गौतमी एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गौतमी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची काकीनाडा बंदर ते सिकंदराबाद जंक्शन स्टेशन दरम्यान धावणारी रेल्वे गाडी आहे.[१] या गाडीला गोदावरी नदीची उपनदी असलेल्या गौतमी नदीचे नाव दिलेले आहे.[२]

गौतमी एक्सप्रेस
गौतमी एक्सप्रेस मार्गे

इतिहास[संपादन]

गौतमी सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दक्षिण मध्य रेल्वेच्या प्रसिद्ध गाड्यांपैकी एक समजली जाते. हिची पहिली धाव ३ ऑक्टोबर, इ.स. १९८७ रोजी झाली. या गाडीला हैदराबाद आणि विशाखापट्टणम दरम्यान धावणाऱ्या गोदावरी एक्सप्रेसची जुळी गाडी समजतात. या गाडीला २००७ साली सुपरफास्ट एक्सप्रेसचा दर्जा दिला गेला. त्यावेळी तिचे मूळचे ७०४७/७०४८ हे गाडी क्रमांक बदलून १२७३७/१२७३८ हे क्रमांक दिले गेले[३][४] गौतमी सुपरफास्ट एक्सप्रेस ही आंध्र प्रदेशच्या तटीय जिल्ह्यांचे हैदराबादशी अंतर कमी करण्याचे साधन समजली जाते. या गाडीतील डबे नेहमी स्वच्छ असल्याची ख्याती आहे.[ दुजोरा हवा]

रचना[संपादन]

रोज २४ डबे असलेली ही गाडी भारतीय रेल्वेमधील सर्वाधिक लांबीच्या गाड्यांपैकी एक आहे. तिला ४ वातानुकूलित, १५ शयनयाने ३ द्वितीय श्रेणी सामान्य डबे आणि २ सामानवजा दुरुस्ती उपकरणांचे डबे असतात. या गाडीला इरोड येथे WAP4 प्रकारचे इंजिन लागते.. या एकाच इंजिनाच्या मदतीने ही गाडी काकीनाडा बंदर (COA) ते विजयवाडा (BZA)पर्यंत धावते. विजयवाडा येथून सिकंदराबादपर्यंत या गाडीला लल्लागुडा येथे WAP7 इंजिन लावले जाते. क्वचित WAP7 उपलब्ध नसल्यास WAP4 इंजिन लावण्यात येते.

दुर्घटना व अपघात[संपादन]

जुलै २००८ मध्ये गौतमी एक्सप्रेसच्या एका डब्यात दुपारी अचानक शॉर्ट सर्किट होउन आग लागली. जागे झालेल्या प्रवाशांनी आपात्कालीन साखळी ओढता गाडीची गती मंदावली. त्यावेळी प्रवाशांनी गाडीतून बाहेर उड्या टाकल्या. आगीमुळे आणि उड्या मारताना ४० प्रवासी या दुर्घटनेत दगावले. ही घटना वरंगळ जिल्ह्यातील केशमुद्रा स्टेशन ओलांडत असताना दुपारी १:०७ वाजता घडली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "गौतमी एक्सप्रेस लाइव्ह चालू स्थिती". रेलइनक्वायरी.इन. १४ ऑक्टोबर २०१५. 
  2. ^ "गौतमी एक्सप्रेस रेल्वे मार्ग". क्लिरट्रिप.कॉम. १४ ऑक्टोबर २०१५. 
  3. ^ "गौतमी एक्सप्रेस २७३८". इंडियारेलइन्फो. कॉम. १४ ऑक्टोबर २०१५. 
  4. ^ "गौतमी एक्सप्रेस २७३७". इंडियारेलइन्फो.कॉम. १४ ऑक्टोबर २०१५.