Jump to content

गज सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Gaj Singh (sl); ガジ・シング (ja); Gaj Singh (hu); Gaj Singh (fr); Gaj Singh (es); Gaj Singh (ast); Gaj Singh, Crown Prince of Marwar (en); Gaj Singh (nl); Гадж Сингх II (ru); Gaj Singh (yo); Gaj Singh (de); Gaj Singh (ga); Gaj Singh (sq); गज सिंह (hi); Gaj Singh (ca); गज सिंग (mr) homme politique indien (fr); भारतीय राजकारणी (mr); ഇന്ത്യയിലെ രാഷ്ട്രീയ പ്രവർത്തകന്‍ (ml); Indiaas politicus (nl); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); भारतीय राजनीतिज्ञ (hi); Maharadscha (de); ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or); polaiteoir agus ambasadóir Indiach (ga); سیاست‌مدار هندی (fa); Indian politician and ambassador (en); India siyaasa nira ŋun nyɛ doo (dag) Shree Gaj Singh ji (en)
गज सिंग 
भारतीय राजकारणी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजानेवारी १३, इ.स. १९४८
जोधपूर
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • Cothill House
  • एटोन कॉलेज
  • Christ Church
व्यवसाय
पद
वडील
  • Hanwant Singh I of Marwar
आई
  • Queen Krishna Kumari of Marwar
भावंडे
अपत्य
  • Princess Shivranjani Rajye of Marwar (1)
  • Prince Shivraj Singh of Marwar (2)
वैवाहिक जोडीदार
  • Hemlata Rajye, Crown Princess of Marwar (इ.स. १९७३ – )
अधिकार नियंत्रण
योगदान) द्वारे अखेरचा संपादित केल्या गेला होता.(अद्यतन करा) लाळगे (आडनाव) लाळगे (आडनाव) लाळगे हे महाराष्ट्रातील, विशेषतः अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज परिसरात आढळणारे मराठा समाजातील एक आडनाव आहे. हे आडनाव प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आढळते. उगम व वंशपरंपरा स्थानिक व कौटुंबिक वंशपरंपरागत समजानुसार, निघोज (पारनेर) परिसरातील लाळगे आडनावाचा संबंध पवार कुळाशी जोडला जातो. काही कुटुंबांमध्ये लाळगे हे पवार घराण्याची एक शाखा किंवा उपनाव मानले जाते. मराठा समाजातील परंपरेनुसार, मूळ कुळ समान राहून कालांतराने वेगवेगळी उपनावे प्रचलित होण्याची पद्धत आढळते. देवक निघोज परिसरातील लाळगे कुटुंबांचे देवक ‘धार’ असल्याची परंपरागत माहिती आढळते. ‘धार’ हे देवक पवार/पंवार कुळातही आढळते. मराठा कुळपरंपरेत देवक हे वंशाचे प्रतीक मानले जाते आणि समान देवक असणे हे समान वंशाशी संबंधित असल्याचे सूचित करते. भौगोलिक वितरण लाळगे आडनाव असलेली कुटुंबे प्रामुख्याने खालील भागांमध्ये आढळतात: • अहमदनगर जिल्हा (निघोज, पारनेर परिसर) • पुणे जिल्हा • सातारा जिल्हा • सोलापूर जिल्हा हे स्थलांतर प्रामुख्याने शेती, वतन, सैनिकी सेवा व उपजीविकेच्या कारणांमुळे झालेले दिसते. सामाजिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाळगे आडनाव असलेल्या कुटुंबांचा ऐतिहासिक सहभाग शेती, गावपातळीवरील जबाबदाऱ्या, तसेच स्थानिक प्रशासनाशी संबंधित कार्यात असल्याचे स्थानिक परंपरा व नोंदींमधून दिसून येते. पारनेर व आसपासचा परिसर मराठा इतिहासात महत्त्वाचा मानला जातो आणि येथे विविध मराठा कुळांच्या शाखा स्थायिक झालेल्या आढळतात. नोंद लाळगे आडनावाचा पवार कुळाशी असलेला संबंध व देवक ‘धार’ याबाबतची माहिती ही मुख्यतः स्थानिक व कौटुंबिक वंशपरंपरेवर आधारित आहे. यासंबंधी स्वतंत्र व सविस्तर लिखित ऐतिहासिक स्रोत मर्यादित असल्यामुळे ही माहिती वंशपरंपरागत समज म्हणून पाहिली जाते. ⸻ संदर्भ (References) 1. महाराष्ट्र राज्य गॅझेटियर, अहमदनगर जिल्हा 2. मराठा कुळवृत्त व वंशावळ परंपरा (सामान्य संदर्भ साहित्य) 3. निघोज गावाची भौगोलिक व सामाजिक माहिती – महाराष्ट्र राज्य नोंदी 4. पवार/पंवार कुळावरील ऐतिहासिक नोंदी (सामान्य मराठा इतिहास ग्रंथ

गजसिंग दुसरा (१३ जानेवारी, १९४८:जोधपूर, राजस्थान, भारत - ) हे १९५२ पासून जोधपूरचे नाममात्र महाराजा आहेत. हे एक भारतीय राजकारणी आणि राजदूत देखील आहेत.

सुरुवातीची वर्षे आणि राज्याभिषेक

[संपादन]

गज सिंह यांचा जन्म १३ जानेवारी १९४८ रोजी हनवंत सिंग आणि त्यांची पहिली पत्नी कृष्णा कुमारी यांच्या घरी उम्मेद भवन पॅलेसच्या जनानामध्ये झाला. [] [] १९५२ मध्ये हनवंत सिंह यांचा विमान अपघातातील मृत्यूनंतर वयाच्या चौथ्या वर्षी गज सिंग यांना राजेपद मिळाले. [] [] [] त्यांच्या राज्यारोहणानिमित्त पाच रंगांचा - गुलाबी, पांढरा, लाल, भगवा आणि हिरवा, जे जोधपूर राज्याच्या ध्वजाचे रंग देखील आहेत - एक साफा तयार करण्यात आला होता आणि त्याला गज शाही म्हणतात. []

गज सिंग लहान असताना त्यांची आई, कृष्णा कुमारी राज्य सांभाळले. [] त्यांना दर वर्षी भारत सरकारकडून १० लाख रुपयांचा नजराणा मिळत असे. [] १९७१ मध्ये २६ व्या घटनादुरुस्तीने तो रद्द झाला.

शिक्षण

[संपादन]

गज सिंग यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच झाले. [] १९५६ मध्ये वयाच्या आठव्या वर्षी त्यांना प्रथम ऑक्सफर्डशायरमधील कोथिल हाऊस या प्रेप स्कूलमध्ये पाठवण्यात आले आणि नंतर १९६१ मध्ये ईटनमधील ईटन कॉलेजमध्ये [] आणि ऑक्सफर्डमधील क्राइस्ट चर्चमध्ये पाठवण्यात आले. तेथे त्यांनी १९७० मध्ये राजकारण, तत्वज्ञान आणि अर्थशास्त्र या विषयांत पदवी मिळवली. [] []

राज्यकाल

[संपादन]

१९७० मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते जोधपूरचे महाराज म्हणून जोधपूरला परतले. याच वेळी त्यांनी आपल्या विशाल संपत्ती तसेच त्यासोबत असलेल्या विविध सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदाऱ्यांचे नियंत्रण त्यांनी स्वीकारले.

२८ डिसेंबर १९७१ रोजी, तत्कालीन राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांच्या संमतीनंतर, भारतीय संविधानातील २६ वी दुरुस्ती संसदेने लागू केली. [] [] या दुरुस्तीने माजी संस्थानांच्या राज्यकर्त्यांना देण्यात आलेल्या पदव्या, विशेषाधिकार आणि विशेष अधिकारांची अधिकृत मान्यता रद्द केली. [] त्या वेळ गज सिंग यांचे ही हे अधिकार गेले.


१९ फेब्रुवारी १९७३ रोजी देहरादून येथे एका साध्या समारंभात गज सिंग यांनी पूंछचे राजे शिव रतन देव सिंह आणि त्यांची पत्नी नलिनी राज्य लक्ष्मी देवी (नेपाळचे राजे त्रिभुवन बीर बिक्रम शाह देव यांची मुलगी) यांची कन्या हेमलता राजे यांच्याशी लग्न केले. [] [] त्यांना शिवरंजनी राजे (जन्म २२ ऑगस्ट १९७४) आणि शिवराज सिंग (जन्म ३० सप्टेंबर १९७५) अशी दोन मुले आहेत. [] []


गज सिंग यांना चंद्रेश कुमारी आणि शैलेश कुमारी अशा दोन बहिणी आहेत. त्याच्या सावत्र भाऊ हुकूम सिंग यांची हत्या झाली. [] []

कारकीर्द

[संपादन]

गज सिंग जून १९७८ ते जुलै १९८० दरम्यान भारताचे हाय कमिशनर होते. त्यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताक, [] बार्बाडोस, डोमिनिका, सेंट लुसिया, ग्रेनाडा आणि सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स येथे भारताची वकिली केली. [] [] [१०] [११] त्याच वेळी त्यांनी अँटिग्वा आणि बारबुडा, सेंट किट्स आणि नेव्हिस, मोंटसेराट, तुर्क आणि कैकोस बेटे आणि केमन बेटे येथे आयुक्त म्हणूनही काम पाहिले. [] [] [१०]

हे भारतीय संसदेच्या राज्यसभेचे एका मुदतीसाठी सदस्य होते.   २००५ मध्ये जयपूर येथे झालेल्या पोलो सामन्यादरम्यान जेव्हा त्यांचा मुलगा शिवराज सिंह याला डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो कोमात गेला तेव्हा गज सिंग यांच्या लक्षात आले की भारतातील काही खाजगी रुग्णालयेच अशा दुखापतीवर उपचार करू शकतात. यावर उपाय म्हणून, त्यांनी इंडियन हेड इंजुरी फाउंडेशनची स्थापना केली. ही संस्था भारतातील मेंदूच्या दुखापती झालेल्यां, विशेषतः पैसे नसलेल्या लोकांवर त्वरित उपचार देते. [१२] [१३]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c d e f g h Singh, Dhananajaya (1996). The house of Marwar : the story of Jodhpur. Internet Archive. New Delhi : Roli Books. pp. 11, 12, 18, 189, 203–5, 212, 215. ISBN 978-81-7436-026-7. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव ":0" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  2. ^ a b c d e f g Sharma, C. L. (1993). Ruling Elites of Rajasthan: A Changing Profile (इंग्रजी भाषेत). M.D. Publications Pvt. Ltd. pp. 103–106. ISBN 978-81-85880-13-6. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव ":1" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  3. ^ a b Magazine, Smithsonian; Malhotra, Sonia Faleiro,Dhruv. "The Fall and Rise of a Modern Maharaja". Smithsonian Magazine (इंग्रजी भाषेत). 2024-08-24 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव ":2" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  4. ^ a b Parliament of India (1971). The Constitution of India (26th Amendment) Act 1971.
  5. ^ "The Epitome of Elegance and Grace". Open The Magazine (इंग्रजी भाषेत). 2023-01-20. 2023-01-21 रोजी पाहिले.
  6. ^ "The Epitome of Elegance and Grace". Open The Magazine (इंग्रजी भाषेत). 2023-01-20. 2023-01-21 रोजी पाहिले.
  7. ^ "The Epitome of Elegance and Grace". Open The Magazine (इंग्रजी भाषेत). 2023-01-20. 2023-01-21 रोजी पाहिले.
  8. ^ a b Personalities Caribbean (इंग्रजी भाषेत). Personalities Limited. 1983. p. 970.
  9. ^ a b Asian Recorder (इंग्रजी भाषेत). 1978. p. 14319.
  10. ^ a b "Governing Council - International Institute of Water". iiwater.org (इंग्रजी भाषेत). 2023-09-21. 2024-08-25 रोजी पाहिले.
  11. ^ "The Epitome of Elegance and Grace". Open The Magazine (इंग्रजी भाषेत). 2023-01-20. 2023-01-21 रोजी पाहिले.
  12. ^ "The Epitome of Elegance and Grace". Open The Magazine (इंग्रजी भाषेत). 2023-01-20. 2023-01-21 रोजी पाहिले.
  13. ^ Jhala, Angma Dey (2015-10-06). Royal Patronage, Power and Aesthetics in Princely India (इंग्रजी भाषेत). Routledge. p. 125. ISBN 978-1-317-31657-2.