गँगस्टर: अ लव्ह स्टोरी
2006 film by Anurag Basu | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार | |||||
|---|---|---|---|---|---|
| गट-प्रकार |
| ||||
| मूळ देश | |||||
| संगीतकार | |||||
| पटकथा | |||||
| निर्माता | |||||
| Performer | |||||
| वितरण |
| ||||
| दिग्दर्शक | |||||
| प्रमुख कलाकार | |||||
| प्रकाशन तारीख |
| ||||
| |||||
गँगस्टर: अ लव्ह स्टोरी हा २००६ चा अनुराग बसू दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. यात कंगना राणावत, इमरान हाशमी आणि शायनी आहुजा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती विशेष फिल्म्सचे महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांनी केली होती. संगीत प्रीतम यांनी दिले होते.
५२ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, गँगस्टरला १० नामांकने मिळाली, ज्यात सर्वोत्कृष्ट खलनायक (हाशमी) आणि सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायिका ("या अली" साठी झुबीन गर्ग) यांचा समावेश होता, आणि सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण (रणावत) हा पुरस्कार जिंकली.
कलाकार
[संपादन]- कंगना राणावत - सिमरन
- इमरान हाशमी - आकाश कपाडिया
- शायनी आहुजा - दया शंकर
- गुलशन ग्रोव्हर - खान
- झुबीन गर्ग ("या अली" गाण्यात विशेष भूमिका)
- प्रीतम ("भीगी भीगी" गाण्यात खास भूमिका)
सुरुवातीला पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू शोएब अख्तरला दयाची भूमिका देण्यात आली होती, परंतु त्याने ती नाकारली सांगुनकी, "क्रिकेट हा केवळ माझा व्यवसाय नाही तर माझा ध्यास देखील आहे".[१][२]
बंगाली अभिनेत्री कोयल मलिकलाही सिमरनची भूमिका देण्यात आली होती, परंतु पटकथेतील अंतरंग आणि बोल्ड दृश्यांबद्दल तिला असलेल्या अस्वस्थतेमुळे तिने ती भूमिका नाकारली.[३]
गीत
[संपादन]या गाण्यांचे संगीत प्रीतम चक्रवर्ती यांनी दिले आहे. संपूर्ण अल्बममध्ये पाच मूळ गाणे आणि चार रीमिक्स आहे.[४] सारेगामाने चित्रपटाचे संगीत हक्क घेतले आहे. "भीगी भीगी" हे गाणे मोहीनर घोरागुलीच्या "पृथिबी ता नाकी" या बंगाली गाण्याचे रुपांतर आहे, ज्याला नंतर कोलकाता-आधारित बँड क्रॉसविंडझने सादर केले होते.[५] गायक झुबीन गर्गने प्रथम "तू ही मेरी शब है" गायले होते पण नंतर प्रकाशन झालेल्या आवृत्तीत ते के.के. ने डब केले आहे.[६] "या अली" हे कुवेती बँड गिटाराच्या "या घाली" या गाण्यातून आले आहे.[७]
सर्व गीतांचे संगीतकार आहे प्रीतम.
| क्र. | शीर्षक | गीतकार | गायक | अवधी |
|---|---|---|---|---|
| १. | "तू हीं मेरी शब हैं" | सईद कादरी | के.के. | 6:26 |
| २. | "भीगी भीगी" | मयुर पुरी | जेम्स | 5:43 |
| ३. | "लम्हा लम्हा" | निलेश मिश्रा | अभिजीत भट्टाचार्य | 5:23 |
| ४. | "या आली" | सईद कादरी | झुबिन गर्ग | 4:51 |
| ५. | "तू हीं मेरी शब हैं" (युरो मिक्स) | सईद कादरी | के.के. | 5:12 |
| ६. | "मुझे मत रोको" | सईद कादरी | कविता सेठ | 4:09 |
| ७. | "लम्हा लम्हा" (चित्रपटात नाही) | निलेश मिश्रा | अभिजीत भट्टाचार्य, सुनिधी चौहान | |
| ८. | "तू हीं मेरी शब हैं" (रीमिक्स) | सईद कादरी | के.के. | 5:01 |
एकूण अवधी: |
45:46 | |||
संदर्भ
[संपादन]- ↑ "Bollywood offer for Shoaib Akhtar". bbc.co.uk. 26 April 2006 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 May 2005 रोजी पाहिले.
- ↑ "Shoaib turns down Indian film acting offer". paktribune. 17 January 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 May 2005 रोजी पाहिले.
- ↑ "Koel Mallick Rejected offer from Bollywood - Crazy unsettling facts about your favourite Bengali celebrities". The Times of India. 28 May 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-05-28 रोजी पाहिले.
- ↑ "Gangster (Original Motion Picture Soundtrack) by Pritam on iTunes". iTunes. 21 September 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 July 2016 रोजी पाहिले.
- ↑ "One last revolution in Bengali music: Ekti Biborton Er Kahini – Pentasect Online". pentasect.com. 9 August 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 July 2016 रोजी पाहिले.
- ↑ Zubeen Garg Interview | Xakhyat with Ajit Kumar Bhuyan on Prag News (इंग्रजी भाषेत), 29 June 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित, 2022-06-29 रोजी पाहिले
- ↑ "'Ya Ali is a rip-off of our song'". The Times of India. 15 August 2006. 6 March 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 March 2017 रोजी पाहिले.