Jump to content

घनकचरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

शहरांमधील कचरा हा गुंतागुंतीचा व गंभीर प्रश्‍न बनत चालला आहे. आपल्या भोगवादी समाजाकडून रोज प्रचंड प्रमाणात घनकचरा टाकला जातो. संपूर्ण जगात प्रतिवर्षी सुमारे १०० कोटी टन कचरा निर्माण होत असावा असा अंदाज आहे. हा सगळा कचरा एके ठिकाणी रचला तर माऊंट एव्हरेस्ट इतक्या उंचीचा पर्वत उभा राहिल. जगातील सर्वाधिक भोगवादी देश म्हणजे अमेरिका. तिथे निर्माण झालेली घनकचऱ्याची समस्या सर्वात गंभीर आहे. अमेरिकेतला रोजचा घरगुती कचरा, व्यापारी कचरा, औद्योगिक टाकाऊ पदार्थ यांचा एकत्रित विचार केला तर तो ७,००,००० मेट्रिक टनाहून अधिक भरेल.[ संदर्भ हवा ]

घन कचरा ढिगाऱ्यात फेकण्यामुळे शहर आणि गावं यांचं सौदर्य तर नष्ट होतंच पण त्यामुळे आरोग्यविषयक प्रश्‍न निर्माण होतात. हे कचऱ्याचे डोंगर रोगजंतूची वाहतूक करणाऱ्या माशा, डास, उंदीर आणि झुरळं यांच्या पैदाशीचे अड्डे बनतात. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उपाय सुचविले गेले आहेत. शहराच्या विविध भागातला कचरा गोळा करणे, त्याची दूरवरच्या एखाद्या ठिकाणी वाहतूक करणे, त्या ठिकाणी एक तर तो जाळून टाकणे किंवा कंपोस्ट खतासाठी वापरणे किंवा तसाच टाकून देणे या प्रकारे त्याची व्यवस्था केली जाते.

कोल्हापूर मधील घन कचरा
कोल्हापूर मधील घन कचरा

शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा अभ्यास करणे व कचऱ्याचे व्यवस्थापन व विल्हेवाट कशाप्रकारे करता येईल याचा अभ्यास करणे आवश्यक आहे कचऱ्यामुळे आरोग्यविषयक प्रश्‍न निर्माण होतात. घनकचरा साठत राहण्याने उद्भवणाऱ्या समस्याही वाढत आहेत आणि त्यावरचे सोपे उपाय काही नजरेसमोर येत नाहीत. 

वैद्यकीय कचरा हा देखील अलिकडे वाढू लागला आहे. मोठी हॉस्पिटले यांच्याकडे जमणाऱ्या सूई- सिरिंग, कापसाचे बोळे-बॅंडेज, प्लास्टर, आतडे-गर्भपिशवी, इत्यादी गोष्टींचा जैविक- वैद्यकीय-कचरा या संज्ञेत अंतर्भाव आहे. या कचऱ्याची हाताळणी व विल्हेवाट संदर्भात १९९८ या कायद्यात स्पष्ट निकष ठरवून निर्देश दिलेले आहेत. या कायद्याप्रमाणे या प्रकारच्या कचरा नियोजनावर देखरेख आणि अंकुश ठेवण्याची जबाबदारी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळावर आहे. आपल्या राज्यात ती जबाबदारी महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळावर आहे. 

कोल्हापूर मधील घन कचरा
कोल्हापूर मधील घन कचरा

घातक घनकचरा

[संपादन]

घनकचरा हा वेग-वेगळ्या शाखांमधून तयार होतो. त्याच्यामध्ये प्रमुखाने वेग-वेगळ्या कारखान्यामधून येणारे विषारी घटक जैविविधता खराब करू शकतात.त्याच्यामध्ये प्रमुखाने विषारी धातू, रसायने, घटक इत्यादी समाविष्ट असतात.घटक कचरा हा सहजपणे कोणत्याही द्रव्यात विरघळून जात नाही. त्यामुळे ते जसेच्या तसे त्या-त्या नैसर्गिक स्रोतामध्ये खूप काळ राहू शकतात.घातक घनकचरा सातून राहिल्याने पुढील परिणाम दिसू शकतात - १.विषारी पाधार्त्यांचे संचयन २.नैसर्गिक चक्रात बदल. ३ प्राणी आणि झाडांमध्ये विष संचयन, ४.तेते राहणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या स्रोतातून विष संचयन आणि त्यांचे शरीरावर होणारे परिणाम . ५ नैसर्गिक घटकांचे प्रदूषण

घातक घन कचरा वेस्थापान हे वेग-वेगळ्या प्रकारे करता येते.ते पुढील प्रमाणे- १ .मोठ्या प्रमाणाच्या तापमानावर घन कचरा जाळून टाकणे २. खूप खोलवर घन घातक कचरा पुरणे. ३. वेग-वेगळ्या रासायनिक क्रिया वापरून घातक घन कचरा संपुष्टात आणणे ४. वेग-वेगळे जैविक घटकांचा वापर करून घन घातक कचऱ्याचे प्रमाण कमी करणे.)

घनकचरा निर्मिती

[संपादन]

घन कचऱ्याची निर्मिती घराघरातून होत असल्याने गोळा होणाऱ्या घनकचऱ्याचे प्रमाण वा त्याचा दर्जा यावर नियंत्रण ठेवता येत नाही. परिणामी त्याची साठवण, वाहतूक व्यवस्था वा त्यावरील प्रक्रिया यांचे डिझाईन करण्यासाठी सांख्यिकी पद्धतींचा वापर करावा लागतो. साहजिकच ही व्यवस्था सर्व परिस्थितीत कार्यक्षम राहण्यासाठी अधिक लवचिक व सुसज्ज ठेवणेे आवश्यक ठरते. यासाठी लागणारी साधन सामुग्री, मनुष्यबळ व आर्थिक तरतूद बहुतेक नगरपालिकांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असते. त्यामुळे कचरा पेटीतून भरून वाहणे, तेथेच कुजून दुर्गंधी पसरणे, पाण्यात मिसळल्याने पाणी दूषित होणे व शहरी परिसर अस्वच्छ दिसणे या गोष्टी सर्वसामान्य झाल्या आहेत. गोळा केलेला कचराही शहराबाहेर उघड्यावर टाकून दिल्याने तेथेही मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असलेले बहुतेक ठिकाणी दिसून येते.[ संदर्भ हवा ]

घन कचरा स्वतः वाहून जात नाही. तो उचलून न्यावा लागतो यामुळे प्रदूषण त्या जागीच मर्यादित राहत असले तरी न वापरातील सर्व जागा हळुहळू कचऱ्याने व्यापल्या जातात आणि प्रत्यक्ष कृतीशिवाय स्वच्छता होत नाही. केवळ कायदे करून वा नगरपालिकेची कार्यक्षमता वाढवून या समस्येचे निराकरण करता येणार नाही. याउलट लोकांची मानसिकता बदलली आणि त्यांनी जाणीवपूर्वक यात सहभाग घेतला तर एरवी अशक्य व खर्चिक वाटणारी ही योजना अत्यंत कमी खर्चात प्रभावीपणे यशस्वीपणे राबविता येईल. घनकचरा व्यवस्थापनासाठी नवीन तंत्रज्ञान वापरणे ही काळाची गरज बनलेली आहे.

विविध ठिकाणी होणारी घनकचरा निर्मिती

[संपादन]
  • दिल्ली ४६०० मे. टन
  • चेन्नई ३५०० मे. टन
  • मुंबई ५००० मे. टन
  • पुणे १५२७ मे. टन
  • नागपूर ११०० मे. टन
  • नाशिक ४३५ मे. टन
  • कोल्हापूर २५० मे. टन
  • सांगली ५५ मे. टन [ संदर्भ हवा ]

घनकचरा वर्गीकरण

[संपादन]

घनकचरा हा मुख्यत्वे करून दोन गटांमध्ये विभागाला जातो.

  • ओला कचरा
  • सुका कचरा

पहिल्याप्रथम या कच-याची वर्गवारी केली पाहिजे. यातून कुजणारा कचरा घरच्या घरी कुजवून खत करता येते. उरलेला कचरा सार्वजनिक व्यवस्थेने उचलावा. घरातील कच-याच्या वर्गवारीसाठी निरनिराळया रंगाचे डबे/बादल्या वापराव्यात.एक गाव एक कचरा प्रक्रिया प्रकल्प राबवला पाहिजे जेणेकरून गावातून तयार होणारा ओला कचरा जो आहे तो गावाबाहेर प्रक्रिया केला जायील व त्यातून वीज तयार होईल. जो गाळ राहील तो शेतीसाठी वापरता येयील व कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]