गोसावी-बैरागी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Copyright-problem paste.svg



***मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट करून घेतलेल्या मजकुर ओळीची/परिच्छेदाची सीमारेषा / समाप्ती रेषा अशी दाखवावी***

भारतात सर्वत्र आढळणारा हिंदू यतींचा एक वर्ग. ‘गोसाई’, ‘गुसाई’, ‘गोस्वामी’ अशाही नावांनी हा वर्ग ओळखला जातो. ही नावे ‘गोस्वामिन्’ ह्या संस्कृत शब्दापासून आली आहेत. गोस्वामिन् शब्दाचे दोन अर्थ होतात : (१) गोधनाचा मालक व (२) इंद्रियांवर ज्याचे स्वामित्व आहे असा म्हणजे जितेंद्रिय. यांतील दुसऱ्या अर्थी गोसावी हा शब्द येथे आला आहे. भारतात गोसाव्यांची संख्या बरीच आहे. विशेषतः मध्य प्रदेश, आसाम, प. बंगाल, महाराष्ट्र, राजस्थान ह्या प्रदेशांत ती अधिक आहे. बैरागी (सं. वैराग) हा शब्द व्यवहारात सर्वसामान्यपणे गोसावी ह्या अर्थी वापरला जातो. वास्तविक बैरागी हा गोसाव्यातील एक पोटभाग आहे.


वैदिक साहित्यात ‘गोस्वामी’ असे उल्लेख आढळतात. मात्र तेथे गोस्वामी म्हणजे ‘पुष्कळ गायींचा धनी’ ह्या अर्थी हा शब्द आलेला आहे. गोसावी हा एक यतींचा  वर्ग आहे तसेच ती एक जात म्हणूनही महाराष्ट्र व मध्य प्रदेश ह्या विभागांत ओळखली जाते. प्राचीन काळी यती व संन्यासी या संज्ञांत आजच्याप्रमाणे आवश्यक संबंध मानला जात नव्हता. काही यती गृहस्थाश्रमीही होते. भरद्वाज, पराशर, व्यास, गौतम, शुक, भृगू, वसिष्ठ इ. नावे गोसाव्यांच्या पूर्वपरंपरेत आढळतात. यांपैकी बहुतेक संन्यासी नसून गृहस्थ होते. दक्षप्रजापती व शंकर हे गृहस्थच होते. दक्षाचे उपनाम पर्वत होते. त्याचे पुत्र तपाच्या वेळी ‘ॐ नमो नारायणाय पुरुषाय महात्मने विशुद्धसत्त्वधीष्णाय महाहंसाय धीमही ’ हा मंत्र जपत. आजही गोसावी समाज नारायणाची पूजा करून याच मंत्राचा जप करतो असे दिसते.


महाभारतातील योगिराज दत्तात्रेयही गृहस्थाश्रम आचरणारा होता. यावरून गृहस्थ साधूंची परंपरा फार प्राचीन असावी असे दिसते. महाभारतकाळात विरक्त साधूंमध्येही गृहस्थ व संन्यासी असे दोन वर्ग होते. त्यांतील संन्याशांचे कुटिचक, बहूदक, हंस व परमहंस असे चार भेद होते. रामायणातही गृहस्थी व संन्यासी तपस्व्यांचे उल्लेख आढळतात. त्यांच्यात मुंडी, दंडी व परिव्राजक असे भेद होते. बौद्ध साहित्यात यतींचे जटीलक, मुंडशावक, त्रिदंडी (तेदंडिक) व देवधार्मिक असे भेद सांगितले आहेत. जैन संघातही श्रावक व श्राविका हे घटक गृहस्थ, तर मुनि-आर्यीका किंवा श्रमण-श्रमणी हे घटक गृहत्यागी आहेत.

गोसाव्यांची शूर व क्रूर म्हणूनही ख्याती आहे. मौर्य काळात त्यांची लहानलहान राज्ये होती. काश्मीरच्या राजाच्या पदरीही अनेक गोसावी होते असे राजतरंगिणीत म्हटले आहे. इ.स. ३०० च्या सुमारास पंजाबात व बुंदेलखंडात परिव्राजक ब्राह्मण राजांचे राज्य असल्याचा उल्लेख आढळतो. हे राजे गोसावीच होते. बाप्पा रावळ हा गुहिलवंशीय राजाही शैवयती होता आणि तो हरितमुनी नावाच्या गोसाव्याचा शिष्य होता. गोसावी व राजपूत यांच्यातील गुरुशिष्यसंबंध आजतागायतही आढळून येतो. एकलिंगजीचे पुजारी गोसावीच आहेत. अनेक राजपूत व मराठा राजे-सरदारांच्या सैन्यात गोसाव्यांचा भरणा बराच होता. औरंगजेबाने केलेल्या अन्यायांमुळे गोसावी जिवावर उदार होऊन त्याच्याशी लढले. गोसावी शब्दाने सुरुवात होणारी अनेक गावांची नावेही आढळतात. उदा., गोसाईपूर, गोसाईगंज इत्यादी. या सर्व बाबींवरून क्षात्रवृत्ती असलेल्या गोसाव्यांची एक परंपरा असल्याचे दिसून येते. खेड्यात लहान मुलांना ‘गोसावी आला व तो पकडून नेईल’ अशी पालक भीती घालतात

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले