चर्चा:आचार्य, गुरुजी, शास्त्री व तत्समान उपाध्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कोणती पाने भविष्यात बनवायची त्यासाठी आधी यादी बनवणे क्रमप्राप्त आहे. शून्य मजकूर असलेली पाने बनवण्यापेक्षा यादी बनवणे केव्हाही चांगले. अशी यादी ही पुरेशा मजकुराने युक्त असलेली पाने बनवण्याची पूर्वतयारी असते. शिवाय यादी ही एक अतिशय महत्त्वाची माहिती असते. यादीऐवजी वर्ग बनवता येतील, पण वर्गाला जास्त जागा लागते, आणि वर्ग बनवणे जास्त किचकट असते. वर्गातल्या यादीत भर घालणे तितकेसे सोपे नसते. त्या यादीतून हवे ते नाव शोधणे जिकिरीचे असते. आणि शिवाय, वर्गाचे पान उघडणे हे सामान्य वाचकाला सहजासहजी शक्य होत नाही....J (चर्चा) १३:५९, १८ मे २०१२ (IST)

लेखातून येथे हलवले - अभय नातू (चर्चा)[संपादन]

विकिपीडिया हा ज्ञानकोश आहे. येथे केवळ याद्या बनवून लेखन करणे सोडू नये. एखाद्या विषयावरील लेखांची एकेठिकाणी जंत्री करण्यासाठी असा लेख लिहिल्यास --

१. लेखातील बव्हंश नोंदी उल्लेखनीय असाव्या.

२. प्रत्येक नोंदीसमोर त्याचे वैशिष्ट्य किंवा संक्षिप्त माहिती द्यावी.

३. उल्लेखनीय नोंदींना दुवे द्यावे.

४. दुव्यांपासून लेख तयार करावे.

५. अशा लेखांना आणि यादीपर लेखाचे वर्गीकरण करावे.

६. गरज भासल्यास निःसंदिग्धीकरण पान/पाने तयार करावे.