घरटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Copyright-problem paste.svg***मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट करून घेतलेल्या मजकुर ओळीची/परिच्छेदाची सीमारेषा / समाप्ती रेषा अशी दाखवावी***

एखाद्या प्राण्याने अंडी घालण्यासाठी आणि त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या पिल्लांची जोपासना करण्यासाठी किंवा विसाव्यासाठी अथवा स्वसंरक्षणासाठी तयार केलेल्या सुरक्षित जागेला घरटे म्हणतात. घरटे म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यांसमोर पक्ष्याचे घरटे उभे राहते, पण प्राणिजगतात फक्त पक्षीच घरटे बांधतात असे नव्हे; तर कित्येक अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेले) प्राणी, मासे, उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणारे), सरीसृप (सरपटणारे) आणि सस्तन प्राणीही घरटी तयार करतात. घरटे बांधण्याच्या प्रक्रियेतील पहिली महत्त्वाची पायरी म्हणजे योग्य जागेची निवड ही होय. अंडी घालण्याच्या किंवा पिल्ले जन्मण्याच्या आधीपासून प्राणी अतिशय श्रम घेऊन घरटे बांधण्याची तयारी करीत असतात. आसपासची परिस्थिती आणि अंड्यातून बाहेर पडणाऱ्या पिल्लांची स्थिती यांवर ही तयारी बऱ्याच अंशी अवलंबून असते.


अपृष्ठवंशी प्राणी : सामान्यतः कीटक आपली अंडी जमिनीत उथळ भोक पाडून पुरतात किंवा वृक्षांच्या सालीच्या भेगांत घालतात. पुष्कळ कीटकांच्या माद्यांना अंडनिक्षेपक (अंडी घालण्याकरिता असणारी विशेषित संरचना) असल्यामुळे सालीत अथवा एखाद्या प्राण्याच्या शरीरात (परजीवी म्हणून) अंड्यांचे अंतःक्षेपण (आत घालणे) करता येते. काही कीटक अंड्यांसाठी अतिशय जटिल निक्षेपागार (अंडी घालण्याकरिता सुरक्षित जागा) तयार करतात. याचे अगदी सामान्य स्वरूप खोल भोकासारखे किंवा बोगद्यासारखे असून त्यात कीटक अंडी घालतात. पिल्लांसाठी त्यात भरपूर अन्न ठेवून त्याचे तोंड बंद करतात. निश्चित डिंभावस्थेनंतर (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्थेनंतर) रूपांतरण होणाऱ्या उच्च कीटकांमध्ये ही सोय आढळते.

शेणकिडा जमिनीत भोक पाडून त्यात अंडी घालतो. त्याच्या अगदी वौशिष्ट्यपूर्ण डिंभावस्थेत शेणाचा अन्न म्हणून उपयोग होतो म्हणूनच त्याच्या घरट्यात शेणाच्या लहान गोळ्यांचा भरपूर साठा केलेला असतो. मधमाश्या, गांधील माश्या व करवती-माश्या या हायमेनॉप्टेरा गणातील कीटकांचे घरटे खूपच परिश्रम घेऊन बांधलेले असते. मधमाश्यांची पोळी ही लोंबती घरे असतात. करवती-माश्या वृक्षांना भोके पाडून त्यांच्या तळाला अंडी घालतात. अंड्यांतून बाहेर पडलेले डिंभ आतील साल खातात. पुष्कळ एकाकी मधमाश्या व गांधील माश्या जमिनीत किंवा लाकडाला भोके पाडून त्यांत अंडी घालतात. मधमाशी आपल्या डिंभासाठी पराग किंवा पराग व मधाचे मिश्रण अन्न म्हणून ठेवते. गांधील माश्यांच्या पिल्लांसाठी कोळी, नाकतोडे, माश्या इ. प्राणी अन्न म्हणून ठेवलेले असतात. कुंभारिणीचे घरटे चिखलाचे असते व त्याला खास अस्तर असते. अंडी घातल्यावर त्यात योग्य अन्न ठेवून ती ते बंद करते.


वाळवी (उधई), मधमाश्या व गांधील माश्या यांच्यासारख्या समूह करून राहणाऱ्या कीटकांची घरटी फार परिश्रम घेऊन आणि पिल्लांची काळजी घेण्याच्या व त्यांचे रक्षण करण्याच्या दृष्टीने बांधलेली असतात. मधमाश्या व गांधील माश्या यांच्या फक्त माद्याच व बहुधा कामकरी माश्या घरटे बांधण्याचे काम करतात. मधमाश्यांचे पोळे मेणाचे असून त्याची रचना जटिल असते व त्यात प्रत्येक अळीसाठी वेगळा कप्पा असतो. वाळवी आपले वारूळ जमिनीत तयार करते आणि ते नर व माद्या मिळून तयार करतात.

कोळ्यांच्या माद्या आपली अंडी एका पिशवीत बंद करून त्यांचे रक्षण करतात. मादीच्या तनित्रापासून (रेशमी धागा तयार करणाऱ्या इंद्रियापासून) काढलेल्या रेशमी धाग्यापासून ही पिशवी विणलेली असते. ती झाडाच्या सैल सालीत किंवा दगडाखाली पानांमध्ये टांगती ठेवलेली असून मादी त्यावर पहारा करते. लांडगा-कोळ्याची मादी पिशवी आपल्याबरोबर घेऊन हिंडते. पाणकोळ्याची मादी मिशवी आपल्याबरोबर घेऊन हिंडते. पाणकोळ्याचे घरटे विशेष उल्लेखनीय आहे. पाण्याखाली एक रेशमी पिशवी तयार केलेली असून ती पाणवनस्पतींना घट्ट बांधलेली असते. तिच्यात हवा भरलेली असते.


उष्ण कटिबंधात मुबलक आढळणारा कूटद्वार-कोळी जमिनीत सु. १५ सेंमी. खोल आणि ३ सेंमी. व्यासाचे बीळ तयार करून त्याला रेशमी अस्तर लावतो. बिळाच्या जमिनीवरील टोकाच्या कडा सारख्या करून त्याच्यावर झाकण अथवा कूटद्वार बसवितो. हे झाकण रेशमी धाग्यांचे दाट जाळे आणि माती यांचे बनविलेले असून बिळाच्या काठावर रेशमाच्या बिजागरीनेच बसविलेले असते व ते बाटलीच्या बुचाप्रमाणे घट्ट बसते. झाकणाच्या वरच्या बाजूचा रंग आजूबाजूच्या जमिनीच्या रंगासारखा असल्यामुळे ते बंद असताना मुळीच दिसत नाही. पिल्ले आईच्याबरोबर तिच्या बिळात पूर्ण वाढ होईपर्यंत म्हणजे सु. आठ महिन्यांपर्यंत सुद्धा असातात. नंतर बाहेर पडून ती आपल्याकरिता स्वतंत्र बिळे करू लागतात.

आर्थ्रोपोडा संघातील प्राण्यांखेरीज इतर अपृष्ठवंशी संघांतील प्राणी क्वचितच घरटे तयार करतात. काही ॲनेलिड कृमी ज्या बिळात राहतात त्यात आणि कित्येक नलिका-कृमी आपल्या नलिकेतच अंडी घालतात. काही जळवा सापेक्षतः थोडी अंडी घालतात व पिल्ले त्यांच्या अंगाला चिकटून त्यांच्या बरोबर जातात. एक समुद्री अर्चिन (हेमीॲस्टर फिलिप्पाय ) आपली पिल्ले पाठीवरील भ्रूणधानीत ठेवतो, तर एक तारामीन (ॲस्टेरिॲस स्पायरॅबिलिस) मुखाभोवती असणाऱ्या भ्रूणधानीतून पिल्ले आपल्याबरोबर नेतो.


पृष्ठवंशी प्राणी : मासे : सर्वच मासे घरटे तयार करीत नाहीत. सायक्लोस्टोमाटा वर्गातील लँप्री मासा घरटे तयार करतो. प्रजोत्पादनाच्या काळात नर आणि मादी ज्या ठिकाणी पाणी

आ. २ स्टिकलबॅक (कंटकपृष्ठ) माशाचे घरटे.

स्वच्छ असेल अशा उथळ जागी जातात आणि तळावरील दगड हलवून, पुढेमागे करून फक्त वाळू असलेला एक उथळ वाटोळा खळगा तयार करतात; हे लँप्रीचे घरटे होय. मादी त्यात अंडी घालते व तेथेच त्यांचे निषेचन (फलन) होऊन सु. एक महिन्याने डिंभ बाहेर पडतात. ॲमिया काल्व्हा  हा मासादेखील सरोवराच्या कडेला दलदलीच्या जागी अशाच तऱ्हेचा सु. ३०-३५ सेंमी. व्यासाचा एक खळगा करून त्यात अंडी घालतो. काही मार्जारमीन अशीच खळग्यासारखी घरटी तयार करतात. स्टिकलबॅक (कंटकपृष्ठ) मासे गोड्या पाण्यात त्याचप्रमाणे समुद्रात राहणारे आहेत. ते पाण्यातील तणाची घरटी बांधतात. घरटे बांधण्याचे काम नर करतो. त्याच्या वृक्कापासून (मूत्र तयार करणाऱ्या इंद्रियापासून) निघणाऱ्या एक प्रकारच्या चिकट स्रावाने तणे एके ठिकाणी चिकटवून तो सुंदर घरटे बनवितो. मादीने घरट्यात अंडी घातल्यावर नर त्यांचा ताबा घेतो व ती फुटून पिल्ले बाहेर पडेपर्यंत त्यांची काळजी घेतो.


भारतीय चित्रमत्स्य (रेनबो मासा) व मलेशिया द्वीपकल्पातील गुरामी (ऑस्फ्रोनेमस ) हे मासे समुद्रपृष्ठावरील वनस्पतींमध्ये हवेचे बुडबुडे फुंकून घरटे तयार करतात; एक भारतीय चित्रमत्स्याचे (रेनबो फिश) घरटे.प्रकारच्या लाळेमुळे हे बुडबुडे टणक आणि टिकावू झालेले असतात. सयामी उडत्या माशाचे घरटे असेच हवेच्या बुडबुड्यांचे असते. मादी अंडी घालू लागली म्हणजे नर एकेक अंडे उचलून बुडबुड्यांच्या पुंजक्यात ठेवतो. तो अंड्यांची काळजी घेतो. सायक्लिडी कुलातील मासे, काही मार्जारमीन व सिल्युरिडी कुलातील काही मासे (उदा., शिंगाळा) या माशांचे नर (काही जातींत नर आणि मादी) मुखगुहेचा (तोंडातील पोकळीचा) किंवा ग्रसनीचा (घशाचा) उपयोग भ्रूणधानीसारखा (भ्रूण ठेवलेल्या पिशवीसारखा) करून त्यात अंडी व पिल्ले बाळगतात. पिल्ले मोठी होऊन मुखातून बाहेर पडेपर्यंत नराला बहुधा उपाशी रहावे लागते. अश्वमीन (सीहॉर्स) आणि नलमीन (पाइपफिश) यांच्या नरांच्या उदरावर भ्रूणधानी असते. पिल्ले बाहेर पडेपर्यंत अंडी या भ्रूणधानीत असतात. गियानात आढळणाऱ्या ॲस्प्रेडो माशाच्या मादीची अंडी नेण्याची रीत विलक्षण असते. प्रजोत्पादनाच्या काळाच्या सुमारास शरीराच्या अधर बाजूची त्वचा छिद्रिष्ट (खळगे किंवा भोके असलेली) होते; अंडी घातल्यानंतर ती शीर्ष, उदर आणि युग्मित पक्षांच्या (हालचालीस उपयुक्त असणाऱ्या त्वचेच्या स्नायुमय घड्यांच्या, परांच्या) खालच्या पृष्ठाला चिकटतात व प्रत्येक अंडे एका खळग्यात बसते.

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले