चर्चा:देवक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

निःसंदिग्धीकरण[संपादन]

Gnome-edit-redo.svg: Gnome-edit-redo.svgआर्या जोशी:

'देवक'ची मराठी विश्वकोशातील व्याख्या, 'इश्वर नाहीत अशा पण इश्वर समकक्ष पूजनीय अथवा पवित्र परंतु प्रतीकांना देवक संबोधले जाते" अशी इंग्रजी मधील Totem या शब्दाशी समकक्ष आहे. तर या लेखात देवक म्हणजे सर्वच देवांचा विशीष्ट प्रसंगी केलेला कुलाचार या अर्थाने आलेले दिसते.

या दोन वेगळ्या संकल्पनांचे निःसंदिग्धीकरण कसे करावे ?

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:२६, ७ सप्टेंबर २०१७ (IST)

ठिक आहे, लग्न/विवाह देवक हे शीर्षक अनवधानाने अभय नातूंनी नुसत्या देवक शीर्षका कडे स्थानांतरीत केल्यामुळे कदाचित गोंधळ होत होता. त्याला विभाग शीर्षाकात रुपांतरीत करुन निस्तरता येईल असे वाटते.


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:१८, ७ सप्टेंबर २०१७ (IST)


विश्वकोशातली व्याख्या बरोबर आहे. लग्न किंवा मुंज यांच्या आरंभी जे देवक बसवले जाते त्याच्या मागची कल्पना हीच असावी. शब्दकोशातल्या अर्थाप्रमाणे देवक म्हणजे ‘कार्याच्या सिद्धीसाठी तात्पुरती स्थापिलेली देवता (एकवचन)’. .... (चर्चा) २०:२४, ७ सप्टेंबर २०१७ (IST)

देवक या शब्दाला इतरही अर्थ आहेत. १. कंसाचा काका. याला सात मुली होत्या. त्या सर्व वसुदेवाला दिल्या, देवकी त्यांपैकी एक.

२. ९६ कुळी मराठ्यांमधली देवकाची कल्पना - ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते. उदा० वृक्ष, पान, फूल, वेल, साळुंकीचे किंवा मोराचे पीस, शस्त्र इत्यादी. ... (चर्चा) २०:३४, ७ सप्टेंबर २०१७ (IST)

देवक (निःसंदिग्धीकरण) असे पान तयार करून त्यात देवक शब्दांच्या वापरांची खानेसुमारी असावी व तेथून वेगवेगळ्या लेखांकडे दुवे असावे.
या लेखाचे देवक (लग्नविधी) असे स्थानांतरण करावे.
अभय नातू (चर्चा) २२:५३, ७ सप्टेंबर २०१७ (IST)

चर्चा वाचली आहे. कोशांमध्ये पहाते आणि थोडा विचार करून मग नोंदवते दोन दिवसात. धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा) @माहितगार @अभय नातू संस्कृती कोशात विश्वकोशाच्या प्रमाणेच माहिती आहे, फक्त अधिक सुस्पष्ट आहे. त्यामुळे विश्वकोशातील माहिती ठेवावी की काढावी? संस्कृती कोशातील मजकूरही पुरेसा वाटतो आहे.आर्या जोशी (चर्चा) लग्नाच्या देवकाला देवक बसविणे असे म्हणतात. त्याच नावाने तो स्वतंत्र लेख करावास असे वाटते.आर्या जोशी (चर्चा)

संपादन[संपादन]

Gnome-edit-redo.svgआर्या जोशी: मॅडम, तुम्ही मोलाचे संपादन करित आहात. संपादन सुधारासंबंधी एक सुचवावेस वाटते. जेव्हा तुम्ही एखादे वाक्य पूर्ण करून शेवटी पूर्णविराम देता, त्यावेळी "एक स्पेस/जागा सोडून" पुढील अक्षर/शब्द वापरा. स्वल्पविराम दिल्यावरही एक जाना सोडून पुढील शब्द वापरा. संपादन अधिक उत्तम होईल. --संदेश हिवाळेचर्चा १६:०१, ११ ऑक्टोबर २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १६:०१, ११ ऑक्टोबर २०१७ (IST) Gnome-edit-redo.svgसंदेश हिवाळे: सूचनेसाठी धन्यवाद. नक्की करते.आर्या जोशी (चर्चा)