गणपती मुनी
गणपती मुनी ऊर्फ नायना ऊर्फ काव्यकंठ वाशिष्ट गणपती मुनी - (जन्म: १७ नोव्हेंबर १८७८ - मृत्यू: २५ जुलै १९३६, खरगपूर) [१] गणपती मुनी हे संस्कृतचे प्रकांड पंडित होते. तसेच ते कवी, तत्त्वज्ञानी होते. ते श्रीविद्येचे उपासक होते, ज्योतिर्विद होते.[२] त्यांना तेलगू, संस्कृत, कानडी आणि तमिळ या भाषा अवगत होत्या.[१]
जीवन व कार्य
[संपादन]गणपती मुनी हे रमण महर्षींचे प्रमुख शिष्य होते. १९०७ साली गणपती मुनी रमण महर्षी यांच्या भेटीस गेले. तेव्हा रमण महर्षी हे ब्राह्मण स्वामी या नावाने ओळखले जात असत. पण गुरुपदेशानंतर गणपती मुनी यांच्या सांगण्यावरून लोक त्यांना भगवान रमण महर्षी म्हणून संबोधू लागले.[३]
मुनी यांनी स्वतःचे ज्ञान शिष्य टी.व्ही. कपाली शास्त्री यांच्याकडे दिले.
प्रकाशित लेखन
[संपादन]गणपती मुनी यांनी संस्कृतमध्ये केलेल्या लेखनाचे संकलन 'कलेक्टेड वर्क्स' या नावाने झाले आहे. त्याचे ११ खंड प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी श्रीअरविंद लिखित सावित्री महाकाव्याचा संस्कृतमध्ये अनुवाद केला होता. तो अप्रकाशित आहे.
चरित्र-ग्रंथ
[संपादन]टी.व्ही. कपाली शास्त्री यांनी 'वाशिष्ट-वैभव' या नावाने गणपती मुनी यांचे चरित्र लिहिले आहे.
पूरक माहिती
[संपादन]काव्यकंठ वाशिष्ट गणपती मुनी यांच्यावरील व्याख्यान - व्याख्याते - डॉ.संपदानंद मिश्रा
संदर्भ
[संपादन]- 1 2 "Ganapati Muni". www.wikidata.org (इंग्रजी भाषेत). 2025-09-03 रोजी पाहिले.
- ↑ प्रभाकर नुलकर. श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी. कर्मयोगी प्रकाशन.
- ↑ How Roan-horse Got his Name. Linguistic Society of America. pp. 306–307.