चर्चा:अनाहत चक्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रश्न : अनाहत नाद म्हणजे काय ? तो कुठे प्रत्ययाला येतो ? उत्तर : संघाताशिवाय जो ध्वनि होतो, त्याला अनाहत म्हणतात. अनाहताचे पुष्कळ प्रकार आहेत :- श्वासोच्छ्वासाचा म्हणजे स्पंदाचा अनाहत अणुरेणूत आहे. शरीरातील नऊ द्वारांचा निरोध होऊन, जीव जेव्हा दशमद्वारात जातो, तेव्हा तेथे अनाहत आहे. चत्वार देह व चार स्थिति यांचे पलीकडे गेल्यावर अनाहत ऐकू येतो. गगनात एक अनाहत आहे. गगनातील अनाहताच्या अलीकडे एक अनाहत आहे, त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी प्रणवाचा अनाहत असे म्हटले आहे. त्यालाच `दशमो मेघनादः' असे म्हटलेले आहे. खेरीज प्रस्फुट गगनात एक अनाहत आहे. ज्या शून्यातून प्रस्फुट गगन निर्माण झाले आहे, तेथे अनाहत आहे. ज्या रामकृष्णगतीतून हे शून्य निर्माण झाले, त्या गतीत अनाहत आहे. ही रामकृष्ण-गति ज्या शिवात्म-शून्यातून निर्माण झाली, त्या शिवात्म्याजवळ अनाहत आहे आणि सहस्रदळस्थानात तर सतत अनाहत आहेच.