कापशी घार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चचान या पानावरून पुनर्निर्देशित)
कापशी घार
शास्त्रीय नाव इलेनस सेरुलेअस
(Elanus caeruleus)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश ब्लॅक विंग्ड काइट
(Black-winged Kite)
संस्कृत कुमुद, शबलिका
Elanus caeruleus

कापशी किंवा काळ्या पंखाची घार किंवा कापश्या (शास्त्रीय नाव : Elanus caeruleus, इलेनस सेरुलेअस ; इंग्लिश: Black-winged Kite, ब्लॅक विंग्ड काइट;) हा मध्यम शुष्क प्रदेशांत आढळणारा दिनचर शिकारी पक्षी आहे. याला मराठीमध्ये चचान किंवा पांजरा म्हणूनही ओळखतात. या पक्ष्याचे घारीशी साम्य असते. याच्या दुभंगलेल्या शेपटीमुळे हा घार कुटुंबात गणला जातो. काळ्या पंखांमुळे माळरानावर सहजपणे ओळखता येतो. हा पक्षी आकाराने कावळ्यापेक्षा लहान असतो. याचा वरचा रंग राखी करडा, खालचा पांढरा तर डोळ्यावर काळ्या रेषा, खाद्यावर पांढरे डाग असतात. उडताना तो स्थिर स्थितीत असला म्हणजे ते डाग ठळक दिसतात. मिटलेल्या पंखाची टोके शेपटीपेक्षा लांब दिसतात. याचे मुख्य खाद्य लहान उंदीर, पक्षीकिडे आहेत. आकाशात एकाच जागी स्थिर घिरट्या घालत तो शिकार करतो.

बाह्य दुवे[संपादन]