गारगाव (वाडा)
| ?गारगाव महाराष्ट्र • भारत | |
| — गाव — | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| क्षेत्रफळ | .९८६ चौ. किमी |
| जवळचे शहर | वाडा |
| जिल्हा | पालघर जिल्हा |
| लोकसंख्या • घनता |
२,४७९ (२०११) • २,५१४/किमी२ |
| भाषा | मराठी |
| सरपंच | |
| बोलीभाषा | वारली |
| कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४२१३०३ • +०२५२६ • एमएच/४८ /०४ /०५ |
गारगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन गारगाव मार्गाने गेल्यावर जिल्हा परिषदेच्या सुकापाडा शाळेनंतर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १५ किमी अंतरावर आहे.
हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
[संपादन]हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५१८ कुटुंबे राहतात. एकूण २४७९ लोकसंख्येपैकी १२४७ पुरुष तर १२३२ महिला आहेत. गावाची साक्षरता ६७.६७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७६.९८ आहे तर स्त्री साक्षरता ५८.१७ आहे. गावातील शून्य ते सहा वर्षे वयाच्या लहान मुलांची संख्या ३५४ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १४.२८ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.
नागरी सुविधा
[संपादन]गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात.येथील शाळेत नाकाडपाडा गावातील विद्यार्थी पावसाळ्यात गारगाई नदी ओलांडून येतात.[१]
जवळपासची गावे
[संपादन]वाडवळीतर्फेगाव, आखाडा, सातरोंदे, पाचघर, वारसाळे, शिलोत्तर, पिक, पास्ते, सासणे, खैरेतर्फेवाडा, उमरोठे ही जवळपासची गावे आहेत.गारगाव ग्रामपंचायतीमध्ये दाभोण,गारगाव आणि पिंजाळ ही गावे येतात.
संदर्भ
[संपादन]१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
७. https://palghar.gov.in/tourism/
- ^ महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार,३ जुलै २०२५