Jump to content

गणपतराव देवाजी तपासे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गणपतराव देवाजी/देवजी तपासे हे एक थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक आणि कुशल प्रशासक होते.

बालपण

[संपादन]

३० ऑक्टोबर १९०८ रोजी सातारा येथे त्यांचा जन्म झाला.त्यांच्या आईचे नाव कोयनाबाई होते. वडिलांचे नाव देवजी होते.सातारा येथे अमेरिकन मिशनरी शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश शाळेत झाले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी बी.ए.ची पदवी प्राप्त केली. सन १९३७ मध्ये त्यांनी पुण्यातील लॉ कॉलेज मधून एल.एल.बी.केले.

तरुणपण

[संपादन]

माण तालुक्यातील मलवडी गावच्या रुक्मिणी ह्यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सातारा येथे ते वकीली करीत. सन १९३८ साली ते तेथील नगरपालिकेत निवडून आले. सन १९३८ ते सन १९४६ पर्यंत ते सातारा नगरपालिकेत सदस्य होते.१ डिसेंबर १९४० रोजी ब्रिटिशांविरुद्ध सत्याग्रह केल्याने त्यांना अटक झाली. नोव्हेंबर १९४१ ला त्यांची सुटका झाली. ते श्रीपाद डांगे,दिनकरभाई देसाई,स.का.पाटील,मेहेर अली ह्यांच्या संपर्कात आले.सन १९४२ च्या चले जाव चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना पुन्हा १ ऑगस्ट १९४२ रोजी अटक झाली.पंधरा महिन्यानंतर त्यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. येरवडा येथे त्यांना साने गुरुजी ह्यांचा सहवास मिळाला.

सामाजिक कार्य

[संपादन]

सन १९४६ मध्ये ते माण मतदारसंघातून निवडून आले.३ एप्रिल १९४६ रोजी ते मुख्यमंत्री बाळासाहेब खेर ह्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. ते पहिले दलित मंत्री होते. त्यांनी ११ वर्षे मंत्रीपद सांभाळले. सन १९४७ मध्ये हरिजनांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून केलेल्या साने गुरुजींच्या उपोषणामुळे हरिजन मंदिर प्रवेश विधेयक मंजूर झाले.सन १९५०-५१ मधे ते मागासवर्गीय कमिशनचे अध्यक्ष होते. त्यांचे ३ ऑक्टोबर १९९१ रोजी मुंबईत निधन झाले. []

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, गुरुवार, दिनांक १३ फेब्रुवारी २०२५