Jump to content

गीतांजली थापा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गीताञ्जली थापा (dty); Geetanjali Thapa (hu); Geetanjali Thapa (is); Geetanjali Thapa (ast); Гетанджали Тапа (ru); गीताञ्जलि थापा (mai); Geetanjali Thapa (ga); گتانجالی تاپا (fa); गीताञ्जली थापा (ne); گیتانجلی تھاپا (ur); جيتانچالى ثاپا (arz); 吉檀迦莉·塔佩 (zh-hant); गीतांजलि थापा (hi); గీతాంజలి థప (te); 지탄야리 타파 (ko); গীতাঞ্জলি থাপা (as); गीतांजलि थापा (bho); গীতাঞ্জলি থাপা (bn); Geetanjali Thapa (fr); Geetanjali Thapa (pl); गीतांजली थापा (mr); Geetanjali Thapa (sl); Geetanjali Thapa (pt); ジータンジャリ・タパ (ja); Geetanjali Thapa (tr); Geetanjali Thapa (id); Geetanjali Thapa (lt); Geetanjali Thapa (zu); Geetanjali Thapa (nb); Geetanjali Thapa (pt-br); Geetanjali Thapa (de); Geetanjali Thapa (lb); Geetanjali Thapa (nn); ഗീതാഞ്ജലി ഥാപ്പ (ml); Geetanjali Thapa (nl); Geetanjali Thapa (kl); Geetanjali Thapa (es); Geetanjali Thapa (uz); ਗੀਤਾਂਜਲੀ ਥਾਪਾ (pa); Geetanjali Thapa (en); جيتانجالي ثابا (ar); ᱜᱤᱛᱟᱱᱡᱚᱞᱤ ᱛᱷᱟᱯᱟ (sat); گیتانجلی تھاپا (skr) actriz india (es); aktore indiarra (eu); ہِندوستٲنؠ فِلِمی اَداکارہ (ks); actriz india (ast); actriu índia (ca); indische Schauspielerin (de); Indian actress (en-gb); بازیگر هندی (fa); indisk skuespiller (da); actriță indiană (ro); indisk skådespelare (sv); שחקנית הודית (he); 印度女演員 (zh-hant); भारतीय अभिनेत्री (hi); భారతీయ సినిమా నటి. (te); intialainen näyttelijä (fi); ভাৰতীয় অভিনেত্ৰী (as); Indian actress (en-ca); இந்திய நடிகை (ta); attrice indiana (it); ভারতীয় অভিনেত্রী (bn); actrice indienne (fr); India näitleja (et); Indian actress (en); actriz indiana (pt); indisk skodespelar (nn); ഇന്ത്യന്‍ ചലച്ചിത്ര അഭിനേതാവ് (ml); Indiaas actrice (nl); Indian actress (en); actores a aned yn 1980 (cy); индийская актриса (ru); actriz india (gl); ممثلة هندية (ar); індійська акторка (uk); ᱵᱷᱟᱨᱚᱛᱤᱭᱚ ᱯᱟᱴᱷᱚᱠᱤᱭᱟᱹ (sat) Geetanjali (en); ギータンジャリ (ja)
गीतांजली थापा 
Indian actress
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९८०
सिक्कीम
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. २०११
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • Tashi Namgyal Academy
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

गीतांजली थापा ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये दिसते. लायर्स डाइस (२०१३) मधील तिच्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला .

कारकीर्द

[संपादन]

चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी ती एक व्यावसायिक मॉडेल होती. तिने २०१० मध्ये टीना की चाबी या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. कमल केएम दिग्दर्शित तिचा पुढचा चित्रपट, आयडी, याला लॉस एंजेलस फिल्म फेस्टिव्हल आणि माद्रिद फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार मिळाले.[] या चित्रपटाचा प्रीमियर बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला आणि इतर अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय महोत्सवांसाठी त्याची निवड झाली. त्यानंतर तिने अमित कुमार यांच्या हिंदी नॉयर थ्रिलर मान्सून शूटआउट मध्ये भूमिका केली. हा चित्रपट २०१३ च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिडनाईट स्क्रीनिंग विभागाचा भाग म्हणून प्रदर्शित झाला होता आणि अनेक आंतरराष्ट्रीय समीक्षकांकडून त्याचे कौतुक झाले. ती अनुराग कश्यपच्या दॅट डे आफ्टर एव्हरीडे या लघुपटातही दिसली, ज्याला रिलीज झाल्यानंतर काही आठवड्यांतच यूट्यूब वर ६ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले.

तिचा पुढचा चित्रपट, गीतू मोहनदास यांचा लायर्स डाइस, हा ऑक्टोबर २०१३ मध्ये मुंबई चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला आणि जानेवारी २०१४ मध्ये सनडान्स चित्रपट महोत्सव आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रॉटरडॅम येथे प्रदर्शित झाला होता.[] ६१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये गीतांजलीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला. हा चित्रपट ८७ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी भारताचा अधिकृत प्रतिनीधी होता. त्या वर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये त्याने अनेक इतर पुरस्कार जिंकले. चित्रपटात थापा ही एक आईची भूमीका साकारती जिचा नवरा (नवाजुद्दीन सिद्दिकी) हरवला आहे व ती त्याचा शोध घेत सव्तः हरवते.[]

थापा यांचा नंतरचा चित्रपट अकादमी पुरस्कार विजेता दिग्दर्शक डॅनिस तानोविक यांचा भारतीय चित्रपट, टायगर्स होता. हा इमरान हाश्मीसह प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये ती एका पाकिस्तानी महिलेची भूमिका साकारते, झैनब जी त्याची नवविवाहित पत्नी आहे.[][][][] २०१४ च्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात समकालीन जागतिक सिनेमा विभागात प्रदर्शित करण्यासाठी त्याची निवड झाली होती. चित्रपटांव्यतिरिक्त, ती अनेक प्रतिष्ठित जाहिरातींमध्येही दिसली आहे, ज्यात तिच्या अलीकडील जाहिरातींमध्ये ज्वेलरी ब्रँड तनिश्म आणि ऐश्वर्या राय बच्चनसोबत लॉरियल यांचा समावेश आहे.[]

२०१६ मध्ये, थापा यांनी लँड ऑफ द गॉड्स - देवभूमी या चित्रपटात एका तरुण प्रगतीशील शिक्षिका शांतीची भूमिका साकारली होती, जी गावात आधुनिकता आणू इच्छिते आणि शिक्षणावर भर देते.[][१०][११] तिने विक्रमादित्य मोटवाने यांच्या ट्रॅप्ड या नाट्यपटातही काम केले होते, जिथे तिने राजकुमार रावसोबत काम केले होते.

२०१८ मध्ये, तिने झैन खान दुर्राणी सोबत कुछ भीगे अल्फाज या रोमँटिक नाट्यपटा काम केले, जिथे तिने अर्चना प्रधानची भूमिका साकारली, जी एका क्रिएटिव्ह एजन्सीमध्ये काम करते जी ब्रँडेड मीम्स डिझाइन करते. टागोरांच्या काबुलीवाला या नाटकाच्या बायोस्कोपवाला या चित्रपटार तिने मिनी बसू म्हणून काम केले.

२०१९ मध्ये थापाचा अमेरिकन गुन्हेगारी चित्रपट, स्ट्रे डॉल्सआला, ज्यामध्ये ऑलिव्हिया डीजोंग आणि सिंथिया निक्सन यांचा समावेश आहे.[१२][१३][१४]

वैयक्तिक जीवन

[संपादन]

भारतातील हिमालयीन राज्य सिक्कीममध्ये जन्मलेली आणि वाढलेली ती सिक्कीममधील डॉन बॉस्को स्कूल, मालबासे आणि ताशी नामग्याल अकादमी, गंगटोक येथून शिक्षण घेतल्यानंतर पदवीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी ती कोलकाता येथे गेली. चित्रपट उद्योगात प्रवेश करण्यापूर्वी ती एक व्यावसायिक मॉडेल होती आणि तिने गुवाहाटी, आसाम येथे झालेल्या मेगा मिस नॉर्थ ईस्ट २००७ सौंदर्य स्पर्धा जिंकली होती.[१५][][१६][१७]

पुरस्कार

[संपादन]
  • २०१३ - लॉस एंजेलस चित्रपट महोत्सव - सर्वोत्कृष्ट कामगिरी - आयडी [१८]
  • २०१३ - इमॅजिन इंडिया फिल्म फेस्टिव्हल - सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आयडी [१९]
  • २०१३ - सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - लायर्स डाइस [२०]
  • २०१४ - १४ वा न्यू यॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल - सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - लायर्स डाइस [२१]
  • २०१९ - ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हल - स्पेशल ज्युरी मेन्शन - स्ट्रे डॉल्स

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "I auditioned for White Lies so I could meet Danis: Geetanjali Thapa". 1 February 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 January 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Liar's Dice: Mumbai Review". The Hollywood Reporter. 18 February 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 January 2014 रोजी पाहिले.
  3. ^ Dennis Harvey (18 January 2014). "'Liar's Dice' Review: Geeta Mohandas' Quietly Effective Debut". Variety. 18 April 2014 रोजी पाहिले.
  4. ^ "Making a Mark". India Today. 3 February 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 January 2014 रोजी पाहिले.
  5. ^ Ankur Pathak (6 September 2014). "Geetanjali Thapa: I wouldn't want to be cast just because I'm a 'North Easterner'". 9 September 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 October 2014 रोजी पाहिले.
  6. ^ "Emraan Hashmi's turn as an anti–infant formula activist". The Caravan. 15 September 2014. 29 December 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 December 2020 रोजी पाहिले.
  7. ^ "Geetanjali Thapa heads to Toronto to promote her new film with the Oscar-winning director Danis Tanovic". India Today. 29 August 2014. 1 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 December 2020 रोजी पाहिले.
  8. ^ a b Shaheen Parkar (28 September 2014). "Yet to learn how things work in Bollywood: Geetanjali Thapa". MiD DAY. 29 September 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 October 2014 रोजी पाहिले.
  9. ^ "Film Review: 'Land of the Gods' (Dev Bhoomi)". Variety. 25 September 2016. 8 November 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 December 2020 रोजी पाहिले.
  10. ^ "Land of the Gods: A universal story highlighting that some things never change". Cineuropa. 21 March 2017. 27 February 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 December 2020 रोजी पाहिले.
  11. ^ "Serbian director puts Uttarakhand on world cinema map". The Hindu. 14 September 2016.
  12. ^ Lowe, Justin (27 April 2019). "'Stray Dolls' Review". The Hollywood Reporter. 8 March 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 September 2019 रोजी पाहिले.
  13. ^ Donnelly, Matt (23 September 2019). "Samuel Goldwyn Takes North American Rights to 'Stray Dolls'". Variety. 27 September 2019 रोजी पाहिले.
  14. ^ "Award-winning short film Frayed Lines explores the complexity of identity at the backdrop of NRC". Firstpost. 29 September 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 December 2020 रोजी पाहिले.
  15. ^ "Geetanjali Thapa wins Mega Miss North East". 7 January 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  16. ^ "Geetanjali Thapa on being low-key and letting her work speak". The Telegraph. 1 February 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 January 2014 रोजी पाहिले.
  17. ^ "Interview: Geetanjali Thapa, Actor [I.D., Monsoon Shootout]". DearCinema.com. 15 July 2013. 21 April 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 April 2014 रोजी पाहिले.
  18. ^ "20th LA Film Fest Award". 25 April 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 June 2014 रोजी पाहिले.
  19. ^ "ImagineIndia 13th International Film Festival Award". 29 May 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 June 2014 रोजी पाहिले.
  20. ^ "61st National Film Awards Announced" (Press release). Press Information Bureau (PIB), India. 16 April 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 April 2014 रोजी पाहिले.
  21. ^ "14th Annual New York Indian Film Festival". 11 November 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 June 2014 रोजी पाहिले.