चतुरानन मिश्र
चतुरानन मिश्र (७ एप्रिल १९२५ - २ जुलै २०११) एक भारतीय राजकारणी आणि कामगार संघटक होते. मिश्र ज्यांचा जन्म मधुबनी जिल्ह्यातील नाहर येथे झाला होता. ते बिहारमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एक प्रमुख नेते होते आणि तिसऱ्या मोर्चाच्या सरकारमध्ये त्यांनी कृषीमंत्री म्हणून काम पाहिले.[१]
जीवन
[संपादन]मिश्रांचा जन्म ७ एप्रिल १९२५ रोजी बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील नाहर येथे झाला. त्यांनी १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनात भाग घेतला. स्वातंत्र्य समर्थक कार्यामुळे त्यांना काही काळासाठी नेपाळमध्ये भुमीगत जावे लागले. परत भारतात आले तर ते दरभंगा तुरूंगात कैद झाले होते.
१९६२ च्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी गिरिडीहची जागा लढविली आणि ६,३७९ मतांनी दुसरे स्थान मिळविले.[२] मिश्रा १९६४ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत रुजू झाले. अखिल भारतीय व्यापार संघ काँग्रेसच्या बिहार राज्य समितीचे ते अध्यक्ष झाले.
१९६९ ते १९८० च्या दरम्यान ते गिरिडीह जागेचे प्रतिनिधित्व करणारे बिहार विधानसभेचे सदस्य होते. त्यांनी दहा वर्ष विधानसभेत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया संघाचे नेतृत्व केले. या काळात त्यांचा उल्लेख "बिहारमधील भाकपचा कणा" म्हणून केला जात असे आणी मधुबानीला "बिहारचा लेनिनग्राड" असे टोपणनाव मिळाला. मिश्र यांनी काही काळ जागतिक खाण कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. मिश्र यांनी १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत हजारीबाग जागा लढविली होती. ते ३५,८०९ मतांनी (१२.४५%) तिसऱ्या क्रमांकावर आले.[३]
१९८१ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उर्मिला देवींचा त्यांनी पराभव केला होता. उर्मिला देवी यांचे पती रणधीर प्रसाद यांच्या निधनानंतर १९८०ची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मिश्रा यांच्या उमेदवारीला भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), क्रांतिकारक समाजवादी पक्ष आणि लोकदल यांनी पाठिंबा दर्शविला होता.[४] १९८४ आणि १९९० मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले.
मिश्र १९९६ च्या निवडणुकीत मधुबनी मतदारसंघातून २८२,१९४ मतांनी लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांच्या उमेदवारीला जनता दलाने पाठिंबा दर्शविला होता.[५] निवडणुकीनंतर ते केंद्रीय कृषिमंत्री झाले व १९९८ पर्यंत हे पद भूषवीले. मे ११९७ मध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण या विभागांचे कामकाज बघीतले.[६] १९९८ मध्ये मिश्र यांना आरोग्याच्या कारणास्तव भाकपच्या सचिवालयातून वगळण्यात आले.
२ जुलै २०११ रोजी मिश्र यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थान, नवी दिल्ली येथे निधन झाले.[७]
संदर्भ
[संपादन]- ^ Lok Sabha. Biographical Sketch - Member of Parliament - XI Lok Sabha
- ^ Election Commission of India. STATISTICAL REPORT GENERAL ELECTION, 1962 THE LEGISLATIVE ASSEMBLY OF BIHAR
- ^ Election Commission of India. STATISTICAL REPORT ON GENERAL ELECTIONS, 1977 TO THE SIXTH LOK SABHA Archived 18 July 2014 at the Wayback Machine.
- ^ Mishra, S. N., L. M. Prasad, and Kushal Sharma. Tribal Voting Behaviour: A Study of Bihar Tribes. New Delhi: Concept Pub. Co, 1982. p. 74
- ^ Indian Express. Chaturanan Mishra may find the going tough this time
- ^ Mishra, Chaturanan. Need to Redefine Socialism after the Collapse of the Soviet Union, article in Mainstream
- ^ The Economic Times. Former Minister Chaturanan Mishra passes away