकांची वानवा आहे हे मात्र इथे जाणवते आहे. आणखी एक... हे मी पद्धतशीर नोंदवेनच पण जे सदस्य नियमित सहभाग देत आहेत त्यांना किमान आदर म्हणून निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग कसा असेल याचे धोरण आपल्याकडे जरा अधिक स्पष्ट व्हावे. धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) २१:१८, १५ ऑक्टोबर २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgV.narsikar, अभय नातू, आर्या जोशी:,
वरील चर्चेत असे स्पष्ट दिसत आहे की हा मजकुर दुसऱ्या लेखातून या लेखात जोडले गेले आहे. चर्चा सोडून व्यक्तिगत टिप्पणी काही सदस्यांचे नेहमीचे झाले आहे. वोट/कौल यात विरोध-समर्थन तर चालत असते. सहा महिने पूर्वी पण विरोध केले होते आता ही विरोध आहे त्यावर काही मोठे फरक पडणार नाही असे माझे मत आहे. सहा महिने पूर्वी सुद्धा आपल्या कामात मदत केली व पुढेही करेल. काही ठिकाणी आपण चुकले आहेत ते संगणास इच्छितो. कृपया सकारात्मक दृष्टीने पहावे व जर काही प्रश्न निर्माण झाली की विचारा काही डोंगर कोसळणार नाही. पहिला तर विकिपीडियावर मजकुर सामग्री ही CC BY-SA 3.0 License आणि GFDL च्या अटीवर आहेत. जर आपण मजकुर इतर ठिकाणी प्रकाशित करत आहेत तर आपल्याला विकिपीडियाला क्रेडिट करायला आवश्यक आहे. जर विकिपीडिया पासून विकिपीडियावर जरी मजकुर हलवले तरीही आपल्याला अटी नुसार क्रेडिट करायला हवा. या लेखाच्या संदर्भात आपण असे काहीही केले नाही त्यामुळे आपल्यावर असलेले प्रताधिकार भंग हे कायम आहे. याचे उपाय काय? कोणत्याही लेखातील मजकूर इतर ठिकाणी हलवले की त्या लेखाचे चर्चापानावर त्याचे क्रेडिट द्यावे. क्रेडिट कसे करावे त्यासाठी आपण Wikipedia:Reusing Wikipedia content पहावे. दुसरे म्हणजे आपण जे काहीही आपण टिपणी देत आहेत त्याला महत्व ठेवावे. प्रचालक आपले आदर करतात आपण त्यांच्यावर हल्ला करून आपले महत्व त्यांचा नजरेत खाली करू नये. काही सदस्य इथे फक्त क्रॉस वागतात व ते फक्त इथे गोंधळ निर्माण करण्यास विकिपीडियावर आहेत, असे सदस्यांचे प्रभावात येऊ नये त्याने आपलेही मान खाली उतरून जाते. असो काही लोकांना कितीही सांगा ते सुदरत नाही. या लेख चर्चेत नक्की विनोद साचा लावणे पात्र आहे नक्की आपण विकिपीडियावर एक मालमत्ता म्हणून कार्य कराल अशी मला आशा आहे. दायित्व आपल्याला लाभो नये अशी अपेक्षा. धन्यवाद. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २२:२३, १५ ऑक्टोबर २०१८ (IST)
 1. ^ (इंग्रजी भाषेत) http://web.bookstruck.in/book/chapter/52325. 2018-09-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)