चर्चा:नंदकुमार विष्णू मोरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

उल्लेखनीयता चर्चा[संपादन]

Gnome-edit-redo.svgTiven2240, नंदकुमार माेरे:

जेव्हा एखादी व्यक्ति स्वत:बद्दल लिहिते तेव्हा आपण {{लेखनऔचित्य}} साचा लेखात लावतो. (दुसऱ्या सदस्याने संपादन केल्यानंतर साचा काढून घेतो). स्वत: बद्दल लिहिणाऱ्या सदस्याच्या चर्चा पानावर {{हितसंघर्ष}} साचा लावतो. या लेखात मी स्वत: लगेच संपादन करुन दुरुस्ती केली म्हणून {{लेखनऔचित्य}} साचा लावला नव्हता. डॉ. मोरेंची अनुभवी विकिपीडियन सोबत दोन-चार दिवसात कार्यशाळेत भेट होण्याची शक्यता आहे आणि स्वत: बद्दल लेख नामविश्वात न लिहिण्याचा संकेत व्यक्तिश: सांगणे अधिक प्रशस्त ठरते म्हणून {{हितसंघर्ष}} साचा त्यांच्या चर्चा पानावर लावण्याची घाई केली नव्हती.


जिथपर्यंत त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि त्यांना राज्यशासनाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत तिथपर्यंत लेखाच्या ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेचा प्रश्न नाही. तो साचा आपण अनवधानाने लावलेला असल्यामुळे काढतो आहे. संगणकावर मराठीचा वापर व मराठी युनीकोड कार्यशाळेचा अनुभव यास संदर्भ नसला तरीही ही मराठी भाषेची आणि मराठी विकिपीडियाची गरज आहे, आणि सदस्यांवर शक्यतोवर विश्वास ठेवण्याचाही विकिपीडिया संकेत आहे त्यामुळे याकडे जाहीरात म्हणुन न बघता लवचिकतेने बघावयास हवे.

प्रा.डॉ. नंदकुमार मोरेंनाही संकेतांची माहिती व्हावी म्हणून हा संदेश त्यांनाही मार्क केला आहे. आपणा दोघांनाही पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:१५, २१ जानेवारी २०१७ (IST)