गार्गी गुप्ता
Social worker | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | जुलै १९, इ.स. १९६१ कोलकाता | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार | |||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
![]() |
गार्गी गुप्ता ह्या व्हॉइस ऑफ वर्ल्ड नामक गैर सरकारी संस्थेच्या संस्थापक आणि सचिव आहेत. ही एक पूर्व भारतातील दृष्टिहीन, अपंग आणि अनाथ मुलांसाठी एक बहु-युनिट ना-नफा तत्वावर चालणारी संस्था आहे. या संस्थेचे मुख्यालय कोलकाता येथे आहे.[१]
आयुष्य
[संपादन]गुप्ता यांचा जन्म पश्चिम बंगाल मध्ये झाला. त्यांनी कोलकाता येथे आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि भारतीय रेल्वेमध्ये नोकरीला लागल्या. त्यांच्या पालकांच्या मृत्यूनंतर शहरातील रस्त्यावरील मुलांकडे त्यांचे लक्ष वेधले. या मुलांनी त्यांना गरिब लोकांच्या परिस्थितीची आणि असहायतेची जाणीव करून दिली.

गुप्ता यांनी उत्तर कोलकाता येथील त्यांच्या वडिलांच्या भाड्याच्या घरात सहा मुलांसह आपले सामाजिक कार्य सुरू केले. २०१८ मध्ये अनाथ मुलांची संख्या ३०० पर्यंत गेली.[२] ही अशा प्रकारची एकमेव खाजगीरित्या चालवली जाणारी सुविधा आहे.[३] व्हॉइस ऑफ वर्ल्डने १९९८ मध्ये गुप्ता यांच्या वडिलांच्या दुसऱ्या घरात दक्षिण कोलकाता भागातील केंद्र सुरू केले. निवासी बालवाडी शाळा, ब्रेल प्रेस[३] आणि ग्रंथालय तिथेच आहे.
त्यांच्या सेवांची दखल घेत, तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ८ मार्च २०१८ रोजी गुप्ता यांना नारी शक्ती (महिला सक्षमीकरण) पुरस्काराने सन्मानित केले.
धर्मादाय संस्था
[संपादन]व्हॉइस ऑफ वर्ल्डचे बालके ही अनाथ किंवा वंचित कुटुंबातील असून, मोफत शिक्षणासोबतच त्यांना पर्वतारोहण आणि ट्रेकिंगसह विविध खेळांचा आनंद अनुभवता येतो.[४] २०१८ मध्ये गुप्ता यांनी अपंग कैद्यांसाठी कोस्टल ट्रेक सुरू केला.[१] या मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, ही स्वयंसेवी संस्था त्यांचे, विशेषतः दृष्टिहीन मुलींचे पुनर्वसन करण्याची पूर्ण दक्षता घेते.[५][६]
प्रमुख कामे
[संपादन]- १९९२ मध्ये गुप्ता यांनी 'व्हॉइस ऑफ वर्ल्ड' ही एनजीओ स्थापन केली, जी पूर्व भारतातील दृष्टिहीन आणि अपंग अनाथ मुलांसाठी काम करते. [७]
- १९९७ मध्ये ३०० निवासी आणि ३००० अनिवासी लाभार्थ्यांसाठी निवासी सुविधा सुरू केली. [७]
- २००१ मध्ये बंगाली शब्द दस्तऐवज ब्रेलमध्ये हस्तांतरित करण्यासाठी लिप्यंतरण सॉफ्टवेअर विकसित केले. [७]
- उच्च शिक्षण घेणाऱ्या दृष्टिहीन महिलांसाठी ऋषरा येथे एक घरउउभे केले.[७]
- या एनजीओमध्ये एक शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय चालवले जाते जिथे अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते [७]
पुरस्कार आणि सन्मान
[संपादन]- ८ मार्च २०१८: नारी शक्ती पुरस्कार (महिला शक्ती पुरस्कार), भारतातील महिलांसाठी सर्वोच्च नागरी पुरस्कार. [८] [९]
संदर्भ
[संपादन]- ^ a b Mitra, Dipawali (23 February 2018). "Walk by the sea, laughing all the way". 12 November 2018 रोजी पाहिले.
- ^ "নারীদিবসে বিরল সম্মান কলকাতার! আলো দেখালেন এই বাঙালি নারী". 12 March 2018. 12 March 2018 रोजी पाहिले.
- ^ a b "ইচ্ছেডানায় হাজার আলো জ্বালাচ্ছেন গার্গী". 1 April 2013. 2018-03-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 March 2018 रोजी पाहिले.
- ^ "পর্বতারোহন করছেন পশ্চিমবঙ্গের দৃষ্টিহীন শিক্ষার্থীরা". 1 February 2015. 12 March 2018 रोजी पाहिले.
- ^ "Made in heaven: Two love stories deeper than what meets the eyes - Times of India". The Times of India. 12 March 2018. 2019-04-20 रोजी पाहिले.
- ^ "দৃষ্টিহীন দুই বন্ধুর বিয়ে দেখল কলকাতা". 12 March 2018. 13 November 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 March 2018 रोजी पाहिले.
- ^ a b c d e "Ministry of Women and Child Development Nari Shakti Awardees 2017" (PDF). 12 March 2018 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2018-03-12 रोजी पाहिले.
- ^ "Infographic: Nari Shakti Puraskar - Times of India". The Times of India. 7 March 2018. 2018-03-11 रोजी पाहिले.
- ^ "Maharashtra's Sindhutai Sapkal, Urmila Apte to be honoured with Naari Shakti 2017 awards". 7 March 2018. 12 March 2018 रोजी पाहिले.