Jump to content

घोष कण्ठ्य अनुनासिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


घोष कण्ठ्य अनुनासिक, संस्कृत आणि मराठीत ङ, हा काही बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये वापरला जाणारा एक प्रकारचा व्यंजनात्मक ध्वनी आहे. मराठीत 'अंक' यातील अनुस्वाराचे ध्वनी म्हणजेच, अंक या शब्दाला अङ्क असे देखील त्याच्यामुळेच लिहू शकता.

आंतरराष्ट्रीय ध्वन्यात्मक वर्णमालेमध्ये (आयपीए) या ध्वनीचे चिन्ह [ŋ] आहे. आयपीए चिन्ह [ŋ] हे [ɳ] सारखा आहे , जे मूर्धन्य अनुनासिकचे चिन्ह आहे, ज्याला मराठीत 'ण' असे लिहितात. [ɲ] , तालव्य अनुनासिकेचे चिन्ह, या चिन्हासारखा देखील आहे.

जरी सर्व भाषांमध्ये /m/ आणि /n/ स्वनिम आहेत, /ŋ/ हे अधिक दुर्मिळ आहे. अँडर्सन (२००८) मध्ये सर्वेक्षण केलेल्या ४६९ भाषांपैकी आर्ध्याच भाषांमध्ये कण्ठ्य अनुनासिक स्वनिम होते; आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, त्यापैकी बऱ्याच भाषांमध्ये त्याचा वापर केवळ अक्षराच्या शेवटी ( मात्रा कोडा) होतो. कण्ठ्य अनुनासिक हे ध्वनी अमेरिका, मध्यपूर्व किंवा कॉकेशसच्या अनेक भाषांमध्ये दिसत नाही, परंतु तो ऑस्ट्रेलियन आदिवासी भाषा, उपसहारा आफ्रिकेच्या भाषा, पूर्व आशियाई, आग्नेय आशियाई भाषा व पॉलिनेशियन भाषांमध्ये अत्यंत सामान्य आहे. ला ला ब्वामू ही अशा काही मोजक्या भाषांपैकी एक आहे ज्यात हा ध्वनी एकमेव अनुनासिक व्यंजन म्हणून असतो. [] ज्या भाषांमध्ये कण्ठ्य अनुनासिक स्वनिम म्हणून नसतो, जसे की बहुतेक रोमान्स भाषांमध्ये, तो /n/ चा उपध्वनी म्हणून कण्ठ्य व्यंजनांच्या आधी सापडतो. असे आत्मसातीकरण मराठीत देखील आढळते; उदा. अंकुश, /ɐŋkʊɕ/, अङ्कुश. मराठीत जेव्हा या प्रकारचे अनुस्वार असेल तेव्हा आत्मसातीकरण होतो.

ज्या भाषेत स्वनिम किंवा उपस्वनिम कण्ठ्य अनुनासिक व्यंजनाचा अभाव असतो, तिचे एक उत्तम उदाहरण म्हणजे रूसी भाषा, ज्यामध्ये /n/ कण्ठ्य व्यंजनांच्या आधी सुद्धा जिह्वाफलकीय दन्त्य-दंतमूल्य [ n̪ ] असा उच्चार केला जातो. []

याउलट, काही भाषांमध्ये पश्चकण्ठ्य अनुनासिक असते, जे नमुनेदार कण्ठ्य अनुनासिकाच्या उच्चारणाच्या स्थानापेक्षा किंचित मागे उच्चारले जाते, जरी ते नमुनेदारअलिजिह्वीय अनुनासिकासारखे मागे नसते.

काही भाषांमध्ये प्रकण्ठ्य अनुनासिक असते, जे नमुनेदार कण्ठ्य अनुनासिकाच्या उच्चारणाच्या स्थानाच्या तुलनेत किंचित अधिक समोर उच्चारले जाते, जरी ते नमुनेदारतालव्य अनुनासिकासारखे समोर नसते अधिक माहितीसाठी तो लेख पहा.

वैशिष्ट्ये

[संपादन]
घोष कण्ठ्य अनुनासिकाचा अग्रपश्च छेद.

घोष कण्ठ्य अनुनासिकाची वैशिष्ट्ये:

  • याची उच्चारण पद्धत अवरोधक आहे, ज्याचा अर्थ असा आहे की हे स्वरयंत्रात हवेचा प्रवाह रोखून निर्माण केले जाते. हा व्यंजन अनुनासिक देखील असल्याने, रोखलेला हवेचा प्रवाह नाकावाटे वळवला जातो.
  • याचे उच्चारस्थान कण्ठ्य आहे, ज्याचा अर्थ असा आहे की हे मृदू टाळूवर जिभेच्या मागील भागाच्या साहाय्याने उच्चारले जाते.
  • याची ध्वनी निर्मिती सघोष आहे, ज्याचा अर्थ असा आहे की याच्या उच्चारणादरम्यान स्वरतंतू कंपन पावतात.
  • हे एक अनुनासिक व्यंजन आहे, ज्याचा अर्थ असा आहे की अनुनासिक स्पर्श ध्वनींसाठी हवा केवळ नाकातून बाहेर पडू दिली जाते; अन्यथा, नाकासोबतच तोंडातूनही बाहेर पडते.
  • हे एक मध्य व्यंजन आहे, ज्याचा अर्थ असा आहे की हवेचा प्रवाह जिभेच्या बाजूने न जाता, जिभेच्या मध्यभागावरून पुढे निर्देशित करून निर्माण केला जातो.
  • याची वायुप्रवाह प्रणाली फुफ्फुसीय आहे, ज्याचा अर्थ असा आहे की, बहुतेक ध्वनींप्रमाणेच, केवळ बरगड्यांमधील स्नायू आणि पोटाच्या स्नायूंच्या साहाय्याने हवा बाहेर ढकलून याचे उच्चारण केले जाते.
  1. "Phonological Typology of Velar Nasals". 2026-01-14 रोजी पाहिले.
  2. Jones & Ward (1969).

 

कोणत्या भाषेत असते?

[संपादन]
Language Word IPA Meaning Notes
आल्बेनी ngaqë/ङ्गात्य [ŋɡacə] 'कारण की'
अल्यूट[] chaang / ча̄ӈ [tʃɑːŋ] 'पाच'
अरबी हिजाज़ी

 
مــنــقل / मिंगल [mɪŋɡal] 'शेगडी' कण्ठ्य स्पर्शांच्या आधी /n/ चे उपध्वनी. हिजाज़ी अरबीचे ध्वनीशास्त्र पहा.
आर्मेनी पूर्व[] ընկեր / अङ्केर [əŋˈkɛɾ] 'मित्र' कण्ठ्य स्पर्शांच्या आधी /n/ चे उपध्वनी.
आसामी ৰং / रॉङ [ɹɔŋ] 'रंग'
अस्तुरी non/नाँङ [nõŋ] 'नाही' शब्दांताला /n/ चे उपध्वनी, एक तर कण्ठ्य स्पर्श सोडून व्यंजनांच्या आधी किंवा स्वरासोबत सुरू होणारे शब्द किंवा विरामाच्या आधी.
बंबारा ŋonI/ङोनी [ŋoni] 'गीटार'
बाश्किर мең / मिङ / مىُڭ [mɪ̞ŋ]ⓘ 'एक हजार'
बास्क hanka / हाङ्का [haŋka] 'पाय'
बंगाली / रॉङ [ɾɔŋ] 'रंग'
बुल्गारी[] тънко / तङ्को [ˈtɤŋko] 'रोड'
बर्मी ရုတ် [ŋə joʊʔ] 'मिरची'
क्वांगची / ङॉऽङ [ŋɔːŋ˩] 'उचलणे' क्वाँगची ध्वनीशास्त्र पहा.
कातालानी[] sang / साङ्(क) [ˈsaŋ(k)] 'रक्त' कातालानी ध्वनीशास्त्र पहा.
सेबुआनो ngano / ङानो [ˈŋano] 'कशाला'
चामोरो ngånga' / ङाङा [ŋɑŋaʔ] 'बदक'
चुक्ची ӈыроӄ / ङरोक़ [ŋəɹoq] 'तीन'
चेक tank / ताङ्क [taŋk] 'टाकी' चेक ध्वनीशास्त्र पहा.
थ्वॉङ्यांग ŋa / ङा [ŋa] 'कोण'
दानी sang / साङ [sɑŋˀ] 'गाणं' डेनिश ध्वनीशास्त्र पहा
ड्च[] angst / आङ्स्ट [ɑŋst] 'भिती' डच ध्वनीशास्त्र पहा.
पूर्व मीन / ङी [ŋi53] 'संशयित'
इंग्रजी sing / सिङ [sɪŋ]ⓘ 'गाणे' मात्रा कोडापर्यंत मर्यादित. इंग्रजी ध्वनीशास्त्र पहा.
फेरोई ong / ऑङ्क [ɔŋk] 'मैदान'
फिजीयी gone / ङोने [ˈŋone] 'मुले'
फिनी kangas / काङ्ङास [ˈkɑŋːɑs] 'कापड'
फ्रांसी[] प्रामाणिक camping / कांपिङ [kɑ̃piŋ(ɡ)]ⓘ 'तंबू ठोकणे'
दक्षिण फ्रांस pain / पेङ् [pɛŋ]ⓘ 'पाव'
गालेगो unha / उङा [ˈuŋa]ⓘ 'एक' (स्त्री.)
गान / ङा [ŋa] 'दात'
जर्मन lang / लाङ [laŋ] 'लांब' प्रामाणिक जर्मन ध्वनीशास्त्र पहा.
जॉर्जियन გარება / आङ्गारेबा [äŋgäɾe̞bä] 'अहंकार/स्वार्थ' बोलीभाषेत किंवा तेज बोलण्यात /k/ आणि /g/ च्या आधी /n/ चे उपध्वनी.
ग्रीक άγχος / आङ्ख़ोस ['aŋxo̞s] 'ताण' आधुनिक ग्रीक ध्वनीशास्त्र पहा.
हक्का शियनख्योंग / ङाइ [ŋai˨˦] 'मी'
हिब्रू प्रामाणिक אנגלית / आङ्गलीत [aŋɡˈlit] 'इंग्रजी भाषा' कण्ठ्य स्पर्शांच्या आधी /n/ चे उपध्वनी.
सेफार्दी עין / ङायीन [ŋaˈjin] 'अयिन'
हिलिगायनोन buang / बुआङ [bu'äŋ] 'वेडा'
हिंदुस्तानी हिंदी रंग / रङ्ग [rəŋg] रंग
उर्दू رن٘گ / रङ्ग
हो mara / माराङ [maraŋ] 'मोठे'
हंगेरियन ing / इङ्ग [iŋɡ] 'कुरता/शर्ट' /g/ च्या आधी /n/ चे उपध्वनी.
इस्लेन्स्का ng / केइङ्क [ˈkœy̯ŋk] 'बोगदा'
इलोको ngalngal / ङालङाल [ŋalŋal] 'चावणे'
इनुक्टिटुट ᐆᖅ / पूङ्ङूक़ [puːŋŋuːq] 'कुत्रे'
इनुव्यालुक्तुन qamnguiyuaq / क़ाम्ङुइयुआक़ [qamŋuijuaq] 'घोर'
आयरिश a nglór / अं ङ्लोर [ˌə̃ ˈŋl̪ˠoːɾˠ] 'त्यांचा आवाज'
इटलियन[] anche / आङ्के [ˈaŋke] 'देखील'
इतनमन қниң / क़्निङ [qniŋ] 'एक'
जपानी प्रामाणिक 南極 / नाङ्क्योकु [naŋkʲokɯ] 'दक्षिण ध्रुव' जपानी ध्वनीशास्त्र पहा.
पूर्व बोलीभाषा[] / काङी [kaŋi] 'चावी'
भाषा जावा sengak / सङाक [səŋak] घाण वास येणे
जिन युची / ङीए [ŋie] 'मी'
कागायनेन[] manang / मानाङ [manaŋ] 'ताई/थोरली बहीण'
करेली[१०] ongi / ओङी [ˈoŋɡi] 'मासेमारीचा गळ' फक्त /g/, /k/ आणि /kk/ च्या आधी.
करेन पूर्व प्वो ယ်ဝ် / ङे ङॉ [ŋɛ̀ ŋɔ̀] 'भांडणात येणे'
पश्चिम प्वो ငါငီၩငါစၪ / ङा ङॉ ङा सा [ŋâ ŋɔ́ ŋâ sà] 'बिनडोक'
काझाक мың / मङ / مىڭ [məŋ] 'हजार'
किर्गिझ миң / मीङ/ مئڭ [miŋ]
केट аяң / ajaņ / अयङ [ajaŋ] 'शाप लावणे'
खाडिया[११] लअ [lǎŋ] 'जीभ'
खासी ngap / ङाप [ŋap] 'मध'
हांगुली 성에 / सङे [sʌŋe] 'बर्फ' हांगुली ध्वनीशास्त्र पहा.
कुर्दी कुर्मांजी ceng / جه‌نگ/ जेङ [dʒɛŋ] 'युद्ध, जंग' कुर्दी ध्वनीशास्त्र पहा.
मध्य جه‌نگ / ceng / जेङ
दक्षिण
ओलुगांडा ŋaaŋa / ङाङा [ŋɑːŋɑ] 'धनेश'
लक्झेंबर्गी[१२] keng / खॅङ [kʰæŋ] 'कोणी नाही' लक्झेंबर्गी ध्वनीशास्त्र पहा.
मासेदोनी aнглиски / angliski / आङ्लीस्की [ˈaŋɡliski] 'इंग्रजी'
मलाय भाषा मलय आणिभाषा इंदोनेसिया bangun / باڠون / बाङुन [ˈbaŋʊn] 'उठ'
क्लांते-पट्टानी sini / सीनीङ [si.niŋ] 'इथे'
त्रनुंगी ayam / आयाङ [a.jaŋ] 'कोंबडी'
मल्याळम[] മാങ്ങ / maanga / माङ्ङ [maːŋŋɐ] 'आंबा' मल्याळम ध्वनीशास्त्र पहा.
मॅंडरिन प्रामाणिक 北京 / पेइचिङ [peɪ˨˩tɕiŋ˥] 'बीजिंग' मात्रा कोडाला मर्यादित.
सच्वानी / ङॉ [ŋɔ˨˩] 'मी'
मराठी रंग [rəŋə] 'रंग' मराठी ध्वनीशास्त्र पहा.
मारी еҥ / येङ [jeŋ] 'माणूस'
मंगोली тэнгэр / teŋger / तेङ्गेर [teŋger] 'आकाश'
नेपाळी [nʌŋ] 'नख'
ङाङासान ӈаӈ / ङाङ [ŋaŋ] 'तोंड'
निवख ңамг / ङाम्ग [ŋamɡ] 'सात'
उत्तर फ्रीसी मूरींग kåchelng / कॉख़ल्ङ [ˈkɔxəlŋ] 'चुला'
उत्तर मीन / ङुई [ŋui] 'बाहेर'
उत्तर सामी[१३] पूर्व फिन्मार्क maŋis / मॉङीस [mɒːŋiːs] 'मागे'
पश्चिम फिन्मार्क máŋga / माङ्का [mɑːŋˑka] 'खूप'
नॉर्वेजियन gang / गाङ [ɡɑŋ] 'दालन'
उडिया ଏବଂ / एवं [ebɔŋ] 'आणि'
ओकीनावी nkai / ङ्काई [ŋkai] '-ला'
ओस्मानी तुर्की یڭی / येङी [jeŋi] 'नवीन'
पंजाबी गुरुमुखी ਰੰਗ / रंग [rəŋ] 'रंग'
शाहमुखी رنگ / रंग
फारशी इराणी [ræŋg]
पिपिल nemanha / नेमाङ [nemaŋa] 'नंतर'
पोलिश[१४] bank / बाङ्क [bäŋk] 'बँक'
पोर्तुगी manga / मं(ङ्)ग [ˈmɐ̃(ŋ)ɡɐ] 'आंबा'
ऑक्सितान प्रॉवाँसाल vin / वीङ [viŋ] 'वाईन'
रापानुई hanga / हाङा [haŋa] 'उपसागर'
रोमानी त्रान्सिल्वानी[१५] câine / किङी ['kɨŋi] 'कुत्रे'
सामोअन gagana / ङाङाना [ŋaˈŋana] 'भाषा'
सर्बो-क्रोएशियन stanka / станка / स्ताङ्का [stâːŋka] 'विराम'
सेरी comcáac / कोङ्काक [koŋˈkaak] 'सेरी लोक'
शोना n`anga / ङाङ्गा [ŋaŋɡa] 'पारंपरिक वैद्य'
स्लोव्हेन tank / ताङ्क [ˈt̪âːŋk] 'टाकी'
दक्षिण मीन मिन्नानी / ङ् [ŋ̍˨˦] 'पिवळे'
त्योत्सी / ङ् [ŋ̍55]
स्पॅनिश[१६] सगळे बोलीभाषा domingo / दोमींङ्गो [d̪o̞ˈmĩŋɡo̞] 'रविवार'
गालिसी, स्पॅनिश, अन्दालुसी, कनारी, अंदेई, आणि जस्तीतर करिबेयन बोलीभाषा alquitrán / आल्कीत्राङ [alkiˈtɾaŋ] 'डांबर'
स्वाहिली ng`ombe / نݝٗومْبٖ / ङोंबे [ŋombɛ] 'गाय'
स्वीडिश प्रामाणिक ingenting / इङेन्थिङ [ɪŋɛnˈtʰɪŋ] 'काही नाही'
दक्षिण वेस्टेबॉटेन[१७] ngiv / ङीव [ˈŋiːv] 'चाकू'
तगालोग nganga / ङाङा [ŋɐˈŋa] 'तोंड उघडणे'
तमिळ ங்கே / इङ्के [iŋgeː] 'इथे'
तेलगू వాఙ్మయం / वाङ्मायाम् [ʋaːŋmajam] 'साहित्य' Allophone of अनुस्वारचे उपध्वनी जेव्हा त्यानंतर कण्ठ्य स्पर्श असे.
तिबेटी प्रामाणिक / ङा [ŋa˩˧] 'मी'
थाई าน / ङान [ŋaːn] 'काम'
नुएर ŋa / ङा [ŋa] 'कोण?' किंवा 'आहे कोण?'
तोंगी tangata / ताङाता [taŋata] 'माणूस'
तुआमोती rangi / ragi / राङी [raŋi] 'आकाश'
तुपी monhang / मॉङाङ [mɔɲaŋ] 'बनवणे'
तुर्की yangın / याङ्गिन [jɑŋˈɡɯn̟] 'आग'
तुर्कमनी ň / مۆنگ / मिङ [myŋ] 'हजार'
उय्गुर مىڭ / ming / मीङ [miŋ] 'हजार'
उझबेक ming / مینگ / मीङ [miŋ] 'हजार'
व्हेनेशियन man / माङ [maŋ] 'हात'
व्हियेतनामी[१८] ngà / ङा [ŋaː˨˩] 'हस्तिदंत'
वेल्श rhwng / रुङ [r̥ʊŋ] 'मध्ये'
पश्चिम फ्रीसी kening / केनिङ [ˈkeːnɪŋ] 'राजा'
वू / ng / ङ् [ŋ˩˧] 'पाच'
कौसा ing'ang'ane / इङाङाने [iŋaŋaːne] 'हादादा इबिस'
हुनानी / ngau / ङाउ [ŋau] 'उकळणे'
यी / nga / ङा [ŋa˧] 'मी'
युपिक ungungssiq / उङुङस्सिक़ [uŋuŋssiq] 'प्राणी'
झापोटेक तिल्कीयापान[१९] yan / याङ [jaŋ] 'मान'

नोंदी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 Ladefoged (2005).
  2. Dum-Tragut (2009).
  3. Sabev, Mitko. "Bulgarian Sound System". 11 July 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 July 2013 रोजी पाहिले.
  4. Carbonell & Llisterri (1992).
  5. Gussenhoven (1992).
  6. Wells (1989).
  7. Rogers & d'Arcangeli (2004).
  8. Okada (1999).
  9. Olson et al. (2010).
  10. Jeskanen, Matti; Jahn, Eila (2022). "Karjalan grammari kaikella rahvahalla 1" [Karelian Grammar to Commoners 1] (PDF) (करेलियन and फिनिश भाषेत). Karjalan Kielet ry. pp. 13, 19. 22 December 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 19 October 2024 रोजी पाहिले.
  11. Anderson, Gregory D. S. (2016). "Austroasiatic languages of South Asia". In Hock, Hans Henrich; Bashir, Elena (eds.). The Languages and Linguistics of South Asia: A Comprehensive Guide. Volume 7 of The World of Linguistics. Berlin: Walter de Gruyter GmbH & Co KG. pp. 107–130. doi:10.1515/9783110423303-003.
  12. Gilles & Trouvain (2013).
  13. Aikio & Ylikoski (2022).
  14. Jassem (2003).
  15. Pop (1938).
  16. Martínez-Celdrán, Fernández-Planas & Carrera-Sabaté (2003).
  17. Söderström, Sven (1980). Hössjömålet: ordbok över en sydvästerbottnisk dialekt (2. uppl ed.). Umeå: Dialekt- och ortnamnsarkivet. ISBN 978-91-970358-1-1.
  18. Thompson (1959).
  19. Merrill (2008).