Jump to content

गुलाबी मार्गिका (जयपूर मेट्रो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुलाबी मार्गिका
स्थानिक नाव गुलाबी लाईन (हिंदी)
प्रकार जलद परिवहन
प्रणाली जयपूर मेट्रो
प्रदेश जयपूर, राजस्थान, भारत
जोडमार्ग केशरी मार्गिका (नियोजित)
स्थानके ११
मालक जयपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन
चालक जयपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन
तांत्रिक माहिती
विद्युतीकरण २५ कि व्होल्ट्स ए.सी. ओव्हरहेड कॅटेनरी


जयपूर मेट्रोची गुलाबी मार्गिका ही भारतातील जयपूर शहरातील जलद वाहतूक प्रणालीचा एक भाग आहे. या मार्गिकेला जयपूरचा पूर्व-पश्चिम परिवहन मार्ग देखील म्हणतात. [] या ११.९७ किलोमीटर (७.४४ मैल) लांबीच्या मार्गिकेवर पश्चिमेकडील मानसरोवर पासून पूर्वेकडील बडी चौपर पर्यंत ११ मेट्रो स्थानके आहेत. बहुतेक स्थानक उन्नत आहेत आणि काही स्थानक भूमिगत आहेत.ही मार्गिका जयपूरच्या सर्वात जुन्या भागाला उर्वरित भागाशी जोडण्याचे काम करते.

ही मेट्रो मार्गिका ३ जून २०१५ रोजी सुरू झाली आणि ही लाईन पिंक सिटीमधून जात असल्याने तिला गुलाबी मार्गिका असे नाव देण्यात आले आहे. []

या मारिकेची केशरी मार्गिकेसोबत जोडणी आणि अदलाबदल करण्याची योजना आखली गेली आहे. ही मार्गिका मानसरोवरला भारतीय रेल्वेच्या जयपूर जंक्शन रेल्वे स्थानक, सिंधी कँप बस स्थानक, हवा महल, टाउन हॉल, जंतरमंतर, सिटी पॅलेस या वारसा स्थळांशी जोडते.

इतिहास

[संपादन]

खालील तारखा तर जनतेसाठी सेवा सुरू होण्याच्या तारखा दर्शवतात. या खासगी उदघाटनाच्या तारखा नाहीत.

इतिहास
नाव उदघाटन तारीख अंत्यस्थानके लांबी स्थानक संख्या
टप्पा-१ ए [] ३ जून २०१५ मानसरोवर चांदपोल ९.६३ किलोमीटर (५.९८ मैल)
टप्पा-१ बी २३ सप्टेंबर २०२० [] चांदपोल बडी चौपर २.३४ किलोमीटर (१.४५ मैल)
एकूण मानसरोवर बडी चौपर ११.९७ किलोमीटर (७.४४ मैल) ११

मार्ग

[संपादन]
गुलाबी मार्गिका
# स्थानकाचे नाव स्थानकांमधील अंतर (किमी) उदघाटन जोडमार्ग, अदलाबदल आणि महत्वाचे ठिकाण मांडणी गुणांक
मराठी हिंदी
1 मानसरोवर मानसरोवर ३ जून २०१५ उन्नत 26°52′46″N 75°45′00″E / 26.879531°N 75.749971°E / 26.879531; 75.749971
2 न्यू आतिश मार्केट नया आतिश मार्केट १.४५४ ३ जून २०१५ नाही उन्नत 26°52′49″N 75°45′53″E / 26.880308°N 75.764602°E / 26.880308; 75.764602
3 विवेक विहार विवेक विहार १.१०५ ३ जून २०१५ नाही उन्नत 26°53′20″N 75°46′07″E / 26.888952°N 75.768499°E / 26.888952; 75.768499
4 श्याम नगर श्याम नगर ०.८८१ ३ जून २०१५ नाही उन्नत 26°53′48″N 75°46′14″E / 26.896650°N 75.770667°E / 26.896650; 75.770667
5 राम नगर राम नगर ०.७४७ ३ जून २०१५ नाही उन्नत 26°54′07″N 75°46′29″E / 26.901944°N 75.774652°E / 26.901944; 75.774652
6 सिव्हिल लाईन्स सिविल लाइन्स १०८६ ३ जून २०१५ उन्नत 26°54′35″N 75°46′53″E / 26.909585°N 75.781277°E / 26.909585; 75.781277
7 रेल्वे स्थानक रेल्वे स्टेशन 1.583 ३ जून २०१५ जयपूर जंक्शन रेल्वे स्थानक उन्नत 26°55′07″N 75°47′24″E / 26.918559°N 75.789903°E / 26.918559; 75.789903
8 सिंधी कँप सिन्धी कैंप १.३३८ ३ जून २०१५ केशरी मार्गिका

सिंधी कँप बस स्थानक
उन्नत 26°55′21″N 75°47′59″E / 26.922563°N 75.799747°E / 26.922563; 75.799747
9 चांदपोल चाँदपोल ०.७८६ ३ जून २०१५ जल महाल भूगत 26°55′35″N 75°48′27″E / 26.926370°N 75.807456°E / 26.926370; 75.807456
10 छोटी चौपर छोटी चौपड़ १.२२१ २३ सप्टेंबर २०२० नाही भूगत 26°55′29″N 75°49′06″E / 26.9246198°N 75.8184183°E / 26.9246198; 75.8184183
11 बडी चौपर बड़ी चौपड़ ०.८५३ २३ सप्टेंबर २०२० हवा महाल भूगत 26°55′23″N 75°49′37″E / 26.9229216°N 75.8268344°E / 26.9229216; 75.8268344
12 रंगंज चौपर रामगंज चौपड़ - बांधकामाधीन नाही भूगत
13 ट्रान्सपोर्ट नगर ट्रांसपोर्ट नगर - बांधकामाधीन नाही उन्नत

टप्पा-१ बी विस्तार

[संपादन]

टप्पा-१ बी अंतर्गत, गुलाबी मार्गिका चांदपोल स्थानकापासून पूर्वेकडे २.३४९ किमी ने वाढविण्यात आली. बडी चौपरपर्यंत मार्ग वाढवण्यासाठी आणखी दोन स्थानके बांधण्यात आली. या विस्तारातील स्थानके ही आहेत: १) छोटी चौपर २) बडी चौपर .

या मार्गावर, बांधकाम सुरू असतांना, एका प्राचीन वावीच्या शोधानंतर विस्ताराचे बांधकाम लांबणीवर पडले. []

टप्पा-१ सी विस्तार

[संपादन]

टप्पा-१ सी साठी, जयपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन (जेएमआरसी) गुलाबी मार्गाचा बडी चौपर पासून ट्रान्सपोर्ट नगर पर्यंत विस्तार करण्याची योजना आखत आहे. त्यासाठी, या महामंडळाने जनतेच्या सूचना घेऊन फेज-१ सी चा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. डीपीआरनुसार, प्रकल्पाचा खर्च अंदाजे ८५६ कोटी रुपये असेल. यामध्ये जमिनीची किंमत आणि करांचा समावेश आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी २.८५ किमी (२.२६ किमी भूमिगत आणि ०.५९ किमी उन्नत) असेल. हा प्रकल्प मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते परंतु ही कालावधी उलटून गेली आहे, आणि अजूनही ही मार्गिका तयार झाली नाही. एकदा बांधल्यानंतर, मानसरोवर ते ट्रान्सपोर्ट नगर या संपूर्ण मार्गादरम्यान अंदाजे प्रवासी संख्या २०३१ पर्यंत १.३८ लाखांहून अधिक असेल असे सांगितले आहे. []. या विस्तारात ही स्थानके असतील: १) बडी चौपर २) रामगंज चौपर ३) ट्रान्सपोर्ट नगर []

हे देखील बघा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Jaipur Metro A Brief Note on the Project" (PDF). JMRC. p. 2. 4 March 2016 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2015-06-03 रोजी पाहिले.
  2. ^ "Jaipur Metro A Brief Note on the Project" (PDF). JMRC. p. 2. 4 March 2016 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2015-06-03 रोजी पाहिले.
  3. ^ "Jaipur Metro A Brief Note on the Project" (PDF). JMRC. p. 2. 4 March 2016 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2015-06-03 रोजी पाहिले.
  4. ^ "Jaipur Metro A Brief Note on the Project" (PDF). JMRC. p. 2. 4 March 2016 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2015-06-03 रोजी पाहिले.
  5. ^ "Metro set to miss 2018 deadline - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. 9 November 2016.
  6. ^ "Jaipur Metro A Brief Note on the Project" (PDF). JMRC. p. 2. 4 March 2016 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2015-06-03 रोजी पाहिले.
  7. ^ "Jaipur Metro A Brief Note on the Project" (PDF). JMRC. p. 2. 4 March 2016 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2015-06-03 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
  • UrbanRail.Net — जगातील सर्व मेट्रो सिस्टीमचे वर्णन, प्रत्येक मेट्रो सिस्टीममध्ये सर्व स्थानके दर्शविणारा एक योजनाबद्ध नकाशा आहे.
  • Metromap.in --- भारतातील मेट्रो सिस्टीमचे वर्णन, एचडी मार्ग नकाशा आणि भाडे तपशीलांसह.