गौतम पोशा भोईर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्व. गौतम पोशा भोईर यांनी आयुष्यभर जनतेची सेवा केली आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात “ब्रिटीश चले जाव” चळवळीत आंदोलक म्हणुन अग्रेसर राहीले, 1957 पासून सुरू झालेल्या “संयुक्त महाराष्ट्र” च्या लढ्यात पाच वर्ष सहभाग घेतला व काही काळ कारावासही भोगला.


Copyright-problem paste.svg
या लेखातील किंवा विभागातील मजकूर https://www.facebook.com/aiksamajiks/posts/981554481896947 येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.स्वातंत्र्य प्राप्ती नंतर सन १९५० साली घोडबंदर महामार्गाला जोडणारा वाघबिळ आणि कावेसर अशा दोन गावांचा रस्ता आणि विटावा येथे कळवा-बेलापूर पट्टीला जोडणारा रस्ता स्वातंत्र सेनानी “कै.एस. एम.जोशी”, “कै. दत्ता ताम्हाणे” आणि “कै. गौतम पोशा भोईर” यांच्या स्वातंत्र सेनानी राष्ट्र सेवादलाच्या “श्रमदान” उपक्रमातून रस्त्याचे काम पार पाडले. नवी मुंबई येथे सिडको प्रकल्पाकरीता भुमिपुत्रांच्या ज्या जमिनी घेतल्या गेल्या, तेव्हा शेतकऱ्यांना एक-एकरी रुपये ५०००/- असलेला भाव १५०००/- रुपयांनी मिळावा याकरीता विधानसभेत जनता पार्टीचे आमदार असताना कै. गौतम पोशा भोईर यांनी आवाज उठवून तो भाव मिळवून दिला.[ संदर्भ हवा ]

१९६१ साली "ग्रामीण शिक्षण संस्था स्थापन" केली.[ संदर्भ हवा ] संस्थेच्या अधक्ष्यपदी कार्यकरत असताना माजिवडा येथे हायस्कुलची निर्मिती करुण ग्रामीण भागातील गरीब गरजू होतकरू विध्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या. भातशेती उपयोगात यावी याकरीता "अधिक धान्य-पिकवा" या मोहीमे खाली बाळकुम-माजिवडा परिसरात भुमिपुत्रांकरीता खार जमिनींचा बंधारा बांधून दिला व त्यासोबत भात शेतीसाठी योग्य जमीन ग्रामीण शेतकऱ्यांना मिळवून दिली. बाळकुम ग्रामपंचायत व ठाणे नगरपालिकेचे सदस्य असताना ठाणे शहरातील जनतेच्या हिताचे अनेक प्रकल्प मंजूर करुन घेतले व स्थानिकांना रोजगार मिळवा या कारीता आग्रही भूमिका घेतली.1977 साली “जनता पक्ष ठाणे जिल्हाध्यक्ष पदाची” सुत्र सांभाळली. 1978 च्या विधानसभा निवडणुकीत नव्यानं निर्माण झालेल्या बेलापूर मतदार संघाचे क्र. 54 चे. “पहिले आमदार” म्हणुन निवडून आले.[ संदर्भ हवा ]

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले