घायल (१९९० चित्रपट)
| शीर्षक | घायल |
|---|---|
| पुढील | Ghayal Once Again |
| गट-प्रकार | नाट्य चित्रपट, action film |
| प्रकाशन तारीख | 1990 |
| मूळ देश | भारत |
| मूळ भाषा | हिंदी |
| दिग्दर्शक | राजकुमार संतोषी |
| पटकथा | राजकुमार संतोषी |
| प्रमुख कलाकार | सनी देओल, मीनाक्षी शेषाद्री, राज बब्बर, मौसमी चॅटर्जी, अमरीश पुरी |
| संगीतकार | बप्पी लहिरी |
| निर्माता | धर्मेंद्र |
| निर्माती कंपनी | Vijayta Films |
| Distributed by | Vijayta Films |
| Narrative location | मुंबई |
| रंग | color |
| पुरस्कार | फिल्मफेर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार |
घायल हा १९९० चा हिंदी भाषेतील अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे जो राजकुमार संतोषी यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे आणि धर्मेंद्र यांनी निर्मित केला आहे. या चित्रपटात सनी देओल, मीनाक्षी शेषाद्री, राज बब्बर आणि अमरीश पुरी यांच्यासोबत मौसमी चॅटर्जी, अन्नू कपूर, ओम पुरी, शरत सक्सेना आणि सुदेश बेरी सहाय्यक भूमिकेत आहेत. या चित्रपटाने २० करोड रुपयांची कमाई केली आणि बॉक्स ऑफिस इंडियाने त्याला "सुपरहिट" घोषित केले.[१] तसेच हा वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट होता. बॉक्स ऑफिस इंडियाच्या मते, " घायलने रिपीट रनिंगमध्ये विक्रम प्रस्थापित केले होते. ९० च्या दशकातील कोणताही चित्रपट रिपीट रनिंगमध्ये त्याच्या जवळपासही नव्हता आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात फक्त शोलेने रिपीट रनमध्ये जास्त व्यवसाय केला आहे. रिलीज दरम्यान त्याने मूळ रनपेक्षा अनेक पट जास्त कमाई केली परंतु अचूक संख्या अज्ञात आहे."[२]
या चित्रपटाला ३६ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये ८ नामांकने मिळाली आणि ७ पुरस्कार जिंकले ज्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (संतोषी) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता (देओल) हे होते. ३८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये, या चित्रपटाला संपूर्ण मनोरंजन प्रदान करणाऱ्या सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आणि सनी देओलला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - विशेष उल्लेख मिळाला.
घायलचा १९९२ मध्ये तमिळमध्ये भरतन, १९९८ मध्ये तेलुगूमध्ये गमयम आणि १९९९ मध्ये कन्नडमध्ये विश्वा आणि मर्द म्हणून पाकस्तानी पंजाबी (१९९१) अशी पुनर्निर्मिती करण्यात आली. २०१६ मध्ये ह्याचा पुधील भाग घायल: वन्स अगेन प्रदर्शित झाला.[३]
गीत
[संपादन]चित्रपटातील गाण्यांना संगीत बप्पी लाहिरी यांनी दिले होते. चित्रपटात "मुंगडा" हे आणखी एक गाणे थोडक्यात सादर केले आहे, जे मूळतः १९७७ च्या इंकार चित्रपटातील आहे. "सोचना क्या" च्या दोन आवृत्त्या वगळता ज्या अंजानने लिहील्या आहे, इंदीवर यांनी सर्व गाणी लिहिली आहे.
| गाणे | गायक |
|---|---|
| "माहिया" (दुःखी) | लता मंगेशकर |
| "माहिया" (आनंदी) | लता मंगेशकर, पंकज उधास |
| "सोचना क्या" (आनंदी) | आशा भोसले, शब्बीर कुमार, कुमार सानू |
| "सोचना क्या" (दुःखी) | कुमार सानू |
| "डोन्ट से नो" | अमित कुमार, एस. जानकी |
| "प्यासी जवानी" | एस. जानकी |
पुरस्कार
[संपादन]३८ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार:[४]
- उत्तम मनोरंजन प्रदान करणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट - धर्मेंद्र व राजकुमार संतोषी
- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - विशेष ज्युरी पुरस्कार - सनी देओल
३६ वे फिल्मफेर पुरस्कार:
जिंकले
- सर्वोत्कृष्ट चित्रपट - धर्मेंद्र
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - राजकुमार संतोषी
- सर्वोत्कृष्ट अभिनेता - सनी देओल
- सर्वोत्कृष्ट कथा – राजकुमार संतोषी
- सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक - नितीश रॉय
- सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर - राजन कोठारी
- सर्वोत्कृष्ट संपादक - व्ही.एन. मयेकर
नामांकित
संदर्भ
[संपादन]- ↑ "Box Office 1990". Box Office India. 12 January 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 May 2015 रोजी पाहिले.
- ↑ "Rewind - Ghayal The Phenomena Of The Nineties - Box Office India". boxofficeindia.com. 2023-09-20 रोजी पाहिले.
- ↑ "Photos: Sunny Deol starrer 'Ghayal Once Again' box office collections soar to Rs 14.85 cr by day 2". The Financial Express. 6 February 2016.
- ↑ "38th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 27 March 2022 रोजी पाहिले.