गारगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


  ?गारगाव

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .४१४६२ चौ. किमी
जवळचे शहर पालघर
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
९६३ (२०११)
• २,३२३/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा आदिवासी कातकरी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१५०१
• +०२५२५
• एमएच४८

गारगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

बोईसर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस बेटेगाव मार्गाने गेल्यावर शिगाव गावानंतर हे गाव लागते. बोईसरपासून हे गाव १६ किमी अंतरावर आहे.

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन[संपादन]

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १८१ कुटुंबे राहतात. एकूण ९६३ लोकसंख्येपैकी ४८१ पुरुष तर ४८२ महिला आहेत. गावाची साक्षरता ४६.६७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५९.९५ आहे तर स्त्री साक्षरता ३४.१० आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १९८ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २०.५६ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात.

नागरी सुविधा[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस बोईसर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा बोईसरवरून उपलब्ध असतात.

जवळपासची गावे[संपादन]

वावे, नेवाळे, राणीशिगाव, हनुमाननगर, सुमडी, चिंचरे, आकेगव्हाण, नानिवळी, आंबेडे उर्फ आंबेढे, बऱ्हाणपूर, सोमाटे ही जवळपासची गावे आहेत.खानिवडे गावासह गारगाव गाव खानिवडे ग्रामपंचायतीमध्ये येते.

संदर्भ[संपादन]

१.https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२.http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc

३. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

४. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/