गर्भ विज्ञान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Copyright-problem paste.svg***मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट करून घेतलेल्या मजकुर ओळीची/परिच्छेदाची सीमारेषा / समाप्ती रेषा अशी दाखवावी***

बहुतेक सर्व उच्च दर्जाच्या वनस्पतींत आणि प्राण्यांत लैंगिक ⇨ प्रजोत्पादनामध्ये नवीन संततीची सुरुवात पुं-व स्त्री-गंतुकांच्या (प्रजोत्पादक कोशिकांच्या म्हणजे पेशींच्या) संयोगापासून बनलेल्या रंदुकापासून होते. या रंदुकाची वाढ, विभागणी व प्रभेदन (कार्यविभागणीनुसार रूपांतर) कमीअधिक काळ मातेच्या शरीरात अगर शरीराबाहेर चालू राहून शेवटी त्याची परिणती नवीन अपत्यसंभवनात होते. रंदुकापासून अपत्यापर्यंत होत जाणारा बदल गर्भावस्थेत समाविष्ट होतो कारण अपत्यपूर्व अवस्था म्हणजेच ‘गर्भ’ होय.

शैवले व बुरशी यांसारख्या कमी दर्जाच्या (कायक) वनस्पतींपैकी (ज्यांच्या शरीराची मूळ, खोड व पाने अशी विभागणी झालेली नाही अशा वनस्पतींपैकी) काही अपवाद वगळल्यास इतर सर्व वनस्पतींत जीवनाची सुरुवात वर सांगितल्याप्रमाणे रंदुकापासून होते. रंदुकाची वाढ कायकाखेरीज इतरांत जनक वनस्पतींच्या शरीरात होते; तीच गर्भावस्था होय. त्यानंतर भावी वनस्पतीची प्राथमिक, अनेककोशिक (अनेक कोशिकांची बनलेली), अल्पविकसित व अत्यंत लहान प्रतिकृती निर्माण होते. कधीकधी गर्भविकास पूर्ण होत नाही, तर कधी गर्भधारणाच होत नाही. ह्या व ह्यासारख्या अनेक समस्यांची उकल होण्यास आणी गर्भविकासाचे कृत्रिम रीत्या नियंत्रण करता येण्यास गर्भधारणेच्या पूर्वीच्या काही घटनांची माहिती (उदा., बीजुके म्हणजे अलिंगी प्रजोत्पादक सूक्ष्म कोशिका आणि गंतुकांची उत्पत्ती, परागण म्हणजे परागसिंचन, फलन इ.) आवश्यक असते. तथापि तिचा अतर्भाव गर्भविज्ञानात पूर्वी करीत नसत; परंतु आता अनेक वनस्पतिविज्ञ तसा करतात.

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले