चर्चा:उरण
!! *उरणचा इतिहास* !! *उरण शहर हे ११०१ ते ११६२ या कलावधित वसले.* पहिले नाव *उरु-वत-वन* (११६२),दूसरे नाव *उरुवन* (१३३६),तिसरे नाव *ओरण* (१५५६),चौथे नाव *उरण* (आजपर्यंत).स्थापन झाल्यापासुन चंद्रगुप्त मौर्य व समुद्रगुप्त मौर्य यांची दिर्घकाल राजवट.देवगिरिचे यादव,पोर्तुगीज,आदिलशाह,इंग्रज व *१० मार्च १७३९ ला मानजी आंग्रे यांनी उरणचा कोट,द्रोणागिरी किल्ला व उरणचा परिसर जिंकून घेतला.* उरण शहर वसन्यापूर्वी येथे जंगल होते.हे जंगल केगाव,नागांव,द्रोणगिरी, करंजा ते जासई ,खोपटे खाडी पर्यंत पसरलेले होते.
- !!उरण परिसरातील गावांचा इतिहास!!*
- मोरे बंदर*- हे बंदर *चंद्रगुप्त मोर्यानी बसाविले*.उरण बसण्यापूर्वी मोरा बंदर होते. *मोर्य या शब्दावरुन मोरे नाव पडले.*
- देऊळवाडी*-इ.स.१५४२ च्या कालावधीत *श्री.महादेव रामजी* यानी देऊळवाडी बसवली.
- द्रोणागिरी किल्ला* -सध्याच्या उरण बस स्थानका समोर असलेल्या डोंगरावर हा किल्ला बांधलेला आहे.
द्रोणागिरी किल्ला देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात होता. इ.स.१५३० मध्येपोर्तुगीजांनी किल्ल्याची डागडुजी केली.१६ व्या शतकात काही काळ हा किल्ला आदिलशहाकडे होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांकडे गेला.मुंबई बेटाच्या संरक्षणाच्या दृष्टीने घारापूरी किल्ला, उरण गाव व उरण जवळील करंजा बेटावर असलेला द्रोणागिरी किल्ला महत्वाचा होता. * १० मार्च १७३९ ला मानाजी आंग्रे यांनी उरणचा कोट व द्रोणागिरी किल्ला इंग्रजांकडून जिंकून घेतला. *
- गडावर मुख्यप्रवेशद्वार ,पाण्याच्या टाक्या,प्रार्थना स्थळ,तटबंदी,पूर्वाभिमुख द्वार हे अजूनही सुस्थित आहेत.*
- घारापुरी लेणी व किल्ला*-
पाषाणात खोदलेली ही लेणी *इ.स.चे ९ वे शतक ते १३ वे शतक या कालखंडात निर्मिण्यात आली.* १९८७ साली या लेण्यांना *युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा * देण्यात आला. कोकणच्या मौर्यांची पुरी ही राजधानी होती. पुरी म्हणजे घारापुरी. १५ व्या शतकात आलेल्या पोर्तुगिजांनी येथिल लेण्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान केल. त्यानंतरच्या काळात *मराठ्यांची सत्ता घारापुरीवर* होती. घारापुरीच्या उजव्या बाजुच्या डोंगरावर *किल्ल्याचे अवशेष आहेत. ३५ फुट लांबीच्या दोन ब्रिटिश कालीन तोफा गडावर आहेत.*
- उरणचा कोट* - आत्ताचा उरणमध्ये कोटनाका आहे पूर्वी येथे किल्ला होता. *पोर्तुगिजांनी येथे किल्ला बांधल्याचा उल्लेख आहे*.किल्ल्याला भक्कम तटबंदी,दिंडी दरवाजा, शस्त्रागार ,दारुगोळा व दफ्तार खाना ठेवण्यासाठी भक्कम शिबंदी होती. *१० मार्च १७३९ रोजी मानाजी आंग्रे यांनी उरणचा कोट जिंकल्याचा उल्लेख आहे.* सध्या किल्ल्याची एक भिंत अस्तित्वात आहे.
- चांजे शिलालेख*- आताच्या चाणजे गावातील शिलालेख
१ . राजवंश व राजा-शिलाहार नृपती अपरादित्यदेव -वर्ष व तिथी -शके १०६० माघ शुद्ध प्रतिपदा,गुरुवार,१३ जानेवारी ११३९ २ . राजवंश व राजा -शिलाहार सोमेश्वरदेव वर्ष व तिथी- शके ११८२ चैत्र वदि १५ सोमवार,सूर्यग्रहण ,एप्रिल १२ इ.स.१२६०
- रानवड शिलालेख*-
राजवंश व राजा -शिलाहार सोमेश्वरदेव वर्ष व तिथी- शके ११८१ सिद्धार्थ संवत्सर,चैत्र वद्य १५ गुरुवार,२४ एप्रिल इ.स.१२५९
- या शिलालेखात दानधर्म केल्याचा उल्लेख आहे.सध्या हे शिलालेख मुंबई मधील श्री छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय येथे आहेत.*
- बोरी पाखडा,भोवरा*- इ.स.१५५६ साली त्याकाळचे उरण मुखिया (अधिकारी) श्री पुरुषोत्तम दास कावळे होते.व चांगुणाबाई ईनामदार होत्या.त्या धार्मिक होत्या.त्यानी पुरुषोत्तम दास कावले याना २४ हजार दोन रूपये देवून भूमी विकत घेतली.व त्या जागेवर बोरी पाखाडी व भोवरा ही गावे वसविली.पोर्तुगीजांची राजवट सुरु झाली.भूमी पोर्तुगीजानी काबीज केली व त्वरीत बोरी पाखाडी येथे *अर्ध्या मैल लांबीचा तुरुंग बांधला.* इ.स.१७४२ च्या दरम्यान मराठ्यांनी तुरंगावर हल्ला चढविला.पार मोडतोड केली.भिंती तोफांनी उध्वस्त केल्या.सुमारे २११ पोर्तुगीज सैनिकांनी शरणागती पत्करली.
- नागांव* -इ.स .१७५६ साली वसलेले गाव.
- पिरकोन*-इस्लाम बांधवांचे दैवत पिराचे स्थान. *उरण तालुक्यातील पहिली वसाहत.* इस्लाम बांधवांनी खुशीने हे गाव सोडले.
- आवारे* -आवारे हा एक *तालुका* होता (इ.स.१६३०) त्याची हद्द वशेणी व वेश्वी मधिल सर्व खेडी.
- कळंबुसरे*-कळंबेश्वर या देवाच्या (शंकर मंदिर) नावाने कळंबुसरे हे नाव पडले.
- पाणदिवे* -मूळनाव -पदेव (छोटी वसाहत) नंतर पंदेव.कालांतराने पाणदिवे झाले.
- वशेणी* -आवारे तालुक्याची पूर्वेकडील शेवटची हद्द.
- खोपटे*-प्रथम सात झोपड्या बांधपाड्यावर उभारणी.भेंडखळहून बरेच लोक राहण्यास आले.
- चिरनेर*- नेर म्हणजे मोठेगांव.जैसे बिकानेर ,जेलुसनेर.गावात असलेल्या गद्यगलीवरून शेकडो वर्षापूर्वी गावात झालेल्या दानधर्मावरून गावाचं प्राचीनत्व सिद्ध होतं.
- १९३० चा जंगल सत्याग्रह याच पवित्र भूमीत झाला.* महाराष्ट्राच्या इतिहासत सुवर्णअक्षराने लिहलेले गाव.
- दिघोडे* -गावाच्या शेजारी असलेल्या शंकर मंदिराच्या बाहेर असलेली *विरगळ* शेकडो वर्षापूर्वी येथे घडलेल्या समरप्रसंगाची साक्ष देतो. *त्या समरप्रसंगात गावाचे रक्षण करणाऱ्या विरांच्या स्मरणात बांधलेले हे छोटेशे स्मारक म्हणजे हि विरगळ होय.*
- वेश्वी*-आवारे तालुक्याची शेवटची हद्द.
- दास्तान फाटा*- सावकारी मोठी गोदामे (इ.स.१९००) *सावकारी भात ठेवन्याची गोदामे.* सावकार शाही गेली गोदामे गेली.
- जासई* शेतकऱ्यांचे दिवंगत नेते दि.बा.पाटील यांच्या नेतृत्वाखाली १६ व १७ जानेवारी १९८४ ला झालेल्या उरणच्या शौर्यशाली व गौरवशाली शेतकरी आंदोलनाला ३१ र्वष पूर्ण झाली येथे शेतकरी आंदोलन करण्यात आले तेंव्हा हुतात्मे झालेल्या हुतात्म्यांचे स्मारक जासई व पागोटे येथे आहे.
शेतकरी व प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वात सिडको व शासनाविरोधात भूसंपादनाच्या विरोधात १६ व १७ जानेवारी १९८४ ला शेतकरी लढा झाला. या लढय़ात १६ जानेवारी रोजी दास्तान फाटा येथे झालेल्या पोलिसांच्या गोळीबारात रघुनाथ अर्जुन ठाकूर (धुतूम) व नामदेव शंकर घरत(चिर्ले) या दोन शेतकऱ्यांनी हौतात्म्य पत्करले तर आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी १७ जानेवारी रोजी नवघर फाटा येथे झालेल्या गोळीबारात कमलाकर कृष्णा तांडेल व महादेव हिरा पाटील व केशव महादेव पाटील या पिता-पुत्रांसह पागोटे येथील तीन शेतकऱ्यांनी हौतात्म्य पत्करले. तर या आंदोलनात हजारो शेतकऱ्यांना कारावास झाला, लाठीमार सहन करावा लागला. त्यामुळेच या आंदोलनातून देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या संपादित जमिनीच्या बदल्यात विकसित जमीन देण्याचा कायदा झाला आहे. *आगरी,कोळी,कराडी या लोकांची लोकवस्थी येथे आहे*. *सध्या उरण तालुक्यात ६५ गाव आहेत*. *डॉ.बाबासाहेब आंबेडकर उरणच्या भूमीत १३ वेळा आले.* चिरनेर जंगल सत्याग्रह उरण कोर्टात चालला.ते सत्याग्रहिंचे वकिल होते. रायगड जिल्ह्यात ६४ हुतात्मे झाले त्यापैकी *१३ उरण*हुतात्मे मधून झाले.*
( *माहिती संग्रह व संदर्भ *-हिस्ट्री ऑफ व्हिलेजेस सिटी,प्रवाशी टॉलेमी व चीनी प्रवाशी हुन-ई-हू-स्वांग यांची प्रवास वर्णन आणि महाराष्ट्र गोवा शिलालेख )
घारापुरी लेणी ( मराठी : Gharapurichi Leni; इंग्रजी : एलिफंटा) पासून 12 कि.मी. बद्दल स्थित एक साइट आहे , गेटवे ऑफ इंडिया , मुंबई मध्ये भारत , त्याच्या कलात्मक लेणी प्रसिद्ध आहे. येथे एकूण सात लेण्या आहेत. मुख्य गुहेत 24 खांब आहेत, ज्यामध्ये शिव अनेक रूपात कोरले गेले आहे. डोंगर कापून बनवलेल्या या शिल्पांना दक्षिण भारतीय शिल्पकलेतून प्रेरणा मिळाली आहे. त्याचे ऐतिहासिक नाव घारपुरी आहे . हे नाव अग्रहरपुरी या मूळ नावाचे आहे. [१] एलिफंटा हे नाव पोर्तुगीज लोकांनी इथे बांधलेल्या दगडी हत्तीमुळे दिले. [२]येथे हिंदू धर्माच्या अनेक देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. डोंगर तोडून ही मंदिरे बांधली आहेत. येथे भगवान शंकरांच्या नऊ मोठ्या मूर्ती असून त्यात भगवान शंकरांचे विविध प्रकार आणि कृत्ये दिसून येतात. त्यापैकी शिवाची त्रिमूर्ती सर्वात आकर्षक आहे. हा पुतळा 23 किंवा 24 फूट उंच आणि 18 फूट उंच आहे. या मूर्तीत भगवान शंकरांचे तीन प्रकार दर्शविले गेले आहेत. या पुतळ्यामध्ये भगवान शंकरांच्या चेह on्यावर क्वचितच गांभीर्य आहे.
दुसरी मूर्ती म्हणजे पंचमुखी परमेश्वर शिवची असून तेथे शांतता व सौम्यतेचे राज्य आहे. शंकरजींच्या अर्धनारीश्वर प्रकाराची आणखी एक मूर्ती आहे, ज्यामध्ये तत्वज्ञान आणि कलेचे सुंदर समन्वय केले गेले आहे. या पुतळ्यामध्ये नर आणि निसर्गाच्या दोन महान शक्ती विलीन झाल्या आहेत. यात शंकर उभे असल्याचे आणि अभय मुद्रामध्ये त्याचा हात दर्शविला गेला आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती या त्रिमूर्तींचे चित्रण त्यांच्या जाटातून होत आहे. सदाशिवाच्या चतुष्पादात एक मूर्ती गोलाकार आहे. रोजी शिव 's भैरव भेसूर नृत्य चलन देखील शिव दर्शविले गेले आहे म्हणून आहे मालमत्ता चित्रे कोरलेली होती. या सीनमध्ये मोशन आणि अभिनय आहे. या कारणास्तव, एलिफंटा हा पुष्कळ लोक मानला जातोमूर्ती सर्वोत्तम आणि अद्वितीय मानल्या जातात. शिव आणि पार्वती यांच्या विवाहांचे चित्रणही येथे सुंदर आहे. []] १ 9. In मध्ये युनेस्कोने एलिफंटा लेण्यांना जागतिक वारसा घोषित केले होते. दगडी रत्नांनी बनविलेला हा समूह सुमारे 000००० चौरस फूट क्षेत्रात पसरलेला आहे, मुख्य दालन, दोन बाजूकडील अंगण, अंगण आणि दोन लहान मंदिरे यांचा समावेश आहे. या भव्य लेण्यांमध्ये सुंदर सजावट, शिल्पकला तसेच हिंदू भगवान शिव यांना समर्पित मंदिर आहे. या लेण्या ठोस दगडाने कोरलेल्या आहेत. [4] लेणी नवव्या शतकात करण्यासाठी तेराव्या शतकात करण्यासाठी शिलाहार ( 8l00- इ.स. 1260 राजे बांधले सांगितले आहे की). अनेक शिल्पे आहेत यांनी बांधले राष्ट्रकूट राजवंश Manyakhet आहे. (सध्याच्या कर्नाटकात ). चिरनेर – जंगल सत्याग्रह
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर हे छोटेसे गाव श्री क्षेत्र महागणपती आणि १९३० साली झालेला जंगल सत्याग्रह या दोन गोष्टींमुळे प्रसिध्द आहे. श्री क्षेत्र महागणपती हे चिरनेर गावाचे ग्रामदैवत. चिरनेर गावात महागणपतीचे पूर्वाभिमुखी मंदिर आहे. मंदिराचा सभामंडप गेल्या काही वर्षात बांधलेला असला तरी गर्भगृह आपले जुनेपण टिकवून आहे. गर्भगृहात असलेली गणपतीची मूर्ती साधारणपणे २ मीटर उंच आणि १ मीटर रुंद आहे. या गणपतीच्या पायात असलेले तोडे हे या गणपतीचे वैशिष्ट्य. महागणपतीची मूर्ती अंदाजे ३००-४०० वर्ष किंवा त्याच्यापेक्षाही जुनी असावी. श्रींची मूर्ती राजस्थान येथून आणण्यात आलेली असून नंतरच्या काळात मूर्तिभंजकांपासून रक्षण करण्यासाठी मंदिरासमोर असलेल्या तलावात मूर्ती लपवून ठेवण्यात आली. कालांतराने पेशव्यांचे कल्याण येथील सुभेदार रामजी महादेव फडके चिरनेर येथे वास्तव्यास असताना त्यांना गणपतीचा दृष्टांत झाला. दृष्टांतानुसार तलावातून गणपतीची चतुर्भुज मूर्ती बाहेर काढण्यात आली आणि तलावाशेजारी या महागणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली अशी आख्यायिका महागणपतीच्या मूर्तीबद्दल सांगण्यात येते.
महागणपती मंदिरासमोरील तलाव व १९३० साली झालेल्या जंगल सत्याग्रहामुळे चिरनेर गाव भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नकाशावर आले. आगरी, कोळी, आदिवासी, कातकरी इ. लोकांचे ह्या परिसरात प्राबल्य असून त्यांचा शेती हा पारंपारिक व्यवसाय होता. चिरनेर आणि परिसरातील कळंबसुरे, मोठी जुई, कोप्रोली, खोपटे, पाणदिवे, भोम, धाकटी जुई, विंधणे, दिघोडे इ. गावातील गावकऱ्यांना जंगलातील लाकडे तोडण्यास २५ सप्टेंबर १९३० रोजी इंग्रजांनी विरोध केला. परंतु गावकऱ्यांनी काठ्या, कोयते, कुऱ्हाड, विळे इ. विविध अवजारे घेऊन इंग्रजांचा जंगल कायदा तोडून सत्याग्रह केला. ह्या सत्याग्रहासाठी परिसरातील अनेक लोक रस्त्यावर आली. महात्मा गांधीनी सुरु केलेल्या सविनय कायदेभंग चळवळीला पाठींबा देण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी जीवाची तमा न बाळगता सत्याग्रह करून इंग्रजांचा रोष ओढून घेतला.
सत्याग्रह चालू असताना इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात आणि लाठीहल्ल्यामुळे अनेकांना अपंगत्व आले, तर धाकू गवत्या फोफेरकर (चिरनेर), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), रामा बामा कोळी (मोठी जुई), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे), नाग्या महादू कातकरी (चिरनेर), रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), हसूराम बुधाजी घरत (खोपटे), हे सत्याग्रही हुतात्मा झाले. या जंगल सत्याग्रहाला चिरनेर जंगल सत्याग्रह म्हणून ओळखले जाते. या जंगल सत्याग्रहाच्या स्मृतीप्रित्यर्थ चिरनेर गावात दोन हुतात्मा स्मारक बांधलेली आहेत. या स्मारकाच्या शेजारी हुतात्मा स्मारक शिल्प उभारण्यात आलेले असून या स्मारक शिल्पात हुतात्म्यांची शिल्प उभारण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर १९३२ साली पाडलेल्या स्मृतिस्तंभाचा कळस हा स्मारक शिल्पात जतन करून ठेवला आहे. त्याचबरोबर सत्याग्रहाच्या वेळी झालेल्या गोळीबारात एक गोळी महागणपती मंदिराच्या गजाला लागली. तो गज सत्याग्रहाची आठवण म्हणून मंदिरात अजूनही जतन करून ठेवण्यात आलेला आहे.
Start a discussion about उरण
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve उरण.