गाझी घोरी
Appearance
मुहम्मद गाझी घोरी (जन्म १६ मार्च २००३) हा एक पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू आहे. घोरी हा उजव्या हाताने फलंदाजी करतो तसेच यष्टिरक्षक सुद्धा आहे. त्याचा जन्म कराची, सिंध, पाकिस्तान येथे झाला.[१]
मार्च २०२६ मध्ये, घोरीने मीरपूर येथे बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) सामन्यात पदार्पण केले. संघाची धावसंख्या ३ बाद ६४ असताना फलंदाजीला आलेल्या घोरीने २९ धावा केल्या आणि अब्दुल समदसोबत ५० धावांची भागीदारी केली.[२]
संदर्भयादी
[संपादन]- ↑ "मुहम्मद गाझी घोरी". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. २१ जुलै २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Bangladesh v Pakistan, 3rd ODI, Pakistan in Bangladesh 2025/26" [बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान, तिसरी एकदिवसीय, पाकिस्तान बांगलादेश मध्ये २०२५/२६]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २१ जुलै २०२६ रोजी पाहिले.