गृह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Copyright-problem paste.svg***मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट करून घेतलेल्या मजकुर ओळीची/परिच्छेदाची सीमारेषा / समाप्ती रेषा अशी दाखवावी***
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

गृह म्हणजे निवासासाठी बांधलेली वास्तू. मानवी संस्कृतीमध्ये गृहसंस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वास्तू ही संज्ञाही गृहासाठी वापरतात. संस्कृत वस् धातूवरून (अर्थ-राहणे) ही संज्ञा बनली आहे. स्थापत्य अभियांत्रिकीप्रमाणेच वास्तुकलेतही गृहविचार केला जातो. परंतु अभियांत्रिकीय विचार अधिक तांत्रिक स्वरूपाचा [→ इमारती व घरे] व वास्तुकलेतील विचार अधिक कलात्मक, सांस्कृतिक स्वरूपाचा असतो. प्रामुख्याने या दुसऱ्या प्रकारचा विचार येथे केलेला आहे.


भारतीय परंपरेनुसार धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या चतुर्विध पुरुषार्थांची साधना करता यावी, अशा दृष्टिकोनातून वास्तूची विवक्षित प्रकारे रचना केली जाते. उदा., धार्मिक साधनेसाठी देवघराची योजना, संपत्तीच्या वा धान्याच्या संचयासाठी विशिष्ट व्यवस्था, पतिपत्नींसाठी शयनगृहे इत्यादी. सर्व वास्तूंचा परस्परसंबंध मार्गांद्वारे जोडला जातो व त्यातून नगररचना अस्तित्वात येते. वस्तीच्या धारणेमागे सर्वांगीण दृष्ट्या संरक्षणाचा विचार अभिप्रेत असतो.


दलदलीच्या अथवा पूरग्रस्त भागांतील घरे लाकडी खांबांवर व उंचावर बांधलेली असतात. श्रीमंतांची घरे कित्येकदा कुटुंब लहान असूनही प्रशस्त असतात, तर गरिबांची घरे कुटुंब मोठे असूनही लहान असतात. नगररचनेमुळेही गृहरचना नियंत्रित होते. घरांची उंची, लांबी व रुंदी यांवर नगररचनेचे निर्बंध असतात. घरासाठी योजलेल्या जागेचे क्षेत्रफळ आणि घरबांधणीसाठी वापरावयाचे क्षेत्रफळ यांचेही प्रमाण ठरलेले असते. रस्त्याची रुंदी व घराची उंची यांतही प्रमाण निश्चिती असावी लागते. या संदर्भात भारतीय स्थापत्यशास्त्रातील भृगू व वराहमिहिर यांचे विचार लक्षणीय आहेत.


सर्वसाधारणपणे ग्रामीण भागातील शेतकरी वा गरीब लोक पुरेशा पैशाच्या अभावी लहानशी झोपडी बांधतात. त्याहून थोडा अधिक सधन असलेला वर्ग एकमजली वा दुमजली घर बांधतो. अत्यंत धनिक व्यापारी अथवा जमीनदार वर्ग अनेकमजली वाडे वा हवेल्या बांधतो. पूर्वीच्या काळी असा धनिक वर्ग स्वतःसाठी व आश्रितांसाठी स्वतंत्र वाडे बांधत असे. अलीकडे शहरी भागात अशा वाड्यांची जागा चाळींनी घेतली आहे. पूर्वी शिकारीचा छंद असलेला सरदारवर्ग रानात विश्रामगृहे बांधत असे. शहरातील गजबजाटापासून काही काळ दूर राहण्यासाठी प्रशस्त व्हिले, शातो, शॅले इ. बांधण्यात येत. यंत्रयुगात शहरांतील लोकसंख्या बेसुमार वाढल्याने घरांची टंचाई निर्माण झाली.

यानंतरच्या काळात दगडावर दगड रचून तयार केलेल्या गोलाकार मधमाश्यांच्या पोळ्याच्या आकाराच्या झोपड्या, तसेच झाडाच्या फांद्यांची वा बांबूंची मोठी टोके जमिनीत रोवून व निमुळती टोके वरच्या बाजूस बांधून त्यांवर पालापाचोळ्याने शाकारलेल्या झोपड्या वापरात आल्या. नंतरच्या काळात वेताच्या अथवा कुडाच्या भिंतीवर मातीचे थर लेपून वर तशाच प्रकारचे धाब्याचे छप्पर असलेली झोपडी निर्माण झाली. अशा झोपडीच्या भिंतींवर आतून आणि बाहेरून नाना प्रकारची चित्रे कोरलेली वा रंगवलेली असत. आजही जगाच्या मागासलेल्या भागांत अशा तऱ्हेच्या झोपड्या आढळतात. सयाम, बोर्निओ इ. प्रदेशांतील पूरग्रस्त विभागांत लाकडी खांबांवर आधारलेल्या झोपड्या आढळतात; तर एस्किमोंच्या बर्फमय प्रदेशात बर्फाचे चिरे एकमेंकावर रचून बनविलेल्या घुमटाकार ‘इग्लू’ नामक गृहांची रचना आढळते. या प्राथमिक गृहरचनेस मानवी समूहवृत्तीचे अधिष्ठान आहे. सरोवरे, विहिरी, तळी अशा पाणीपुरवठ्याच्या भोवती त्या वस्त्या असत.
  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले