चर्चा:झेंगट

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झेंगट कि झेंगड? वाद्याचे नाव झेंगट असल्यास लेखाचे नाव झेंगट (वाद्य) असे असावे.

अभय नातू ०५:५५, ३१ ऑक्टोबर २००९ (UTC)

मी मोल्सवर्थ श्ब्दकोश तपासला 'झेंगट' बरोबर आहे.जेंगट झंगट जांगट हिसुद्धा पुर्वी उच्चारणे असावीत. मला वाटते 'झेंगड' महान्यूज संकेतस्थळावरील लिपीकाची मुद्राराक्षसी झोप असावी.
काहीसा वेगळ्या अर्थाने झेंगट्या शब्दही मोल्स्वर्थ शब्द कोशात दिसतो. झेंगट लावणे हा वाक्प्रचार आणि झेंगट्या यावर विक्शनरीत शब्दकोशिय लेख संभवतात पण विश्वकोशिय लेख 'झेंगट (वाद्य) बद्दलच संभवतो असे वाटते. तरीसुद्धा शीर्षकलेखन संकेतानुसार अधीक सुयोग्य काय् वाटते ते सांगावेत म्हणजे तसे करता येईल.

माहितगार ०६:४१, ३१ ऑक्टोबर २००९ (UTC)

झेंगट हा शब्द लचांड, कटकट या अर्थाने वापरला जातो. झेंगट हे वाद्य असते हे अपवादानेच माहिती असणार. त्यामुळे झेंगट (वाद्य) हे शीर्षक बरोबर वाटते. झेंगट लेखावर गल्लत, हा लेख, हेसुद्धा पहा, इ. वापरून या लेखाकडे दुवे असावेत.
अभय नातू ०६:४८, ३१ ऑक्टोबर २००९ (UTC)
तुमचे म्हणणे पटले व झेंगट (वाद्य)' असा लेख तयार केला आहे. केवळ दुवा निर्मिती पुरता हा लेख ठेववा असे वाटत नाही कारण या लेखात व्याख्येव्यतैरीक्त वेगळी अधीक काही विश्वकोशिय माहिती येण्याची शक्यता नाही माझ्या मते हा लेख वगळण्यास हरकत नसावी .माहितगार ०७:०३, ३१ ऑक्टोबर २००९ (UTC)

शब्दकोशिय[संपादन]

शब्दकोशिय 2409:4064:4DB6:5135:4F2C:730F:CB8E:4912 ०७:५८, ७ जानेवारी २०२२ (IST)[reply]