गरीब दास
| गरीब दास | |
आचार्य श्री सद्गुरु देव गरीब दास महाराज | |
| जन्म | इ.स. १७१७ छुडानी हरियाणा, भारत |
| निर्वाण | इ.स. १७७८ छुडानी हरियाणा, भारत |
| समाधिमंदिर | छुडानी ,हरियाणा आणि सहारनपूर उत्तरप्रदेश |
| धर्म | हिंदू |
| गुरू | कबीर |
| साहित्यरचना | गरीब दास की ग्रंथ |
| कार्य | सतग्रंथ साहिब |
| संप्रदाय | कबीर पंथ |
| उपसंप्रदाय | गरीबदास पंथ |
| वडील | श्री बलराम |
| आई | श्रीमती राणी देवी |

संत गरीब दास (१७१७-१७७८) हे भक्ती आणि काव्यासाठी ओळखले जातात. गरीब दास यांनी सद्ग्रंथ साहिब या नावाने प्रसिद्ध असलेला एक मोठा संग्रह रचला.गरीबदास साहेबांनी सद्गुरू कबीर साहेबांच्या अमृतवाणीचे वर्णन केले ज्याला रत्नसागर असेही म्हणतात. एच.ए. रोजच्या म्हणण्यानुसार, गरीबदासच्या ग्रंथसाहिब पुस्तकात कबीरांचे ७००० श्लोक घेतले आहेत आणि १७००० श्लोक स्वतः गरीबदास यांनी रचले आहेत. गरीबदासचे तत्वज्ञान असे होते की राम आणि रहिममध्ये फरक नाही. गरीबदास यांचे समाधी स्थळ आजही हरियाणा येथील छुडानी आणि उत्तर प्रदेशातील सहारनपूर या गावी सुरक्षित आहे. वयाच्या १० व्या वर्षी कबीर स्वतः आले आणि संत गरीब दास जी यांना भेटले आणि त्यांना आपले ज्ञान सांगितले.[१]
कुटुंब आणि प्रारंभिक जीवन
[संपादन]संत गरीबदास यांचा जन्म १७१७ साली छुडानी गावात (जिल्हा झज्जर, हरियाणा) झाला. ते जाट समाजातील धनखड कुटुंबातील होते.[२] त्यांच्या वडिलांचे नाव श्री बलराम आणि आईचे नाव श्रीमती राणी देवी होते. छुडानी हे गरीबदास जी महाराजांचे मातुलगाव होते.त्यांचे वडील श्री बलराम हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील करोंथा गावातील धनखड गोत्राचे होते.श्री बलराम यांचा विवाह छुडानी गावातील शिवलाल सिंह यांच्या कन्या राणी देवी यांच्याशी झाला. श्री बलराम यांचा विवाह छुडानी गावातील शिवलाल सिंह यांच्या कन्या राणी देवी यांच्याशी झाला. शिवलाल यांना पुत्र नव्हता म्हणून श्री बलराम जावई म्हणून कन्या राणी देवींच्या माहेरी राहिले. १२ वर्षांच्या विवाहानंतर संत गरीब दास छुडानी गावात जन्मले.शिवलालांकडे २५०० बिघा (मोठा बिघा, जो आजच्या बिघ्यापेक्षा २.७५ पट मोठा आहे आणि जो सुमारे २४०० एकर जमिनीकाठी येतो) जमीन होती. श्री बलराम हे त्या सर्व जमिनीचे वारस होते आणि त्यानंतर त्यांचा एकुलता मुलगा संत गरीब दास यांना ती सर्व जमीन मिळाली.गरीब दास लहानपणी इतर गोकुळवाल्यांसोबत गायींना चरायला घेऊन जात असत.
बोध दिवस
[संपादन]गरीबदास यांच्या वाण्यांचा संग्रह सतग्रंथ साहिबमध्ये केला गेला आहे. सतग्रंथ साहिबनुसार, फाल्गुन शुक्ल द्वादशी संवत १७८४ म्हणजेच इ.स. १७२७ रोजी गरीबदास यांना परमात्म्याचे दर्शन झाले आणि त्यांना वरच्या सर्व लोकांचे दर्शन घडवून पुन्हा शरीरात परत पाठवले. हा दिवस गरीबदास यांचा बोध दिवस म्हणून साजरा केला जातो. संत रामपाल सतग्रंथ साहिब आणि अन्य धार्मिक ग्रंथांचा उल्लेख करत कबीर साहेबांना परमात्मा मानतात. मुख्यत्वे हा उत्सव संत रामपाल यांच्या सान्निध्यात त्यांच्या सर्व सतलोक आश्रमांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
आध्यात्मिक प्रवास
[संपादन]संत गरीब दास यांच्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात कबीरांशी १० व्या वर्षी भेट घेतल्यावर झाली,असे मानले जाते.संत गरीबदास आपल्या शेतात गायींना चारत होते, तेव्हा कबीर साहिब जी सतलोकहून सहशरीर महात्मा रूपात आले आणि गरीब दासांकडे गेले. गरीब दास आणि इतर गोकुळ कबीरांना काही खाणार-पिणार का असे विचारले असता, कबीर साहिब म्हणाले, "मी फक्त कुमारी गायचे दूध पितो." त्यावर गरीब दास एक छोटी वासरू घेऊन आले आणि त्यावर कबीरांनी आशीर्वादाचा हात ठेवला, तर कुमारी गाय दूध देऊ लागली. आणि हे दूध कबीरांनी पिऊन गरीब दासाने प्रसाद म्हणून पिले. त्यानंतर कबीरांनी गरीब दास महाराजांना प्रथम मंत्र दिला आणि सतलोक ची सफर घडवली. गरीब दासचे शरीर मरण पावले असे समजून गावकऱ्यांनी त्यांची चिता जाळण्याची तयारी केली, पण अचानक चिताची लाकडे हलली आणि गरीब दास शरीरात परत आले. त्यांनी पुन्हा कबीर परमात्म्याचे ज्ञान आपल्या मुखातून वाण्याच्या माध्यमातून उच्चारून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला.
गरीब, अलल पंख अनुराग है, सुन्न मण्डल रहै थीर।
दास गरीब उधारिया, सतगुरू मिले कबीर।। गरीब, सुन्न बेसुन्न से अगम है, पिण्ड ब्रह्मण्ड से न्यार। शब्द समाना शब्द में, अवगत वार न पार।। गरीब, बंक नाल के अंतरे, त्रिवैणी के तीर।
जहां हम सतगुरू ले गया, बन्दी छोड़ कबीर।।
त्यांच्या कथे आणि वाण्यांतून समजते कि 'भगवान कबीर' यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर, ते कबीरांसोबत सतलोकाला गेले.[३] मार्गात कबीर यांनी त्यांना स्वर्गही दाखवला. जेव्हा ते सतलोकात पोहोचले, तेव्हा गरीब दास यांनी कबीर यांना सिंहासनावर बसलेले पाहिले. गरीब दास चकित झाले कारण कबीर त्यांच्याशेजारीही उभे होते. काही वेळानंतर, ते दोन रूप एकमेकात विलीन होऊन फक्त एक कबीर सिंहासनावर बसलेले दिसले. त्यानंतर कबीर यांनी त्यांना परत पृथ्वीवर पाठवले.
पृथ्वीवर परत आल्यानंतर, गरीब दास यांनी गावकऱ्यांसमोर ही कथा सांगायला करायला सुरुवात केली.गरीब दास यांनी 'ईश्वर'कडून मिळवलेले ज्ञान त्यांच्या बोरांच्या बागेत एका खेजरीच्या (झांड) झाडाखाली बसून सात महिन्यांत संकलित केले आणि अशा प्रकारे 'गरीब दास की ग्रंथ' (अमरबोध, अमरग्रंथ) तयार झाला. त्यांच्या अनुयायांचे म्हणणे आहे की गरीब दास १७७८ मध्ये वयाच्या ६१ व्या वर्षी 'सतलोकाला' प्रस्थान झाले.[४] त्यांची आठवण म्हणून छुडानी गावात छत्री साहिब हे स्मारक उभारण्यात आले.[५] त्यांच्या नावाने सहारनपूर,उत्तर प्रदेश येथेही स्मारक आहे. असेही सांगितले जाते की ते त्याच शरीरात पुन्हा प्रकट झाले होते आणि सहारनपूर येथे ३५ वर्षे राहिले.
कबीरपंथ
[संपादन]संत गरीब दास यांच्या अनुयायांपासून सुरू झालेला गरीबदास पंथ देखील कबीरपंथाचाच एक भाग आहे. [६] पवित्र कबीर सागराच्या "कबीर बाणी" (बोध सागर) आणि "कबीर चरित्र बोध" या प्रकरणांमध्ये गरीबदास पंथ कबीरपंथाचा बारावा पंथ आहे असा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये असे लिहिले आहे की बारावा पंथ "अरुणोदय" (खरी सुरुवात) असेल. पवित्र कबीर सागरात असेही नमूद आहे की तेरावा पंथ फक्त बाराव्या पंथातूनच उदयास येईल, आणि तेव्हा केवळ कबीर साहिब स्वतः बाराव्या पंथात येतील.
कार्य
[संपादन]गरीब दास यांनी उच्चारलेल्या वाण्यांना त्यांचे अनुयायी पवित्र ग्रंथ म्हणून मानतात, ज्याला सतग्रंथ साहिब किंवा अमरग्रंथ साहिब असेही म्हणतात. हा ग्रंथ फक्त संत गरीब दास महाराज यांच्या वाण्यांचा संग्रह आहे.[७] यात सुमारे २४००० वाण्या समाविष्ट आहे.सर्व सतलोक आश्रमांमध्ये या वाण्यांचे पठण केले जाते.
तत्वज्ञान
[संपादन]जेव्हा गरीब दास पृथ्वीवर परत आले, तेव्हा त्यांनी अनेक वाण्या उच्चारल्या जे कबीर हे सतलोकातील सर्वोच्च देव असल्याचे घोषित करतात.कथितपणे, कबीरांसहित गरीब दास यांनीही हिंदू आणि मुस्लीम धर्मगुरूंवर समाजात चुकीची उपासना आणि अज्ञानयुक्त ज्ञान पसरवल्याबद्दल टीका केली आहे, जरी कबीर यांच्या खऱ्या शिकवणीवर विद्वत्तापूर्ण चर्चा होत असली तरी.[८]
यासंदर्भात पहा
[संपादन]सन्दर्भ
[संपादन]- ↑ Reference from this book:https://archive.org/details/glossaryoftribes03rose/page/n5/mode/2up
- ↑ "Biography of Sant Garibdas Ji Maharaj with Salvation Story | Jagat Guru Rampal Ji". www.jagatgururampalji.org. 2021-01-03 रोजी पाहिले.
- ↑ "A Brief Introduction of Saint Garibdas Ji". www.speakingtree.in. 2021-01-03 रोजी पाहिले.
- ↑ "गरीब दास - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर". amp.bharatdiscovery.org. 2021-01-03 रोजी पाहिले.
- ↑ "गरीबदास जी की Profile | सूफ़ीनामा". Sufinama. 2021-06-21 रोजी पाहिले.
- ↑ Keay, F. e (1920). A History Of Hindi Literature. Oxford University Press, New York.
- ↑ Hussain, Sharafat (14 May 2021). "गरीबदास का जीवन परिचय - THEDKZ.COM-RIGHT INFORMATION" (इंग्रजी भाषेत). 2023-12-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-06-21 रोजी पाहिले.
- ↑ Sen Kshitimohan (1930). Medieval Mysticism Of India (1930).