Jump to content

चर्चा:ईशा सिंग

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Latest comment: ३ महिन्यांपूर्वी by संतोष गोरे in topic लेख नाव

लेख नाव

[संपादन]

@नरेश सावे आणि @Dharmadhyaksha, नमस्कार, मराठी भाषेत सिंह ऐवजी सिंग हा शब्द येतो. जसे की मनमोहन सिंग. तसेच गुगल केले असता बहुतेक मराठी वर्तमान पत्रे आणि संकेत स्थळावर ईशा सिंग असेच नाव दिसून येते. सबब चर्चा पूर्ण करून नाव बदलण्यास हरकत नसावी. -संतोष गोरे ( ✉️ ) १६:२८, १६ सप्टेंबर २०२५ (IST)Reply

ईशा सिंह हे नाव महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेले आहे. विशेष नाम हे जसे आहे तसेच असावे असे मला वाटते. वांद्रे चे बांद्रा, गावस्कर चे गाबस्कर,मुंबई चे बम्बई हे जसे चुकीचे आहे तसे ईशा सिंह चे खरोखरच नाव ईशा सिंग असेल तर तसे करण्यास हरकत नाही. परंतु मी ते महाराष्ट्र टाईम्स मधून लिहिले आहे त्यामुळे मला तिच्या खऱ्या नावाची माहिती नाही.
आपणास ते ईशा सिंग करावयाचे असल्यास मला हरकत घेण्याचा अधिकार नाही.
धन्यवाद. नरेश सावे (चर्चा) १६:४६, १६ सप्टेंबर २०२५ (IST)Reply
आपल्याला योग्य वाटेल ते वापरावे. मी फक्त "ईशासिंह" चे "ईशा सिंह" केले आहे. धर्माध्यक्ष (चर्चा) १६:५३, १६ सप्टेंबर २०२५ (IST)Reply
@नरेश सावे,
  1. ईशा सिंह हे नाव महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेले आहे - होय, यामुळेच मी लिहिताना "बहुतेक" मराठी वर्तमान पत्रे आणि संकेत स्थळावर असे लिहिले. मटा व्यतिरिक्त इतरत्र सिंग असे दिसून येते.
  2. Singh चा उच्चार विविध भाषांत सिंग, सिंह तसेच सिंघ असा केला जातो. आपण मराठीत सिंग असे लिहितो. जर कागदोपत्री सिंह असे असेल तर तसे ठेवता येते. सबब तूर्तास सिंग असे करावे.
  3. आपण कोणताही निर्णय घेताना सहसा चर्चा करून घेतो. जर अशी चर्चा करणे कुणाला आवश्यक वाटले नाही तर तो सदस्य थेट बदल करू शकतो. यात काही वावगे नाही. परंतु एकदा लेख नाव @धर्माध्यक्ष यांनी बदलले होते, सबब ही चर्चा. बाकी काही नाही.-संतोष गोरे ( ✉️ ) १३:४९, १७ सप्टेंबर २०२५ (IST)Reply
झाले. संतोष गोरे ( ✉️ ) १८:५४, १९ सप्टेंबर २०२५ (IST)Reply