चर्चा:अभिषेक ठमके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

उल्लेखनीयता[संपादन]

Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची/मजकुराची विश्वकोशिय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयते बाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकुर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधीत पान/विभाग/मजकुर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयते बाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
स्रोत शोधा: "अभिषेक ठमके" – बातमी, वृत्तपत्रे, पुस्तके, गुगल स्कॉलर, हायबीम, जेस्टोर संशोधन लेखांचा संग्रह, मुक्तस्त्रोत चित्रे, मुक्तस्त्रोत बातम्या, विकिपीडीया ग्रंथालय, न्यु योर्क टाईम्स, विकिपीडिया संदर्भ शोध

हा लेख स्वत:ची/स्वत:च्या पुस्तकाची जाहीरात, तसेच स्वत:च तयार केलेल्या संदर्भांवर आधारीत असल्यामुळे संबंधीत संदर्भांची विश्वासार्हता पडताळून सदर संदर्भांच्या विश्वकोशीय उल्लेखनीयते बद्दल साधबाधक चर्चा करून हवी आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:५०, ७ सप्टेंबर २०१३ (IST)

हो. मी माझ्या पुस्तकाची माहिती येथे दिली आहे. पण ही काही जाहिरात नाही. विकिपीडिया हे जाहिरात करण्याचे ठिकाण नाही आहे. माझ्या काही गुगल, लिंक्डइन आणि फेसबुकवरील सदस्यांनी मला याची माहिती विकिपीडिया वर लिहिण्याचे सुचविले. पुढे जाऊन मला सुद्धा अनेक लेख लिहावयाचे आहेत. म्हणून सुरुवातीला मी माझा हा लेख लिहिला आहे. मी स्वतःबद्दल लिहिलेली माहिती कुणा दुसऱ्याकडून सुद्धा लिहू शकलो असतो किंवा फेक अकाउंट तयार करून सुद्धा लिहू शकलो असतो. विकिपिडीयावर मराठी भाषेतील लेख वाढविण्याबाबत मी प्रयत्नशील राहणार आहे. मला आपले मार्गदर्शन हवे आहे.


नमस्कार, अभिषेक ठमके
प्रथमत: आपले चर्चा पानावर संवाद साधण्याचे स्वागत आहे.विकिपिडीयावर मराठी भाषेतील लेख वाढविण्याबाबत आपण प्रयत्नशील असणार आहात याचेही स्वागत आहे. पण त्याकरीता स्वत: बद्दल लेखन करू दिलेच पाहीजे हि स्विकार्ह शर्तही असू शकत नाही.स्वत:बद्दल लेखनापासून पूर्णच थांबवावयाचे असल्यास संबंधीत खात्यास संपादनापासून अटकाव करता आला असता अथवा इतर बरेच मार्ग उपलब्ध आहेत; पण वस्तुस्थिती आपण नीटशी समजून घेतली नाही प्रश्न ट्रांसपरंसीचा आणि विकिपीडियावरील माहितीच्या विश्वासार्हतेचा आहे.म्हणून लेखन औचित्य साचा लावला जातो.


मी किंवा माझे स्नेही विचार करतो त्या पेक्षा एखाद्या प्रकल्पाचे स्वरूप वेगळे असू शकते, हे मी प्रथमत: स्विकारावयास हवे.विश्वकोशीय उल्लेखनीयतेचे स्वत:चे निकष आहेत निनावी अथवा खात्याचे नाव बदलून लेखन केल्यामुळे लेख आणि मजकुराबद्दलच्या निकषांमध्येही फरक पडत नाही. विकिपीडियाकडे अनुभवी संपादक आणि इतर लक्षठेवणे, मुल्यमापन अशा विवीध पद्धती आहेत. आज किंवा उद्दा सर्व अविश्वकोशिय गोष्टींना कात्री लागते.
आपली पुस्तके आधीच प्रकाशित झाली असल्यामुळे अंशत: उल्लेखनीयता असणार आहे प्रश्न संदर्भांच्या उल्लेखनीयतेचा आहे.विकिपीडिया मुक्त आहे त्याच वेळी परिघास मर्यादा आहेत हेही लक्षात घ्यावयास हवे. मुक्ततेच्या आड कुणी अविश्वासार्ह माहिती देत नाही आहे किंवा इतर निकषांचे उल्लंघन होत नाही याचे वेळोवेळी मुल्य मापन केले जाते त्यामुळे चर्चा लेखाच्या उल्लेखनीयते पेक्षा संबंधीत संदर्भांच्या उल्लेखनीयते बाबत केंद्रीत असणार आहे.
पुनश्च आपले मराठी विकिपीडियात स्वागत.
आपल्या मार्गदर्शना साठी लेखाचे विसृत मुल्यमापन खाली वेगळ्या विभागात करेनच.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:४५, ७ सप्टेंबर २०१३ (IST)

मजकुराचे ज्ञानकोशीय मुल्यांकन[संपादन]

मथळा मजकूर मथळा मजकूर मथळा मजकूर मथळा मजकूर
"अबकडराव" यांचा जन्म दि. ......... रोजी भारतातील महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे झाला. पहिल्या परिच्छेदातील वाक्य रचना सर्व साधारणपणे वेगळी असते "अबकडराव" (जन्म इ.स. दि........ १९९१-हयात) हे मराठी भाषेतील लेखक/कादंबरीकार आहेत. (ज्ञानकोशीय उल्लेखनीयता हवी) [ संदर्भ हवा ]
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथून सामाजिकशास्त्रे विषयामध्ये एम.ए. करून त्यांना आता पी.एच.डी. करावयाची आहे. विकिपीडिया भविष्यात होणाऱ्या गोष्टींची/प्लान्सची सहसा सहज दखल घेत नाही. वाक्य काहीस बायोडाटा लिहिल्या प्रमाणे झाल म्हणून अप्रत्यक्ष जाहीरात प्रकारात मोडत
त्यांनी फेसबुकच्या सामग्रीमध्ये मराठी आवृत्तीसाठी इंग्रजी-मराठी असे भाषांतर केले आहे. आता फेसबुकची मराठी आवृत्ती वापरण्यासाठी उपलब्ध आहे. मराठी भाषेकरता उत्तम आणि कौतुकास पात्र काम केले या बद्दल अभिनंदन पण मराठी विकिपीडियाने दखल घेण्यापुर्वी सहसा विश्वासार्ह तिसऱ्या वेगळ्या संदर्भ स्रोतांनी दखल घेतली जावयास हवी.
प्रबोधन नावाच्या संस्थेसोबत ते जनजागृतीचे कार्य करत असून प्रबोधन दिवाळी अंकाचे ते संपादक आहेत. प्रबोधन दिवाळी अंक या पुर्वीच प्रकाशित झाला आहे का ? असल्यास संदर्भ उशीरा उपलब्ध झाला तरी चालेल पण संदर्भ हवा.अद्याप प्रकाशित झाला नसल्यास अविश्वकोशीय
मराठी लेख वाढविण्यासाठी त्यांनी स्वतःची अर्थ मराठी नावाचा ब्लॉग सुरु केला आहे. तिसऱ्या विश्वासार्ह संदर्भ स्रोताने ब्लॉगची दखल घेतलेली नसल्यास स्वत:च्या ब्लॉगबद्दल स्वत: नमुद करणे त्याच्या उल्लेखनीयतेची खात्री देऊ शकत नाही
लवकरच ते आपले पुढील पुस्तक प्रकाशित करत आहेत. भविष्यातील होणाऱ्या आगामी प्लान्सची दखल ज्ञानकोशांनी घेणे सहसा अभिप्रेत नसते.प्रकाशन होण्यापुर्वी स्वत:च नमुद करणे हि केवळ आगामी पुस्तकाची जाहीराती समकक्ष ठरते किंवा कसे
घाटकोपर येथील वनिता विकास शाळा आणि नंतर ठाणे येथील परशराम धोंडू टावरे विद्यालयातून त्यांनी आपले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. उच्च माध्यमिक शिक्षण घेत असताना त्यांनी जिज्ञासा मिलिटरी स्कूल मधून सैन्याचे प्रशिक्षण घेतले. मात्र प्रशिक्षणात झालेल्या अपघातामुळे त्यांनी सैन्यदलाचे प्रशिक्षण अर्ध्यावर सोडून दिले. नंतर त्यांनी आय.टी.आय. च्या दिल्ली येथील बोर्डातून इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी चा कोर्स पूर्ण केला. कोर्स पूर्ण झाल्यावर त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून समाजशास्त्र हा विषय घेऊन बी.ए. आणि एम.ए. केले. हे लेखन ठिक आहे केवळ विश्वासार्ह संदर्भ हवेत
भविष्यात त्यांना सोशल मीडिया विषयावर पी.एच.डी. करायची आहे. भविष्यातील गोष्टींची नोंद विश्वकोशांनी घेणे अभिप्रेत नाही.
""अबकडराव"" यांनी वेगवेगळ्या प्रकारचा कामाचा अनुभव घेतला आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम यांच्या २४ तास कार्यालयात रोजगार विभाग सांभाळला आहे. सध्यातरी स्वत:बद्दल स्वत:च बोलणे एवढेच स्वरूप आहे. त्रयस्थ विश्वासार्ह स्रोतांनी दखल घेई पर्यंत विश्वकोशात उल्लेखनीयता नाही.
त्यांनी मराठीमध्ये छोट्या मोठ्या एकांकिका, नाटके लिहिली. त्यांनी लघुपटांमध्ये एडिटर म्हणून काम केले आहे. नाट्य लेखन लघुपटाचे एडीटींग हौशी रंगभूमीवर झाले असल्यास त्याची उल्लेखनीयता हा लेख ज्या व्यक्ती बद्दल आहे त्याच्या एकंदर उल्लेखनीयत असल्यासच आहे आणि तेही पडताळण्या जोगे त्रयस्थ विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध झाल्या नंतर
नंतर सध्या ते ग्राफिक डिझाईनर म्हणून काम करीत आहेत. मराठी भाषा जागतिक स्तरावर नेण्याचा प्रयत्न म्हणून ""अबकडराव"" यांनी फेसबुक या संकेतस्थळाच्या मराठीकरणाचे काम केले. नंतर ’अर्थ मराठी’ नावाचा ब्लॉग सुरू केला. त्यांनी अक्षर प्रभू यांच्या मदतीने गुगल प्ले स्टोअरवर पहिल्यांदाच संपूर्ण मराठी कादंबरी आणि इतर मराठी साहित्य आणण्याचा पराक्रम केला आहे. हा लेख ज्या व्यक्ती बद्दल आहे त्याच्या एकंदर उल्लेखनीयत असल्यासच आहे आणि तेही पडताळण्या जोगे त्रयस्थ विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध झाल्या नंतरच या वाक्यांना उल्लेखनीयता उपलब्ध होईल
मैत्र जीवांचे (कादंबरी) वेडा आणि कार्टून (कादंबरी)एक जलपरी (कादंबरी) जगाचा शेवट, शेवटचे प्रेम (कादंबरी); प्रबोधन - जगाला घडवण्याआधी स्वतःला घडवू या (लेखसंग्रह-संपादन), महाराष्ट्रातील संत (संपादन) पुस्तके कुणी प्रकाशित केली आहेत ? स्वत:ची स्वत: प्रकाशित केली असल्यास आपण केवळ एक हौशी लेखक आहात त्या बद्दल इतर समिक्षकांनी त्रयस्थ संदर्भ योग्य माध्यमात दखल घेतल्या शिवाय आपणास/आपल्या लेखनास ज्ञानकोशीय उल्लेखनीयता आहे असे म्हणता येणार नाही.;पुस्तकांचे प्रकाशक आपल्या स्वत:शिवाय इतर कुणी असतील तर मात्र आपणास विश्वकोशीय उल्लेखनीयता अंशत:तरी उपलब्ध होते असे म्हणता येईल त्याकरता पडताळण्या जोगे संदर्भ हवेत. पुस्तकांचे प्रकाशक आपल्या स्वत:शिवाय इतर कुणी असतील तर मात्र आपणास विश्वकोशीय उल्लेखनीयता अंशत:तरी उपलब्ध होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा लेख अद्याप वगळला गेलेला नाही पण सुयोग्य त्रयस्थ संदर्भ उपलब्ध न झाल्यास लेखांच्या उल्लेखनीयते बद्दलही प्रश्न चिन्ह निर्माण होते हे लक्षात घ्यावे.
""अबकडराव"" यांचे लग्न होण्यापूर्वी त्यांचा करियरचा प्रवास थोडा गुंतागुंतीचा होता. सैन्य प्रशिक्षण, ऑफिस असिस्टंटशिप, ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन, वेब डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, एडिटिंग, लेखन असा त्यांचा गुंतागुंतीचा प्रवास होता. त्यांना नक्की कळत नव्हते, की त्यांनी काय करावे. मात्र लग्न होताच त्यांची पत्नी गौरी ठमके यांनी त्यांना करियरसाठी मोलाची साथ दिली. त्यांनी त्यांच्यातील लेखकास लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच त्यांना ग्राफिक डिझायनिंगसाठी योग्य मार्गदर्शन केले.आता ""अबकडराव"" आपले काम सांभाळत लेखन, ब्लॉगिंग, डिझायनिंग करत आहेत. यात स्वत:ची भलावण स्वत:च केली आहे. लेख विषयास स्वतंत्र उल्लेखनीयता असल्या शिवाय आणि या माइहितीची त्रयस्थ संदर्भ योग्य माध्यमांनी दखल घेण्या पुर्वी ज्ञानकोशात माहिती देणे उचीत होत नाही.