गयानाचा गुन्हेगार (लोककथा)
गयाना बेटावर घडलेली ही एक कहाणी.
कथेचा आशय
[संपादन]गयानाच्या बेटावर गुन्हेगारांसाठी तुरुंग स्थापन करण्यात आले होते. काही वर्षांपूर्वी, एक लष्करी वार्डर एका कामगार-गटाला गयानाला घेऊन जात होता, तेव्हा भरतीच्या वेळी तो अपघाताने पाण्यात पडला.
ओहोटीच्या वेळी, हे बंदर जवळजवळ पूर्णपणे वाळूने झाकलेले असते, त्यामुळे तेथे उतरणे अशक्य होते. दुसरीकडे, भरतीच्या वेळी, अत्यंत वेगवान प्रवाहामुळे ते पाण्याखाली जाते आणि त्यामुळे हल्ला करणारे शार्क किनारपट्टीवर मोठ्या संख्येने येतात. पाण्यात पडलेला वॉर्डर खूप गंभीर परिस्थितीत होता, कारण त्याला पोहता येत नव्हते. प्रत्येक क्षणी शार्क माश्याच्या भक्ष्यस्थानी पडण्याचा धोका वाढत चालला होता. तो मदतीसाठी हाका मारू लागला.
अचानक एका गुन्हेगाराने स्वतःला पाण्यात लोटले. तो वॉर्डरला पकडण्यात यशस्वी झाला आणि मोठ्या प्रयत्नानंतर त्याला वाचवू शकला.
हा माणूस एक कुख्यात गुन्हेगार होता. त्याला लोकं त्याच्या नावाने ओळखण्याऐवजी आता त्याच्या पाठीवर लिहिलेल्या अंकानेच ओळखत असत. अनेक वर्षे तुरुंगाची हवा खालेल्ला हा निर्ढावलेला गुंड, लोक त्याला घाबरून असत. त्याच्या वाट्याला तिरस्कारच येत असे. पण हाच अट्टल गुन्हेगार बुडणाऱ्या वॉर्डरचा आक्रोश ऐकून कळवळला होता आणि स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्याने स्वतःला पाण्यात झोकून दिले होते. ज्या वॉर्डरने आजवर त्याला कधीच दयामाया दाखवली नव्हती त्याच्या रक्षणासाठी तो धावून गेला होता.
तात्पर्य
[संपादन]अगदी अट्टल गुन्हेगार व्यक्तीमध्ये सुद्धा मानवतेची भावना असू शकते, हेच या कथेतून लक्षात येते. [१]
संदर्भ
[संपादन]- ↑ The Mother (2004). Words of Long Ago. COLLECTED WORKS OF THE MOTHER. 02 (2nd ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram. ISBN 81-7058-670-4.