गधेगळ
Appearance
गधेगळ हा एक प्रकारचा शिलालेख असतो. हा शिलालेख ३ भागात विभागलेला असतो. वरच्या टप्प्यात चंद्र, सूर्य आणि कलश यांच्या प्रतिमा यावर कोरलेल्या असतात. महाराष्ट्रातील पहिला ज्ञात गधेगळ इ.स. ९३४ ते १०१२ या काळात होऊन गेलेले शिलाहार राजा केशिदेव पहिले यांनी अलिबाग मधल्या आक्षी इथे उभारल्याची नोंद आहे. डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी याचे संपूर्ण वाचन केले. महाराष्ट्रात सुमारे ५० टक्के गधेगळ हे शिलाहार राजघराण्याशी संबंधित आहेत. तर ३० टक्के गधेगळ यादव घराणं, कदंब घराणं, विजयनगरचे संगम घराणं, चालुक्य आणि बहामनी साम्राज्याशी निगडीत आहेत.[ संदर्भ हवा ]