गौरी पिंटो
गौरी पिंटो (जन्म - १६ नोव्हेंबर १९३७ बंगलोर [१]), श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशनमधील एक शिक्षिका आणि लेखिका म्हणून परिचित आहेत.
जीवन
[संपादन]यांचे मूळ नाव ज्युडी ॲन पिंटो असे होते. श्रीमाताजींनी त्यांना दिलेले नाव गौरी हे होते. पुढे त्याच नावाने त्या ओळखल्या जाऊ लागल्या. मोना आणि लॉरेन्स (उदार-दा) पिंटो यांच्या गौरी या कन्या. श्रीअरविंद आश्रमातील हठयोगाचे प्रशिक्षक असलेले अंबू यांच्या देखरेखीखाली गौरीचे बालपण गेले. निसर्ग व प्राण्यांची गौरी यांना अतिशय आवड होती. पॉल ब्रंटन यांच्या सचिव असणाऱ्या पविता यांच्याकडे गौरी यांचे प्राथमिक शिक्षण झाले.
१९६८, १९७५, १९८६ आणि १९९० साली गौरी आपल्या आईबरोबर नातेवाईकांकडे लंडनला गेल्या होत्या. पण आश्रमातील जीवनाला सरावलेल्या गौरी यांच्या मनात विवाहाचा कधी विचारच आला नाही, असे त्या सांगतात.
श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशनमध्ये त्या पंचेचाळीस वर्षे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्या इंग्रजी विषय आणि चित्रकलेचे अध्यापन करत असत.[१]
संपादित लेखन
[संपादन]उदार - वन ऑफ द मदर्स चिल्ड्रेन, प्रकाशन - श्रीअरविंद उद्योग ट्रस्ट, पाँडिचेरी [२]
पूरक
[संपादन]श्रीमती गौरी पिंटो यांची मुलाखत
संदर्भ
[संपादन]- ^ a b "Interview with Gauri Pinto by Anie Nunnally". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-03-25 रोजी पाहिले.
- ^ "Home Page - Savitri". savitri.in. 2025-03-25 रोजी पाहिले.