गांधीलमाशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गांधील माशी या पानावरून पुनर्निर्देशित)
युरोपीय गांधीलमाशी

गांधीलमाशी (इंग्रजी Hornet) ही एक प्रकारची माशी आहे. ही मधमाशीपेक्षा मोठी असून जर्द पिवळ्या रंगाची असते. हिचा डंख अतिशय जोरदार असतो. ती अनेक वेळा डंख मारू शकते. मधमाशी हे गांधीलमाशीचे खाद्य असते. गांधीलमाश्या पोळ्यांवर हल्ला करून मधमाश्यांना मारतात आणि त्यांना खातात. संधिपाद प्रकारातील कीटक वर्गाच्या हायमेनॉप्टेरा गणात गांधीलमाशीचा समावेश होतो.

गांधीलमाश्यांचे पोळे हे लहान असते. ते बरेचदा मातीने बनवलेले असते. आशियाई गांधीलमाशी, युरोपीय गांधीलमाशी, Asian giant hornet हे या माश्यांचे विविध प्रकार आहेत.

आशियाई गांधीलमाशी

हे सुद्धा पहा[संपादन]