चर्चा:आयटीसी ग्रॅंड चोला हॉटेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जाणकारांनी लेखात दिलेले संदर्भस्रोत तपासण्याची/बदलण्याची गरज[संपादन]

उंच आणि विशाल स्तंभ आणि खूप जिने ही या हॉटेलची वैशिष्ट्ये आहेत. [१]

चोला राजाच्या रथाला जुंपलेले घोडे प्रतीक्षालयासमोर उभ्या असलेल्या ब्राँझ पुतळयाच्या स्वरूपात दिसतात. [१]

हॉटेलच्या बांधकामात वापरलेले लाकूड फॉरेस्ट स्टुअर्डशिप कौन्सिल (एफ.एस.सी.)ने प्रमाणित केलेल्या जंगलामधून आणले आहे.[१]

१,६००,००० चौ.फूट जागेवर ६०० खोल्या, ७५००० चौ.फूट फुटकळ जागा, आणि परिसंवाद- प्रदर्शन या सुविधांसाठी बांधलेला १,००,००० चौ.फूट + २६,५४० चौ.फूट एवढा, एकही खांब नसलेला राजेंद्र हॉल - ही या हॉटेलची मालमत्ता आहे.[१]

२३००० चौ.फूट जागेवर १२ खोल्यांचा कायाकल्प स्पा, २ हमाम, योगाभ्यासकक्ष, चहापानासाठी कक्ष, केशकर्तनालय, महिलांसाठी सलून, प्रत्येक विंगसाठी वेगळा जलतरण तलाव, मैदान आणि जिमखाना वगैरे सुविधा या हॉटेलमध्ये आहेत.[१]

  1. a b c d e श्रीधर, विजयालक्ष्मी. (इंग्लिश भाषेत). चेन्नई http://www.chennairealty.biz/top_project.php. २०१३-०३-३१ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)


}}<<< या लेखात मोलाचे योगदान असणारे सदस्य Gnome-edit-redo.svgदिपाली परिचारक: व इतरही जाणकारांना विनंती आहे की लेखात योगदानकर्त्यांनी उपरोल्लेखित संदर्भस्रोत नोंदवलेला दिसतो आहे तो तपासून पाहावा व अनावधानाने चुकीचा संदर्भस्रोत नोंदवला गेला असल्यास योग्य बदल करावा. --संतोष दहिवळ (चर्चा) २३:३६, १९ नोव्हेंबर २०१३ (IST)

जेव्हा मी हा लेख ऑनलाइन उपलब्ध केला तेव्हा मी तो दोन तीन वेळा तपासून पहिला होता आणि नोंदवलेला संदर्भस्रोत अचूक होता. तरी मी आपली विनंती मान्य करून यापुढे काळजी घेईन. ---दिपाली परिचारक
Gnome-edit-redo.svgदिपाली परिचारक:
१) एखादा संदर्भदुवा मृत दुवा झाला असेल तर तो केवळ मृत झाला आहे या कारणाने वगळण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. हा संदर्भ दुव्याच्या विश्वासार्हतेच्या/सुसंगततेच्या दृष्टीने दुसरी काही समस्या असल्यास दुवा वगळल्या असल्यास तसे करणे सुयोग्यच ठरते.
२) रिॲलिटी बिझ चेन्नईच्या दुव्यातील माहिती दर महिन्याला बदलणारी असल्यामुळे, इंग्रजी विकिपीडियावर मार्च,२०१३ मध्ये लेख लिहिताना माहिती असावी.सदर वेबसाईटने माहितीचे अर्काईव्हींग न जपल्यामुळे प्रश्न आला असला तरी केवळ आता त्या दुव्यावर माहिती नाही म्हणून माहिती+ संदर्भ इनव्हॅलीड होते असे नाही. (पण तरी सुद्धा भारतीय मजकुरास सर्वत्रच अधीक दर्जेदार/विश्वासार्ह संदर्भांची गरज आहे हे जाता जाता नमुद करणेही आवश्यक आहे)
३) येथे महत्वाचा मुद्दा इंग्रजी विकिपीडियावरुन लेख संदर्भा सहीत अनुवाद करून घेताना संबंधीत संदर्भ तपासला नसल्यास अथवा तसे तपासने शक्य नसल्यास इंग्रजी विकिपीडियाच्या लेखाचा मराठी विकिपीडियावर अनुवादीत करून आणतानाचा दुवा सोबत देण्याची प्रथा किंवा तत्सम उपाया बद्दल या निमीत्ताने विचार करावयास हवा असे वाटते. अर्थात इंग्रजी विकिपीडियावरून अनुवाद नेहमी करणाऱ्या इतर जाणकार सदस्यांनी आपापली मते नोंदवून चर्चेस पुढे न्यावे असे वाटते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:२५, २० नोव्हेंबर २०१३ (IST)
आपणास काहीतरी गैरसमज झाला आहे. आम्ही मृत संदर्भदुवा वगळला नसून तो एकाच दुव्यामध्ये जोडला आहे. सर्व संधर्भाचा रिॲलिटी बिझ चेन्नई हा दुवा आहे.

---दिपाली परिचारक

प्रथमत: प्रतिसाद आणि संवादाकरता धन्यवाद. शक्य आहे की, मला नेमके लक्षात आले नसावे.
  • इव्हन आपण ज्या भारतीय वृत्तमाध्यमांना दर्जेदार स्रोत समजतो त्यातही ॲड्व्हर्टोरीअल्सचे प्रमाण खूप वाढले आहे. तरी सुद्धा ॲड्व्हर्टोरीअल्स स्वरूपाच्या स्रोतावर बेतलेला हा लेख तसा बरा झाला आहे ह्या बद्दल मूळ स्रोताचे आणि विकिपीडिया संपादकांचे कौतूकच केले पाहीजे.
  • चोला राजाच्या रथाला जुंपलेले घोडे प्रतीक्षालयासमोर उभ्या असलेल्या ब्राँझ पुतळयाच्या स्वरूपात दिसतात.
आर्किटेक्चरल मॅगझीनमधून हाच उल्लेख आला असता तर अधिक विश्वास वाटला असता.अतीरंजनाची भारतीय प्रवृत्ती पाहता इतर स्रोतातून माहिती आल्यास अशा उल्लेखांच्या विश्वासार्हते बाबत काहिशी चिंता स्वभाविकपणे वाटते.मला वाटते इंग्रजी विकिपीडियातही भारतीय संदर्भांकरता दुजोरा हवा सारखा साचा असण्याची गरज आहे. अर्थात यात आपली काही चूक आहे असे नाही.
  • मराठीत अनुवाद करताना काही ठिकाणी अगदी शब्दश: अनुवाद होतो आहे असे वाटले जसे asset या शब्दाचा मालमत्ता हा अनुवाद काहीसा शब्दश: झाला असण्याची शक्यता वाटली.प्रसंगानुरूप, एखादा मराठी शब्द लगेच सुचला नाहीतर इंग्रजी शब्द तसाच ठेऊन मराठी शब्द सूचवा असा साचाही लावण्याबद्दलही विचार करण्यास हरकत नसावी असे वाटते.
आगामी लेखन आणि वाचना बद्दल शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:२४, २२ नोव्हेंबर २०१३ (IST)साद साचातील सदस्य नावातील बदल[संपादन]

Gnome-edit-redo.svgJ: सदस्य:दिपाली परिचारक स्वत:च्या सदस्य नावाच ऱ्हस्व दीर्घ प्रमाण लेखना पेक्षा वेगळ करत असतील तर त्या बाबत त्यांच्याशी त्यांच्या चर्चा पानावर वेगळा संवाद साधावा.पण जोपर्यंत सदस्य खात्याचे नाव दिपाली परिचारक आहे त्याचे परस्पर दीपाली परिचारक करणे औचीत्यास धरून नाही हा एक मुद्दा त्या पेक्षा महत्वाचे म्हणजे {{साद| साचाचा मुख्य उद्देश संवाद साधणे आहे त्या साचात सदस्य नावे जशी आहेत तशी वापरावयास हवीत त्यात परस्पर फेरफार केल्याने सदस्यांच्या आपापसातील संवादास अडथळा येण्याची संभावना असते.म्हणून असे बदल करताना सुयोग्य काळजी घ्यावी ही नम्र विनंती.

हा संवाद संपल्या नंतर या उप विभागास विषयांतर साचा लावावा.


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:०८, २० नोव्हेंबर २०१३ (IST)