चर्चा:शारदीय नवरात्र

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:नवरात्र या पानावरून पुनर्निर्देशित)

लेखाचा सध्याचा दर्जा धार्मिक थाटाचा आहे. विकी मानकाप्रमाणे बदलावा लागेल.

उपरोक्त प्रतिसाद प्रथम दर्शनी सदस्य:Dakutaa यांचा ३१ डिसेंबर २००८ चा आहे असे दिसते माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:३०, १ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]


बदलत्या गतिमान जीवनशैलीत आपल्या परंपरा जपताना त्यांना आधुनिक काळाच्या कसोटीवरही तपासून पाहिले पाहिजे. अन्याय, अत्याचार,भ्रष्ट व्यवस्था , अधर्म. अनाचार यांनी जेंव्हा समाज सैरभैर झाला त्यावेळी या आदिमायेने कालीरूप धारण केले आणि दुष्टांचा पराभव केला. शुंभ- निशुम्भासारख्या दैत्यांचा पराभव करताना रणांगणावर चौसष्ट योगिनींचे सैन्य सामूहिकपणे धावून आले आणि चामुंडारूपी देवीला त्यांनी सहाय्य केले. महिषासुर हा सहजतेने विविध रूपे धारण करून सुजानांना त्रास देणारा दैत्य. आधुनिक काळातही असे मानवरूपी असुर स्त्रीजातीला त्रास देताना दिसतात. स्त्रियांनी एकत्रितपणे अशा दुष्टंचा संहार करून पुरुषार्थ गाजविला पाहिजे.असा संकल्प नवरात्रीच्या निमित्ताने करावा लागेल असे सुचवावेसे वाटते.आर्या जोशी (चर्चा)
उपरोक्त आर्या जोशी यांचा प्रतिसाद २९ ऑगस्ट २०१६ चा असावा असे प्रथम दर्शनी दिसते. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:३०, १ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]
टिपणी: सदस्या आर्या जोशी यांच्या उपरोक्त प्रतिसादास वर्ष उलटून गेले आहे. आता पर्यंत ज्ञानकोशीय परिघाबद्दल त्यांचा दृष्टीकोण नक्कीच अधिक उन्नत झालेला आहे. तरी पण इतर वाचकांच्या दृष्टीने या टिपणीच्या माध्यमातून काही निरीक्षणे नोंदवणे सयुक्तीक ठरावे असे वाटते. ज्ञानकोशात आत्मीयता असलेल्या विषयावर लेखन करता येते पण ते तटस्थवृत्तीने करावे लागते. ज्ञानकोशाचा अप्रत्यक्ष उपयोग प्रबोधनासाठी अथवा रंजनासाठीही होत असेल पण वस्तुनिष्ठतेच्या निकषावर उतरण्याच्यादृष्टीने जसे कले साठी कला ही संकल्पना असते तसे ज्ञानकोशात ज्ञानासाठी ज्ञान ही संकल्पना असते. ज्ञानकोशांचा उद्देश प्रबोधन अथवा वाचकाला विवेक देणे नसतो. वाचकाला विवेक असतो असे गृहीत धरण्यापलिकडे ज्ञानकोशीय लेखकास फारसा वाव नसतो. म्हणून सहसा व्यक्तिगत मते टाळण्याकडे आपणा सर्व ज्ञानकोश लेखकांचा कल असतो हे ओघाने येतेच. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:५१, १ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

देवीचा नवरात्री उत्सव हा उपासनेचा भाग आहे. वेगवेगळ्या रंगांच्या साड्या नेसणे हा भाग या उपासनेचा भाग नसून तो केवळ हौसेचा आहे. धर्माशी त्याचा थेट संबंध नाही हे लकशात घेवून काही अनावश्यक भाग काढून टाकीत आहे.आर्या जोशी (चर्चा)

आर्या जोशी यांचा उपरोक्त प्रतिसाद १८ ऑगस्ट २०१७ चा असावा असे दिसते

विकिपीडियामधील लेख हे कदापि धार्मिक थाटाचे नसतात. हा माहितीकोश आहे, धर्मकृत्यकोश नाही. या कोशात जे शास्त्रीय कसोटीवर टिकणार नाही, अशा विधींना, कर्मकांडांना आणि थोतांडांना जागा नाही. त्यामुळे लेखात आलेल्या कर्मकांडविषयक सर्व मजकुराला फाटा द्यावा. विकिपीडियात प्रथम-द्वितीय पुरुषी सर्वनामे व क्रियापदे नसतात. त्यामुळे आज्ञार्थ-विध्यर्थ काळातली रूपे वर्ज्य आहेत. कर्मकांडातले मंत्र आज्ञार्थी किंवा विध्यर्थी असतात, ते माहितीकोशात असूच शकत नाहीत.

प्रेक्षणीय स्थळावरच्या लेखात, 'अमुक स्टेशनवर उतरा, तमुक दिशेने इतकी पावले चाला, "ह्या' स्वयंभू देवीचे मंदिर लागेल, तिला नवस करावा, फलाणेफलाणे फळ मिळेल', असली माहिती कितीही उपयुक्त असली तरी ती विकिपीडियावर चालत नाही.

खालील मजकूर हा तथाकथित धर्मविधी नाही, ती माहिती आहे आणि तो इतिहास आहे. ती माहिती लेखात योग्य त्या जागी परत स्थानापन्न करावी. ... (चर्चा) १७:०६, २३ ऑगस्ट २०१७ (IST)[reply]

इसवी सन २०१४ सालच्या नवरात्रीतील दैनिक रंग[संपादन]

* इसवी सन २०१४ सालच्या नवरात्रीतील दैनिक रंग
  • पहिला दिवस (२५ सप्टेंबर, गुरुवार) - प्रतिपदा : पिवळा
  • दुसरा दिवस (२६ सप्टेंबर, शुक्रवार) - द्वितीया - हिरवा
  • तिसरा दिवस (२७ सप्टेंबर, शनिवार) - तृतीया - करडा (ग्रे)
  • चौथा दिवस (२८ सप्टेंबर, रविवार) - चतुर्थी - केशरी
  • पाचवा दिवस (२९ सप्टेंबर, सोमवार) - पंचमी - पांढरा
  • सहावा दिवस (३० सप्टेंबर, मंगळवार) - षष्ठी - लाल
  • सातवा दिवस (१ ऑक्टोबर, बुधवार) - सप्तमी - निळा
  • आठवा दिवस (२ ऑक्टोबर, गुरुवार) - अष्टमी - गुलाबी
  • नववा दिवस (३ ऑक्टोबर, शुक्रवार) - नवमी - जांभळा

इसवी सन २०१५ सालच्या नवरात्रीतील दैनिक रंग[संपादन]

  • पहिला दिवस (१३ ऑक्टोबर, मंगळवार) - प्रतिपदा : लाल
  • दुसरा दिवस (१४ ऑक्टोबर, बुधवार) - द्वितीया - निळा
  • तिसरा दिवस (१५ ऑक्टोबर, गुरुवार) - तृतीया - पिवळा
  • चौथा दिवस (१६ ऑक्टोबर, शुक्रवार) - चतुर्थी - हिरवा
  • सातवा दिवस (१९ ऑक्टोबर, सोमवार) - सप्तमी - पांढरा
  • आठवा दिवस (२० ऑक्टोबर, मंगळवार) - अष्टमी - गुलाबी
  • नववा दिवस (२१ ऑक्टोबर, बुधवार) - नवमी - जांभळा

२०१६ साली प्रतिपदा लागोपाठ दोन दिवस असल्याने नवरात्र दहा दिवसांचे होते. (यापूर्वी २०१२ साली ते आठ दिवसांचे होते!.)

इसवी सन २०१६ सालच्या नवरात्रीतील दैनिक रंग[संपादन]

  • दिवस पहिला – १ ऑक्टोबर, शनिवार, प्रतिपदा - राखाडी (ग्रे)
  • दिवस दुसरा – २ ऑक्टोबर, रविवार, प्रतिपदा - भगवा (ऑरेंज)
  • दिवस तिसरा – ३ ऑक्टोबर, सोमवार, द्वितीया - सफेद (व्हाईट)
  • दिवस चौथा – ४ ऑक्टोबर, मंगळवार, तृतीया, - लाल (रेड)
  • दिवस पाचवा – ५ ऑक्टोबर, बुधवार, चतुर्थी - निळा (रॉयल ब्लू)
  • दिवस सहावा – ६ ऑक्टोबर, गुरुवार, पंचमी - पिवळा (यलो)
  • दिवस सातवा – ७ ऑक्टोबर, शुक्रवार, षष्ठी - हिरवा (ग्रीन)
  • दिवस आठवा – ८ ऑक्टोबर, शनिवार, सप्तमी- मोरपंखी (पिकॉक ग्रीन)
  • दिवस नववा – ९ ऑक्टोबर, रविवार, अष्टमी - जांभळा (पर्पल)
  • दिवस दहावा – १० ऑक्टोबर, सोमवार, नवमी - आकाशी (Sky Blue)
  • दिवस अकरावा (दसरा) - ११ ऑक्टोबर, मंगळवार - गुलाबी (Pink)

' (चर्चा) १७:०६, २३ ऑगस्ट २०१७ (IST)[reply]

नवरात्र हा विषयच मुळात धर्म या काक्षेत येतो हे लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे विकी मानकाप्रमाणे बदल करताना देखील काही धार्मिक देवतांची नावे,संदर्भ हे अपरिहार्यपणे द्यावे लागतीलच.तसेच यातील पूजाविधी आणि आरती इ. भाग विकी स्रोत वर हलविला आहे. एखाद्या संकल्पनेचा इतिहास व त्यावरचा विचार नोंदविताना देखील त्याचे संदर्भ द्यावे लागतील, तरच ते मानकाप्रमाणे होतील.आर्या जोशी (चर्चा)

आर्या जोशी यांचा उपरोक्त प्रतिसाद २९ ऑगस्ट २०१७ चा असावा असे प्रथम दर्शनी दिसते. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:३०, १ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

उल्लेखनीयता चर्चा[संपादन]

ज्ञानकोशीय उल्लेखनीयते बाबत काही रोचक मुद्दे हिरहिरीने दोन्ही बाजूने मांडले जात आहेत. असे मुद्दे सहसा चर्चेत येत नाहीत त्यामुळे आपण या चर्चेस एक चांगली संधी समजूयात.

सदस्य ज यांचा "विकिपीडियात प्रथम-द्वितीय पुरुषी सर्वनामे व क्रियापदे नसतात. त्यामुळे आज्ञार्थ-विध्यर्थ (आख्यातातील:वाख्यात) काळातली रूपे टाळावयाची असतात." हा मुद्दा रास्तच आहे. आणि सदस्य आर्या जोशी यांना त्याची आता सर्वसाधारण कल्पना आलेली असावी असे दिसते.

नवरात्र हा विषयच मुळात धार्मिक असल्यामुळे अनुषंगिक उल्लेखांचा समावेश करावा लागतो हे ही समजण्यासारखे आहे. ज्ञानकोशास अगदी समाजातील उल्लेखनीय समज आणि मान्यतांचीही दखल घ्यावी लागते (येथे उल्लेखनीय हा शब्द ज्ञानकोशीय उल्लेखनीयता निकषांच्यादृष्टीने महत्वाचा आहे) अर्थात हे सारे शक्यतोवर त्रयस्थ संदर्भा सहीत शक्य तेथे दुजोरा घेऊन लिहावयाचे असते. भारतीय आणि मराठी सांस्कृतीक ज्ञान आणि माहितीच्या प्रथम स्रोताच्या अनुपलब्धतेच्याही मर्यादा असतात त्यामुळे जिथे आपली माहिती रास्त आहे पण संदर्भांची अनुपलब्धता आहे तेथे अशी माहिती प्रथम एखाद्या मराठी संवाद संकेतस्थळावर जसे की मायबोली/मनोगत/मिसळपाव/ऐसीअक्षरे अशा चर्चात्मक संस्थळावर साधक बाधक चर्चेसाठी टाकावी. आणि मग अशा माहितीचा साक्षेपी तटस्थ आणि तर्कसुसंगत स्विकार करावा.

वर म्हटल्या प्रमाणे उल्लेखनीयता हा महत्वाचा निकष आहे. गोष्ट धार्मिक आहे का अधार्मिक हा महत्वाचा प्रश्न नाही. जरुर भासल्यास प्रत्येक वाक्याची स्वतंत्र उल्लेखनीयता चर्चा चर्चा पानावर करावी हे रास्त असावे.

समजा नवरात्रीतील फुलांच्या माळांना धार्मीक महत्व आहे. आणि साड्यांच्या रंगांना धार्मिक महत्व नाही पण सांस्कृतीक महत्व आले आहे. ज्ञानकोशासाठी जो पर्यंत उल्लेखनीयता आहे तो पर्यंत दोन्हीचे उल्लेख महत्वाचे असतील त्यांचे महत्व धर्मामुळे असो अथवा संस्कृतीमुळे असो. मराठेशाहीच्या आणि पेशव्यांच्या नवरात्रोत्सवाचे असो वा म्हैसुरराजांच्याच्या नवरात्रोत्सवाची उल्लेखनीयता असेल पण प्रत्येक तिथीला ते काय करत याची उल्लेखनीयता त्या विभागापुरती सिमीत असावी. त्यांनी संपूर्ण नवरात्रोत्सवावर तिथी अनुसार प्रभाव पाडला असेल तर पूर्ण लेखासाठी त्याची उल्लेखनीयता वाढेल.

फुलांच्या माळां अथवा आणि साड्यांचे रंग विशीष्ट समुहात विशीष्ट मंदिरात अथवा विशीष्ट शहरात पाळले जात असतील तर त्याची उल्लेखनीयता तेवढीच मर्यादीत ठेवावयास हवी. जर सार्वत्रिक असेल तर उल्लेखनीयतेस सार्वत्रिक असल्याचे महत्व द्यावे उद्देश धार्मिक आहेत वा सांस्कृतीक हे महत्वाचे नाही त्यांच्या ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेची पातळी महत्वाची ठरावी.

'ज' म्हणतात तसे संदर्भ उपलब्ध असतील तर सांड्यांच्या रंगांना सांस्कृतीक महत्व आले असून उल्लेखनीयता आली असू शकेल पण हे नेमके कोणत्या निकषांवर तपासणार ? शेवटी संदर्भ आणि दुजोऱ्यांच्याच ना ? केवळ एका वृत्तपत्राचाही संदर्भ पुरेसा असू शकतो पण दुसऱ्या माध्यमातील दुजोऱ्याची आवश्यकता नाही हे कसे निश्चित करावे ? म्हणजे सहसा माहिती दोन स्रोतातून आलेली अधिक उत्तम. नसेल तर अथवा साशंकता वाटल्यास उपलब्ध संदर्भ जोडून दुजोरा हवा चा साचा लावावा.

'ज' आग्रह करत असलेल्या साड्यांच्या रंगांचा आणखी एक प्रश्न असाकी त्यांची वर्षानुरूप माहिती यादी स्वरुपात आहे. ज्ञानकोशात शक्यतोवर परिच्छेद लेखन असावे असे अभिप्रेत आहे. दुसरा आणखी एक निसटता मुद्दा असा की समजा साड्यांच्या रंगाची पद्धत दिडशे वर्षा पासून असती तर तुम्ही मागच्या दिडशे वर्षातील अथवा येत्या दिडशे वर्षातील साड्यांचे रंगाची यादी वाढवत जाणार का ? आणि रोज हसतो अथवा रोज मरतो त्यासाठी ज्ञानकोश हसत अथवा रडत नाही. परंपरांची दखल घेतो याद्या गोळा करत नाही. याद्या गोळाकरण्याची जबाबदारी वस्तुत: प्रथम स्रोतांची. मराठी विकिपीडियात आपण बाळगलेली लवचिकता लक्षात घेऊननही, विकिपीडिया माहितीचा प्रथम स्रोत नाहीतर समसमिक्षीत माहितीवर अवलंबून असणे अभिप्रेत असते. त्यामुळे लेखात संदर्भ आणि दुजोऱ्यांशिवाय याद्या जोडणे आणि त्यांना दाखवा लपवा साचाही न लावणे कितपत सयुक्तिक आहे या बद्दल साशंकता वाटते. असो.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:३८, १ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

नवरात्रीचे नऊ रंग[संपादन]

"साड्यांच्या रंगाची पद्धत दिडशे वर्षा पासून असती तर तुम्ही मागच्या दिडशे वर्षातील अथवा येत्या दिडशे वर्षातील साड्यांचे रंगाची यादी वाढवत जाणार का ? " हा वेडगळ प्रश्न आहे. यादी ही नऊ रंगांचीच असणार, ती वाढेल कशी? विकीपीडिया परंपरांची दखल घेतो, मग नवरात्रीतल्या नऊ दिवसांसाठी परंपरेने जे रंग ठरले आहेत त्यांची दखल का घेतली जात नाही?

पेशवाईच्या उत्तरकाळातील नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ रंग पुढील दुव्यावर आहेत. : [१]


लेखाचे नाव बदल प्रस्ताव[संपादन]

या लेखाचे नाव शारदीय नवरात्र असे मुद्देसूद व नेमके करावे असे वाटते.आर्या जोशी (चर्चा)

आर्या जोशी यांचा उपरोक्त प्रतिसाद २९ ऑगस्ट २०१७ चा आहे असे प्रथम दर्शनी दिसते. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:३०, १ सप्टेंबर २०१७ (IST) चर्चा प्रस्ताव स्वतंत्र सोईस्कर विभागात टाकला.[reply]

लेखाचे काम पूर्ण करीत आणले आहे. आशय पाहता कृपया शारदीय नवरात्र असा नावात बदल करावा ही विनंती.आर्या जोशी (चर्चा)

@माहितगार| सदर लेखात छायाचित्रे नीट दिसत नाही आहेत. पसरत झाली आहेत आणि मध्ये मोकळी जागा खूप वाया जाते आहे. कृपया मार्गदर्शन करावे.आर्या जोशी (चर्चा)

छायाचित्रे तात्पुरती चित्रदालन विभागात हलवली पण वस्तुत: माहितीचौकट साचाची गरज आहे ज्यात काही छायाचित्रे कोलाज करुन मग काही चित्रे विभागातून आणि काही चित्रे चित्रदालन विभागातून असे करणे श्रेयस्कर असावे. सणौत्सवांसाठी कुणी माहिती चौकट बनवून देत असेल तर पाहुयात.
@सुबोध कुलकर्णी: केवळ माहिती चौकटी कशा बनवाव्यात या विषयावर एक हॅकेथॉन कम वर्कशॉप तुमच्या यादीत घ्या बरे. बऱ्याच वर्षांचा प्रश्न धसास लावणे बाकी आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:०६, ३ ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]


@Tiven2240 आणि आर्या जोशी:

या लेखावर अनेक संपादकांनी मजकूर पेस्ट केलेला आढळतो. त्याचा मजकूर येथे पाहावा

प्रताधिकार भंग असल्याची खात्री करावी. नसल्यास साचा काढून टाकावा. प्रसाद साळवे (चर्चा) २२:३१, २ जून २०१८ (IST)[reply]

@Sureshkhole: please give copyvio report of carbon dating --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २३:५९, २ जून २०१८ (IST)[reply]

प्रताधिकार भंग शंका अहवाल[संपादन]

या लेखामध्ये तीन ठिकाणावरील मजकूर प्र.शंका दाखवत आहे. त्यांचा निम्नोक्तानूसार साक्षेप मांडत आहे.

SEPTEMBER 21, 2017 या तारखेला विकीवरूनच नकल-डकव करून तेथे लिहीला आहे. याचे कारण त्यांनी हा लेख लिहीण्या पुर्वीच्या इतिहासात येथे तो मजकूर विकीवर आधीच अस्तित्वात होता हे पहाता येते. त्यामुळे या ठिकाणी विकीवरून मजकूर नकल-डकव झाला आहे.

  • त्याच प्रमाणे दुसरा दुवा म्हणून दाखवत आहे. त्या पोस्टचा दिनांक October 7, 2016 हा आहे आणि लेखाच्या इतिहासात त्या दिनांका आधीचा इतिहास तपासला असता तो मजकूर तेथे आधीच अस्तित्त्वात असल्याचे दिसते. त्या मुळे विकीवरून तो मजकूर नकल-डकव केला गेला आहे हे सिध्द होते.
  • तिसरा दुवा, हा एका युटूब व्हिडीयोच्या मजकूराचा असून तो मजकूर Demon Singh यांनी Published on 20 Sep 2017 रोजी मराठी विकीवरील लेखातून मजकूर घेऊन लिहीला आहे, कारण त्या आधीच्या तारखेला लेखाच्या इतिहासात पाहिले असता तो मजकूर सापडतो.

अश्या प्रकारे प्रत्येक लेखाची तपासणी करावी लागेल तेव्हा लक्षात येईल की, कुठून कुठे मजकूर गेला आहे. मी उदाहरणा दाखल, साळवे यांनी केलेल्या उद्योगाचा आणि निष्कारण इतर सदस्यांना त्रास देण्याच्या उत्पाती संपादनाचा पर्दाफ़ाश केला आहे. इतर ठिकाणी त्यांनी लावलेले साचे काही फ़रकाने अश्याच प्रकारे लावलेले आहेत. तेही मी समोर आणीनच. कारण अश्याप्रकारे निष्कारण लावलेल्या साच्यांची खरी बाजू तपासण्यात इतर सदस्यांचा आणि प्रचालकांचा वेळ आणखीन एकदा वाया घालवला आहे. अनेकदा सुचना, समज, सल्ला देऊनही वारंवार अशी उत्पाती संपादने केली गेली आहेत हे लक्षात घेता त्यांना तात्काळ अवरुध्द करण्यात यावे. आत्तापर्यंत आपल्या सर्वांचा पुष्कळ वेळ त्यांना समजवण्यात, समजून घेण्यात, शिकवण्यात आणि त्यांचे उद्योग सहन करण्यात वाया गेलेला आहे. या पुढे मला तो असाच वाया जावा असे आजिबात वाटत नाही त्यामुळे प्रचालकांनी @अभय नातू आणि Tiven2240: पुढील कारवाई करावी ही विनंती. WikiSuresh (चर्चा) ०४:२९, ३ जून २०१८ (IST)[reply]

त्याच प्रमाणे दुसरा दुवा म्हणून दाखवत आहे. क्लिक करून पाहावा स्पष्टीकरण मजकुर दिसत नाही. प्रसाद साळवे (चर्चा) ०९:४२, ३ जून २०१८ (IST)[reply]

प्रताधिकार भंग शंका[संपादन]

या साचाचे नावच मुळात प्रताधिकार शंका आहे. एकाद्या लेखात तशी शंका आली तर ती व्यक्त करणे चुकीचे अजिबात नाही हे सुरेश यांना माहित नसावे.

निष्कारण इतर सदस्यांना त्रास याचा सुरेश यांना त्याच्या कामाच्या व्यापामुळे त्रास होत असेल तर त्यंनी विकिपीडिया सोडून द्यावे. इतर ठिकाणी त्यांनी लावलेले साचे काही फ़रकाने अश्याच प्रकारे लावलेले आहेत. तेही मी समोर आणीनच. आरोप करण्यापेक्षा समोर आणूनच बोलावे. वायफळ बढाई मारू नये. इतर सदस्यांचा आणि प्रचालकांचा वेळ आणखीन एकदा वाया घालवला आहे. इतर सदस्य म्हणजे कोण ?? मी साद लेखात संपादन करणारे व प्रचालक टायविन यांना दिली आहे. या लेखात मी तुम्हाला साद दिलीच नाही वेळगेला वेळ गेला असे म्हणून उपयोग नाही. राहिला प्रचाल्कांचा वेळ जातो तर टायविन हे कॉपीराईट बद्दल जागरूक व समंजस प्रचालक आहेत म्हणून मला ज्या लेखात शंका आली तेथे मी त्यांनाच साद दिली तर त्यांचा वेळ गेला असे होत नाही. (नातू यांना साद दिली नाही उलट तुम्हीच त्यांना या चर्चेत बोलून नातू यांचा वेळ घेत आहात)आणि तुम्हीच स्वतःला प्रचालक समजत असाल तर ते आधी डोक्यातून काढून टाका. आणि वेळ द्यायला जमत नसेल तर विकिपीडिया सोडा. प्रसाद साळवे (चर्चा) ०७:३४, ३ जून २०१८ (IST)[reply]

इतर ठिकाणी लिहिल्यानुसार {{प्रताधिकारित मजकूर शंका}} येथे दिलेल्या संकेतांचे कटाक्षाने पालन करावे.
अभय नातू (चर्चा) २१:१८, ४ जून २०१८ (IST)[reply]

साड्यांचे रंग[संपादन]

@अभय नातू: @V.narsikar: नमस्कार ! विषय जुना आहे, पण पुन्हा यावर्षी आपल्याशी चर्चात्मक बोलणे करावे असे वाटले. ज यांनी तीन वर्षातील नवरात्रीत महिला कोणत्या रंगाच्या साड्या नेसतात इत्यादी माहिती घालून लेख वाढविला आहे . सांस्कृतिक बदल दाखवायचा असल्यास एखाद्या वर्षातील साड्यांचे रंग नुमन्याला नोंदविण्यासाठी हरकत नाही. पण यापूर्वीही त्यांनी अट्टहासाने आणि प्रसंगी वादविवाद करून आपलेच म्हणणे रेटले आहे जे संपादिका म्हणून मला योग्य वाटत नाही. त्याऐवजी त्यांनी नोंदविलेला भाग कमी करता येईल आणि त्याजागी एखादा महत्वाचा दुसरा मुद्दा घालता येईल असे वाटले.लेखाची लांबी विनाकारण वाढविण्यात अर्थ नाही. त्यांची सर्व माहिती रद्द करावी असे अजिबात नाही पण लेखाची गुणवत्ता पाहता काही भाग काढावा असे वाटते आहे. मी गणपती हा लेख संपादित केला त्यावेळी लक्षात आले की महिनाभरात सुमारे १७,००० लोकांनी तो वाचला आहे ! त्यामुळे नवरात्रीच्या निमित्ताने लोक हा लेख पण वाचतील अशी आशा आहे. सर्वच संपादकांचे योगदान महत्वाचे आहेच हे मला मान्य आहे, तथापि मी साचा लावून काम करणारा असल्याने या लेखातील मजकूर वगळण्याविषयी आणि लेखाच्या गुणवत्तेच्या दृष्टीने आपले मार्गदर्शन मिळावे असे वाटले. धन्यवाद ! उत्तराच्या प्रतीक्षेत , आर्या जोशी (चर्चा) ०८:३३, १९ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]

माझे मते ही माहिती चर्चापानावर हलवावी व पुढे जावे. अभयचे म्हणणेही कृपया जाणून घ्यावे.--वि. नरसीकर , (चर्चा) ०८:४४, १९ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]
कोणती साडी नेसणे, इ. माहिती नवरात्राशी थेट संबंधित नसली तरी त्याला सामाजिक महत्व आहे. ही व अशी माहिती नवरात्राविषयीच्या सामाजिक कल्पना या किंवा तत्सम शीर्षकाच्या लेखात हलवावी. अनेकदा मूळ विषयाला धरुन काही रुढी, परंपरा तयार होतात. काही काळाने त्या लोप पावतात परंतु अशा (विश्वकोशीय आणि उल्लेखनीय) गोष्टींबद्दलची माहिती लिहून ठेवली पाहिजे. यात अगदी खूळ वाटणाऱ्या गोष्टीही येतात. काही वर्षांपूर्वी भारतातील गणपतीच्या मूर्ती दूध पितात अशी आवई उठली होती. याबद्दलची माहिती गणपतीबद्दलची नसून (भारतातील) समाजाच्या वागणुकीबद्दलची आहे. ही माहिती गणपती लेखात मुळीच बसणार नाही परंतु मास हिस्टेरिया[मराठी शब्द सुचवा] या लेखात ही माहिती बरोबर बसेल. प्रस्तुत माहिती (साड्यांचे रंग) ही अशीच काहीशी आहे. कदाचित त्याला अधिक प्राचीन परंपरा वा कारणमीमांसाही असेल. असे असताही ही माहिती इतरत्र हलवून नवरात्र लेखातून दुवा द्यावा.
अभय नातू (चर्चा) १५:२३, १९ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]


@अभय नातू: @V.narsikar: नमस्कार ! मनापासून धन्यवाद !

स्वतंत्र लेख[संपादन]

वर्षात चार वेगवेगळ्या नवरात्री असतात. त्यामुळे हे लेख वेगवेगळे असावेत. नवरात्रीचा स्वतंत्र लेख असताना सगळा मजकूर काढून "शारदीय नवरात्रीला" पुनर्निदेशन दिले गेले आहे. ती जुनी आवृत्ती पुनर्प्रस्थापित करावी, ही विनंती.

cc: @संतोष गोरे @Khirid Harshad

--अमर राऊत (चर्चा) ११:५८, २६ सप्टेंबर २०२२ (IST)[reply]

कृपया या लेखपानाच्या सुरुवातीला लावलेला निःसंदिग्धीकरणाचा साचा पहावा. त्यानुसार नवरात्र (निःसंदिग्धीकरण) येथे आपल्याला नवरात्री वरील तीन लेख दिसून येतील. याव्यतिरिक्त आपण अजून दोन उर्वरित नवरात्री वरील लेख आपल्या सवडीने लिहू शकता.-संतोष गोरे ( 💬 ) १४:००, २६ सप्टेंबर २०२२ (IST)[reply]
@संतोष गोरे: धन्यवाद. उर्वरित लेख आताच लिहायला घेतो.
-- अमर राऊत (चर्चा) १४:१५, २६ सप्टेंबर २०२२ (IST)[reply]