ग्लॅडिस अल्वारिस
Appearance
ग्लॅडिस अल्वारिस या ठाणे शहरातील एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या.
जीवन व कारकीर्द
[संपादन]- ग्लॅडिस अल्वारिस या मुंबई शहरातील दादर येथील रहिवासी होत्या.
- त्यांचा विवाह ठाणे चरई येथील उद्योजक [[एडी अल्वारिस यांच्याबरोबर झाल्यानंतर त्या ठाणे येथे स्थायिक झाल्या.
- ग्लॅडिस अल्वारिस या स्वभावाने कनवाळू होत्या. त्यांनी कुष्ठरोग्यांसाठीऔषधे व पौष्टिक खाद्यपदार्थांची सोय केली.तुरुंगातील कैद्यांना सुद्धा त्यांनी औषधे वगैरे पुरवली.
- ठाण्यातील आमदार विमलताई रांगणेकर व ठाण्याच्या नगराध्यक्षा सुमनताई हेगडे यांच्याबरोबर महिला आणि बालकल्याणाच्या उपक्रमात सहभागी झाल्या.
- लष्करी दलांच्या निधी संकलन मोहिमांमध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतला.
- इसवी सन १९७३ मधे त्या ऑस्ट्रेलिया येथे महिला परिषदेसाठी गेल्या होत्या.
- ग्लॅडिस अल्वारिस या ठाण्यातील एक समाजसेविका होत्या.
ग्लॅडिस अल्वारिस मार्ग
[संपादन]ठाणे महानगरपालिकेने अल्वारिस यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोखरण रोड नंबर २ येथून पुढे वसंत विहार परिसराकडे जाणाऱ्या रस्त्याला ग्लॅडिस अल्वारिस मार्ग हे नाव दिलेले आहे.या रस्त्यावर खाऊगल्ली तयार झाली आहे.याच रस्त्यावर डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह आहे.गोदरेज इडनवूडस व कॉसमॉस हेरिटेज ही निवासी संकुले सुद्धा याच रस्त्यावर आहेत.
मृत्यू
[संपादन]इसवी सन १९७३ मध्ये त्या महिला परिषदेसाठी ऑस्ट्रेलिया येथे गेल्या होत्या तिथे एका अपघातात त्यांचे निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय अवघे ५३ होते.[१]
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ महाराष्ट्र टाईम्स,मुंबई टाईम्स,मंगळवार,१६ जुलै २०२४