Jump to content

गजाननराव कोळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ग.मो. कोळी या पानावरून पुनर्निर्देशित)

गजाननराव कोळी ऊर्फ ग.मो.कोळी हे ठाणे नगरपालिकेत नगरसेवक होते.

गजाननराव कोळी
जन्म गजाननराव कोळी
[[]], [[]]
ठाणे
मृत्यू १३ ऑगस्ट १९९१
निवासस्थान ठाणे महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा नगरसेवक,आमदार.


जीवन व कारकीर्द

[संपादन]

ग.मो.कोळी हे ठाण्याच्या सार्वजनिक वर्तुळात जीएम म्हणून ओळखले जात असत. इसवी सन १९५२ मध्ये ते अपक्ष म्हणून ठाणे नगरपरिषदेत निवडून आले. इसवी सन १९६२ पर्यंत सलग दहा वर्षे ते नगरसेवक म्हणून निवडून येत होते. इसवी सन १९५५-५६ मध्ये ते पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला. ठाणे नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावरसुद्धा ते कार्यरत होते.नंतर आमदार झाल्यावर त्यांनी डोंगरी कोळी समाजाचे सर्वेक्षण करून घेतले.ते लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी सायकलवर फिरत. ते लोकांचे आवडते लोकप्रतिनिधी होते. त्यांची राहणी अतिशय साधी होती. त्यांची वृत्ती सेवाभावी होती.आळंदी येथील वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष होते.

ग.मो.कोळी मार्ग

[संपादन]

ठाणे महानगरपालिकेने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन चेंदणी कोळीवाडा येथून रेल्वे मार्गाच्या खालून ठाणेपूर्व भागात जाणाऱ्या रस्त्याला ग.मो.कोळी मार्ग हे नाव दिलेले आहे.

मृत्यू

[संपादन]

दिनांक १३ ऑगस्ट १९९१ रोजी त्यांचे निधन झाले.[]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, मंगळवार,१६ जुलै २०२४