चर्चा:गुरमुखी

    विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

    स्थानांतरण अनुचित[संपादन]

    गुरुमुखी ह्या पानाचे नाव गुरमुखी करणे अयोग्य आहे. हिंदीत, बंगालीत आणि मलयालममध्ये लिहितात तसे मराठीतही गुरुमुखी असेच लिहिणे उचित आहे. अगदी पंजाबीत किंवा इंग्रजीत गुरमुखी असले तरी. पंजाबीत मालाडला मलाड म्हणतात, सामानला समान, स्पोर्टला इसपोर्ट आणि सपोर्टला स्पोर्ट. ही पंजाबीची उच्चारपद्धती आहे. इंग्रजी स्पेलिंग त्या उच्चारानुसार होते. इंग्रजी मथुराचे स्पेलिंग Muthra होते, कारण मथुरेला मथुरेत मथ्रा म्हणतात. मराठी मुत्रा म्हटले तर कसे वाटेल? मराठीतले उच्चार हे संस्कृतसिद्ध व व्याकरणशुद्ध असतात. गुरुमुखी म्हणजे गुरूच्या मुखातून बाहेर पडलेल्या अक्षरांसाठीची लिपी, गुराच्या तोंडातून बाहेर पडलेल्या नाही. पान पूर्ववत गुरुमुखीकडे वळवावे....J ०७:४१, २४ जून २०११ (UTC)