चर्चा:कृत्तिका (नक्षत्र)
Appearance
या नक्षत्राचे नाव कृत्तिका आहे कि कृतिका?
अभय नातू (चर्चा) २०:५७, ७ नोव्हेंबर २०१७ (IST)
- कृत्तिका
--वि. नरसीकर , (चर्चा) २१:११, ७ नोव्हेंबर २०१७ (IST)
कृत्तिकाच बरोबर. संस्कृतमध्ये कृत् (कृन्तति-कृन्तते) हा ६व्या गणाचा धातू आहे. अर्थ - कापणे, तुकडे करणे. या धातूपासून कृत्ति आणि कृत्तिका हे शब्द बनले. मूळ धातू कृ असता तर कृतिका झाले असते, पण मूळ धातू कृ नसल्याने तसे झाले नाही.
कृत्तिका पासून कार्त्तिक आणि कार्त्तिकेय हे संस्कृत शब्द बनले.
कार्तिक आणि कार्तिकेय हे शब्द संस्कृत कोशात सापडले नाहीत. मराठीत फक्त कार्तिक असून, हिंदीत कार्तिक आणि कार्त्तिक असे दोन्ही शब्द वापरात आहेत. ....ज (चर्चा) २२:१९, ७ नोव्हेंबर २०१७ (IST)