चर्चा:उरल्या फक्त आठवणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेखक- धीरज जवाहरलाल शालगर.

द.भै.फ. दयानंद महाविद्यालय, सोलापूर.


...उरल्या फक्त आठवणी

उरल्या फक्त आठवणी

पळभर एका क्षणात होते

इवलेसे घरकुल उध्वस्त

बेफिकिरी संकटात पडी

अपघाताला करी निमंत्रित

जाणारा तो निघून जातो

उरलेल्यांनी काय करावे?

अपराध काही मुली न त्यांचा

अनाथ म्हणुनी जागी जगावे?

बंधू, भगिनी, आई, बाप घरी

पुत्र कोणाचा, कन्या कोणी

अपघाताने मारून जाता

घराघरातून करुण कहाणी

क्षणभर याचा विचार करुनी

वाहतुकीच्या नियमा पाळा

मनुष्य जन्म हा पुन्हा न मिळतो

अमोल जीवन ते सांभाळा.


संदर्भ-वरील कविता हि 'रस्ता सुरक्षा' ह्या पुस्तकातून घेतलेली आहे.