गोझो
Native name: ग्वादेश Nickname: इल-जझिरा तात-त्लिएत गोलियेत (कॅलिप्सो द्वीप) | |
---|---|
![]() गोझो आणि कोमिनोचे उपग्रहाने टिपलेले चित्र | |
![]() गोझोचे माल्टामधील स्थान | |
Geography | |
स्थान | भूमध्य समुद्रात सिसिलीच्या दक्षिणेस |
Coordinates | 36°03′N 14°15′E / 36.050°N 14.250°E |
Archipelago | माल्टा |
क्षेत्रफळ | साचा:Convinfobox/pri2 |
लांबी | १३.३४ km (८.२८९ mi) |
रुंदी | ७.१५ km (४.४४३ mi) |
Administration | |
Malta | |
Largest settlement | व्हिक्टोरिया[a] (pop. 7,242[१]) |
गोझोमंत्री | क्लिंट कॅमिलिएरी (पीएल) |
Demographics | |
Demonym | Gozitans |
Population | ▲ ३९,२८७[१] (२०२१) |
Pop. density | ५५७ /km२ (१,४४३ /sq mi) |
Languages | माल्टी भाषा , इंग्लिश |
Ethnic groups | माल्टी लोक |
![]() ![]() |
गोझो तथा गॉदेश[२] ( /ˈɡoʊzoʊ/, ) हे भूमध्य समुद्रातील माल्टा देशाच्या तीन मोठ्या बेटांपैकी[३] एक आहे
२०२१ मध्ये येथील लोकसंख्या सुमारे ३१,२३२ होती (माल्टाच्या एकूण ४४३,२२७ पैकी). [४] येथील रहिवाशांना गोझिटन्स तथा गॉदेशिन म्हणतात. येथील माल्टाच्या इतर मेगालिथिक मंदिरांसह, जगातील सर्वात जुन्या मुक्त-स्थायी रचनांपैकी एक आहेत. [५]
हे बेट ग्रामीण स्वरूपाचे आहे आणि माल्टा बेटापेक्षा कमी विकसित आहे. गोझो हे त्याच्या निसर्गरम्य टेकड्यांसाठी ओळखले जाते. हे त्याच्या मानचिह्नावर दाखवलेले आहेत. [६] सान लॉरेन्झमधील द्वेज्रा येथील निळी खिडकी ही एक नैसर्गिक चुनखडीची कमान होती. ही ८ मार्च २०१७ रोजी कोसळेपर्यंत एक उल्लेखनीय भूवैज्ञानिक वैशिष्ट्य समजली जात असे. याशिवाय बेटावरील वीड इल-मीलाह खिडकी आणि शाघ्रा आणि नादुरमधील रामला खाडी स्थानिक लोक आणि पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत. गोझो हे भूमध्य समुद्रातील सर्वोत्तम बुडी मारण्याच्या ठिकाणे आणि जलक्रीडा केंद्रांपैकी एक मानले जाते. [७]

गोझो येथे इ.स.पू. ५००० लोकवस्ती असल्याच्या खुणा आहेत. त्यावेळी जवळच्या सिसिलीचे शेतकरी समुद्र ओलांडून बेटावर आले. [८] घर दलम टप्प्यातील दोन्ही ठिकाणी आढळलेल्या समान मातीच्या भांड्यांमुळे हे पहिले स्थलांतरित मुख्यत्वे सिसिलीच्या अॅग्रिजेंटो परिसरातील होते. त्यांचे सिसिलीमध्ये शेतकरी नेमके कुठून आले हे सध्या अज्ञात आहे. ते प्रथम सान लॉरेन्झच्या बाह्य भागातील गुहांमध्ये राहत होते असे मानले जाते. [८]
१५३० मध्ये, पवित्र रोमन सम्राट चार्ल्स पाचवा यांनी माल्टासह हे बेट नाइट्स हॉस्पिटालिएरांना बक्षीस दिले.
जुलै १५५१ मध्ये, सिनान पाशाच्या उस्मानी लोकांनी गोझोवर आक्रमण केले आणि बेटाचा सर्वनाश केला, तेथील ५,००० रहिवाशांपैकी बहुतेकांना गुलाम बनवले आणि त्यांना म्गार इश-शिनी बंदरातून लिबियातील ताऱ्हुना वा म्सालाता येथे नेले. १५६५ ते १५८० दरम्यान नाइट्स ऑफ माल्टा यांनी गोझो बेटावर माल्टा बेटावरील लोकांचे पुनर्वसन केले. [९]



संदर्भ
[संपादन]- ^ a b "Population". Census of Population and Housing 2021: Final Report: Population, Migration and Other Social Characteristics (PDF). 1. Valletta: National Statistics Office. p. 19. 19 February 2023 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2023-02-19 रोजी पाहिले.
- ^ Grenville Temple (1836).
- ^ साचा:Cite EB1911
- ^ "Gozo with highest share of elderly population, regional stats show". MaltaToday.com.mt (इंग्रजी भाषेत). 2021-11-06 रोजी पाहिले.
- ^ "Ġgantija Temples". Heritage Malta. 5 January 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 August 2015 रोजी पाहिले.
- ^ "Coat of Arms of the Island Region of Gozo". VisitGozo.com. October 2013. 13 July 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 June 2015 रोजी पाहिले.
- ^ "Where is Gozo?". Gozo & Malta. रोजी मूळ पानापासून संग्रहित21 January 2013. 26 March 2013 रोजी पाहिले.CS1 maint: unfit url (link)
- ^ a b "History of Gozo". islandofgozo.org. Gozo Tourism Association. 8 October 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 November 2014 रोजी पाहिले.
- ^ "The Gozo Citadel: The pride of Gozo island with a tragic past!". maltabulb.com. 28 July 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 May 2018 रोजी पाहिले.
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/>
खूण मिळाली नाही.