गोळकोंड गेस्ट हाऊस
गोळकोंड डॉर्मिटरी, किंवा गोळकोंड, हे भारतातील पुडुचेरी शहरातील श्रीअरबिंदो आश्रमाचे एक खाजगी निवासस्थान आहे. ही इमारत 'भारतातील पहिली आधुनिकतावादी इमारत' म्हणून ओळखली जाते.[१]
स्थाननिश्चिती
[संपादन]11°56′17″N 79°50′03″E / 11.9381330761°N 79.834042576°E
प्रेरणा
[संपादन]
श्रीअरविंद आश्रमातील साधकांसाठी श्रीमाताजी एक निवासस्थान बांधू इच्छित होत्या. तेव्हा हैदराबाद संस्थानाचे निजाम सर अकबर हैदरी यांनी त्यासाठी देणगी दिली. त्या स्मृतीप्रीत्यर्थ या वास्तूचे नाव गोळकोंड या हैदराबादमधील प्रसिद्ध किल्ल्यावरून ठेवण्यात आले.[२]
वास्तू-निर्माण
[संपादन]चेकोस्लोव्हाकियन वास्तुविशारद अँटोनिन रेमंड यांनी डिझाइन केलेल्या इमारतीच्या बांधकामाची १९३७ साली सुरुवात झाली आणि १९४२ मध्ये ते पूर्ण झाले. रेमंडने प्रबलित काँक्रीटचा (reinforced concrete) वापर करून उष्ण आणि दमट हवामानाचे परिणाम कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या इमारतीची रचना केली होती. [१]
रेमंड पहिल्यांदा १९१९ मध्ये टोकियोमधील फ्रँक लॉयड राईटच्या इम्पीरियल हॉटेलमध्ये प्रकल्प वास्तुविशारद म्हणून काम करण्यासाठी जपानला गेले होते. रेमंड यांना जपानमध्ये विविध ठिकाणांना भेटी द्यायच्या होत्या. तेव्हा त्याच्या नियोजनाचे काम जॉर्ज नाकाशिमा यांनी केले होते आणि नंतर त्यांना चेक वास्तुविशारद फ्रँकोइस सॅमरसह गोलकोंड प्रकल्पाचे पर्यवेक्षण करण्यासाठी नियुक्त केले गेले होते. [३]
घटनाक्रम
[संपादन]१९३७ - बांधकामाचा आरंभ झाला.
१९४२ - बांधकाम पूर्ण झाले.
इमारतीची वैशिष्ट्ये
[संपादन]- सागवानी फर्निचर, जपानी शैलीचे काळ्या दगडाची फरसबंदी, चुरा केलेल्या शिंपल्यांच्या भिंती, झडप असलेले खिडक्यांचे मोठे तावदान आणि तेथील शांतता या गोष्टींमुळे त्यास वैशिष्ट्यपूर्णता लाभली आहे.[३]
व्यवस्थापन
[संपादन]मोना पिंटो ह्या एक इंग्रजी महिला गेस्ट हाउसच्या व्यवस्थापिका म्हणून काम सांभाळत असत. त्या व त्यांचे पती उदार पिंटो हे दोघेही आश्रमवासी होते.[२]
अधिक माहितीसाठी
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ a b Sharma, Komal (14 February 2017). "Golconde: The First Modernist Building in India". Metropolis Magazine. 8 June 2018 रोजी पाहिले.
- ^ a b Anie Nunnally (2004). The Golden Path. California: East West Cultural Center, The Sri Aurobindo Center of Los Angeles. ISBN 0-930736-05-2.
- ^ a b Golconde: The Introduction of Modernism in India. Urban Crayon Press. 2010.

